SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 597
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५८६) (४४-२७६ आयादहः पुरस्कृत्य मामर्को रात्रिगामिना । तेन पश्चात्कृतेतीव शोकात्सन्ध्या व्यलीयत ॥ २७६ तमः सर्व तदा व्यापत्क्वचिल्लीनं गुहादिषु । शत्रुशेषं न कुर्वन्ति तत एव विचक्षणाः ॥ २७७ अवकाशं प्रकाशस्य यथात्मानमधात्पुरा । तथैव तमसः पश्चाद्धिङमहत्त्वं विहायसः ॥ २७८ तमोबलात्प्रदीपादिप्रकाशाः प्रदिदीपिरे । जिनेनेव विनेनेन कलौ कष्टं फुलिङ्गिनः ॥ २७९ तमोविमोहितं विश्वं प्रबोधयितुमुद्धृतः । विषिनेव सुधाकुम्भो दौर्वर्णो विधुरुद्ययौ ।। २८० चन्द्रमाः करनालीभिरपिबद्बहुलं तमः । वृद्धकासं क्षयं हन्तुं धूमपानमिवाचरन् ॥ २८१ निःशेषं नाशकद्धन्तुं ध्वान्तं हरिणलाञ्छनः । अशुद्धमण्डलो हन्यानिष्प्रतापः कथं रिपून् ॥ २८२ विधुं तत्करसंस्पर्शाद्भृशमा सन्विकासिभिः । सरस्यो ह्लादयन्त्यो वा मुदा कुमुदलोचनैः ॥ २८३ महापुराण हा सूर्य दिवसाला पुढे करून माझ्याकडे आला. पण रात्रीकडे जाणाऱ्या त्याने मला मागे टाकले म्हणून जणु सन्ध्या शोकाने नाहीशी झाली ।। २७६ । सूर्य अस्ताला गेल्यावर कोठे गुहा वगैरे ठिकाणी दडून बसलेल्या अंधाराने सर्व आकाश व्यापून टाकले म्हणून जे शहाणे असतात ते शत्रूचा कांहीही अंश बाकी ठेवीत नाहीत ॥ २७७॥ आकाशाने जसे प्रकाशाला आपले स्थान दिले होते तसे त्याने आता आपल्या ठिकाणी अंधाराला आश्रय दिला आहे. यास्तव या आकाशाच्या मोठेपणाला धिक्कार असो ॥। २७८ ॥ या कलिकालात जिनेश्वराच्या अभावी अनेक कुलिंगीसाधूंचा प्रसार झाला तसे सूर्याच्या अभावी अंधकारामुळे अनेक दिवे-दिवट्या यांचे प्रकाश पसरू लागले ।। २७९ ।।] अंधकाराने मूढ झालेल्या जगाला जागृत करण्यासाठी जणु ब्रह्मदेवाने हा चांदीचा अमृतकुंभ उंच उचलून धरला आहे असा हा चंद्र उदयाला आला ॥। २८० ।। ज्यात खोकला वाढला आहे अशा आपल्या क्षयरोगाचा नाश करण्यासाठी जणु हा चंद्र आपल्या किरणरूपी नळीच्या द्वारे पुष्कळ अंधाररूपी धूम्राचे पान करीत आहे असे वाटते ।। २८१ ॥ हरिणाचे चिह्न धारण करणारा हा चन्द्र संपूर्ण अंधाराचा नाश करण्यास समर्थ झाला नाही व हे योग्यच आहे. कारण ज्याचे मण्डल ( मांडलिक राजे व दुसरा अर्थ वर्तुळाकार अशुद्ध अन्तःकरणात द्वेष करणारे, दुसरा अर्थ काळे ) आहे व जो निष्प्रताप ( पराक्रमरहित दुसरा अर्थ प्रखर तेजरहित ) आहे तो शत्रूंचा नाश कसा बरे करू शकेल ? ।। २८२ ।। तळयामध्ये चन्द्राच्या किरणस्पर्शानी रात्र - विकासी कमळे अतिशय विकसित झाली होती. जणु ती तळी त्या आपल्या विकसित झालेल्या कमलरूपी नेत्रानी चंद्राला आनंदित करीत आहेत असे वाटते ।। २८३ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy