SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 598
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४-२९१) महापुराण (५८७ उत्थितः पिटकोऽस्माकं विधर्गण्डस्य वोपरि।का जीविकेति निविण्णाः प्रायः प्रोषितयोषितः॥२८४ लब्धचन्द्रबलस्योच्चैः स्मरस्य परितोषिणः । अट्टहासे इवाशेषं सान्द्रश्चन्द्रातपोऽतत ॥ २८५ रूढो रागाडकुरश्चित्ते प्रम्लानो भानुभानुभिः। तदा चन्द्रिकया प्राज्यवृष्टयेवावर्द्धताङ्गिनाम् ॥२८६ खण्डितानां तथा तापो नाभूद्भास्कररश्मिभिः । यथांशुभिस्तुषारांशोविचित्रा द्रव्यशक्तयः ॥ २८७ खण्डनादेव कान्तानां ज्वलितो मदनानलः । जाज्वलीत्ययमेतेनेत्यत्यजन्मषु काश्चन ॥ २८८ वृथाभिमानविध्वंसि नापरं मधुना विना । कलहान्तरिताः काश्चित्सखीभिरतिपायिताः ॥ २८९ प्रेम नः कृत्रिमं नेतत्किमनेनेति काश्चन । दूरादेवात्यजस्निग्धाः श्राविका वासवादिकम् ॥ २९० । मधु द्विगुणितं स्वादु पीतं कान्तकरापितम् । कान्ताभिः कामदुर्वारमातंगमदवर्धनम् ॥ २९१ __ज्याना पतिवियोग झाला आहे अशा स्त्रिया चन्द्राला पाहून म्हणाल्या की हा चन्द्र जणु आमच्या गालावर मोठा फोड उत्पन्न झाला आहे. आता आम्ही कसच्या जगतो म्हणून त्या खिन्न झाल्या ॥ २८४ ।। मला जणु चन्द्रापासून सामर्थ्य प्राप्त झाले अशा विचाराने मदनाला फार आनंद वाटला. अशा त्या मदनाचा जणु अट्टाहासच असे चन्द्राचे दाट चान्दणे-चन्द्राचा दाट प्रकाश चोहीकडे पसरला ॥ २८५ ॥ जो प्रेमाङकुर सूर्याच्या किरणानी म्लान झाला होता तो रात्री जणु उत्कृष्ट जलवृष्टीप्रमाणे असलेल्या चन्द्राच्या प्रकाशाने पुनः प्राण्यांच्या मनात वाढला, टवटवीत झाला ।। २८६ ॥ ज्यांचा पतीनी मानभंग केला आहे अशा स्त्रियांचा मदनाग्नि- ताप सूर्याच्या किरणानी तीव्र झाला नाही पण चन्द्राच्या किरणानी तो फार वाढला. यावरून द्रव्याच्या शक्ति विचित्र आहेत हे सिद्ध होते ।। २८७ ॥ आपल्या पतीने मानभंग केल्यामुळे मदनाग्नि प्रज्वलित झालेला आहे. तो मद्य प्राशनामुळे जास्ती भडकेल म्हणून जणु काही स्त्रियानी मद्याचा त्याग केला ॥ २८८॥ ___ या दारूशिवाय हा व्यर्थ अभिमान रुसवा नाहीसा होणार नाही म्हणून ज्याना कलहाने पतिवियोग झाला आहे अशा स्त्रियाना त्यांच्या मैत्रिणीनी खूप दारू पाजली ।। २८९॥ आमचे पतीवरचे प्रेम कृत्रिम नाही मग या मद्याची काय आवश्यकता आहे म्हणून काही स्नेहयुक्त श्राविकानी मद्यादिक मादक पदार्थाचा दुरूनच त्याग केला ॥ २९० ॥ कित्येक तरुण स्त्रियानी प्रियपतीने आपल्या हाताने दिलेले व कामरूपी अनावर झालेल्या हत्तीची मस्ती वाढविणारे मधुर मद्य दुप्पट प्राशन केले ॥ २९१ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy