________________
४४-२७५)
पापरोगी परप्रेर्यो रविविषममार्गगः । रक्तरुक् सकलद्वेषी वर्धिताशोऽक्रमाग्रगः ।। २७० सता बुधेन मित्रेण गुरुणाप्यस्तमाश्रयन् । बहुदोषो भिषग्वर्यैर्दुश्चिकित्स्य इवातुरः ॥ २७१ तदा बलद्वयामात्याः श्रित्वा बद्धरुषौ नृपौ । इत्यधम्यं निशायुद्धमनुबद्ध्य न्यषेधयन् ॥ २७२ ताभ्यां तत्रैव सा रात्रिर्नेतुमिष्टा रणाङ्गणे । भटतीव्रव्रणासह्यवेदनारावभीषणे ।। २७३ प्रतीची येन जायेऽहमगिलत्त महस्करम् । इति सन्ध्याच्छलेनाहस्तत्र कोपमिवागतम् ।। २७४ लज्जे सम्पर्कमर्केण कर्तुं लोचनगोचरे । इयं वेलेति वा सन्ध्याप्यन्वगादात्तविग्रहा ।। २७५
महापुराण
सूर्य पापरोगी कुष्टरोगाने पीडित असतो. जेव्हां त्याला शनि नांवाचा मुलगा झाला तेव्हां त्याने सूर्याकडे पाहिले व त्यामुळे त्याला कुष्टरोग झाला. सूर्य परप्रेर्य- अरुण नांवाचा सारथी जिकडे नेईल तिकडे जातो, तो विषममार्गग: - आकाशात तिरकस मार्गाने जातो. सूर्य रक्तरुक्— रक्तपित्त या रोगाने युक्त आहे, सकलद्वेषी - कलानी सहित अशा चन्द्राचा तो द्वेष करतो. तो सूर्य वर्धिताशः - पश्चिम दिशेला वाढविणारा आहे, अक्रमग:- ज्याला पाय नाहीत असा अरुण सारथी त्याने सहित तो असतो व दुष्ट राजाही पापरोगी दुष्ट लोकरूपी रोगाने युक्त असतो. परप्रेर्य - दुष्ट सचिवादिक सांगतील तसे वागणारा, विषममार्गाने जाणारा, रक्तरुग्दुसऱ्याच्या रक्ताची रुचि ज्याला आहे असा व सर्वांचा द्वेष करणारा, वर्धिताशः - ज्याची हाव वाढली आहे असा व अक्रमगः -नीतिक्रमाने न वागणारा असा दुष्ट राजा असतो ॥ २७० ॥
(५८५.
उत्तमबुध जो उत्तम मित्राप्रमाणे आहे व उत्तमबृहस्पति- गुरुग्रह यांच्याबरोबर सूर्य अस्ताला गेला. ज्याच्या ठिकाणी वातादिक पुष्कळ दोष उत्पन्न झाले आहेत असा रोगी उत्कृष्ट वैद्याकडून देखील चिकित्सा करण्यायोग्य जसा राहात नाही तसा हा अर्ककीर्ती उत्तम विद्वान् असे मित्र व बृहस्पतीप्रमाणे आदरणीय गुरु यानी युक्त असूनही या युद्धात पराजित
झाला ॥। २७१ ॥
त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या बाजूचे प्रधान रागावलेल्या दोन्ही राजाकडे आले व त्यान रात्री युद्ध करणे हे धर्माच्या दृष्टीने निषिद्ध आहे असा नियम करून बंद ठेवले. तेव्हां तीव्र जखमानी असह्य वेदना होऊन वीराच्या आक्रोशानी भयंकर वाटणाऱ्या त्या रणांगणात दोन्ही बाजूच्या राजानी ती रात्र तेथेच घालवावी असे ठरविले ।। २७२-२७३ ।।
ज्याच्यामुळे मी उत्पन्न झालो त्या सूर्याला या पश्चिम दिशेने गिळून टाकले म्हणून सन्ध्येच्या मिषाने दिवस जणु तिच्यावर रागावला ॥। २७४ ।।
Jain Education International
सर्वं लोकांच्या डोळ्याना दिसेल अशा प्रदेशात सूर्याशी सम्पर्क करण्यास मला लाज वाटते असे मानून जणु जिने शरीर धारण केले आहे अशी सन्ध्यावेला देखील सूर्याला अनुसरून निघून गेली ।। २७५ ।।
म. ७७
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org