SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 599
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५८८) महापुराण (४४-२९२ इत्याविर्भावितानङ्गरसास्ताः प्रियसङ्गमात् । प्रीति वाग्गोचरातीतां स्वीचऋर्वक्रवीक्षणाः॥ २९२ तत्र काचित्प्रियं वीक्ष्य कथाशेषं द्विषच्छरैः । स्वयं कामशरैरक्षताङ्गो चित्रमभूयसुः ॥२९३ क्षतैरनुपलक्ष्याङ्गं वीक्ष्य कान्तमजानती । परा परासुतां प्रापज्ज्ञात्वात्मविहितवणः ॥ २९४ मया निवारितोऽप्याया वीरलक्ष्मीप्रियः प्रियः । तत्कठोरवणरेवं जातोऽसीत्यमतापरा ॥ २९५ मां निवार्य सहायान्ती कीति स्वीकर्तुमागमः । निर्मलेति विपर्यस्तो जानन्नपि बहिश्चरीम् ॥२९६ स्थिता तत्रैव सा कीतिः किं वदन्ति नरोऽन्तरम् । इति सासूयमुक्त्वान्या प्रायासी प्रियपद्धितम् ॥ न कि निवारिताप्यायां त्वया साधं विचेतना। सन्निधौ मे किमेवं त्वां नयन्ति गणिकाधमाः ॥२९८ अस्तु किं यातमद्यापि तत्र त्वां न हराणि किम्। विलप्येवं कलालापा काचित्कान्तानुगाभवत् ॥ २९९ याप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी कामरस उत्पन्न झाला आहे व ज्या वक्रकटाक्ष फेकून पतीकडे पाहात आहेत अशा त्या तरुणस्त्रियानी पतीच्या सहवासापासून शब्दानी न सांगता येणान्या सुखाचा उपभोग घेतला ।। २९२ ।। त्या रणभूमीत कोणी एक स्त्री शत्रूच्या बाणानी आपल्या पतीची फक्त कथाच उरली आहे असे पाहून स्वतः मदनाच्या बाणानी जिचे शरीर जखमी झाले नाही अशी असताही ती आपोआप प्राणरहित झाली, मरण पावली हे आश्चर्य आहे ।। २९३ ॥ अनेक जखमानी ज्यांचे शरीर ओळखता येत नाही अशा आपल्या पतीला पाहून आपणच केलेल्या नख आणि दात यांच्या जखमानी हा मरण पावला आहे असे जाणून दुसरी 'एक स्त्री प्राणरहित झाली ॥ २९४ ॥ हे प्रिय, तुला वीरलक्ष्मी प्रिय असल्यामुळे मी निवारण केले असताही तू गेलास पण तिच्या कठोर व्रणानी तुझी अशी परिस्थिति झाली असे म्हणून ती स्त्री मरण पावली ॥२९५॥ हे प्रिय, मी तुझ्याबरोबर येण्यासाठी निघाले असता मला निवारण करून कीर्ति स्त्रीचा स्वीकार करण्यास तू निघून गेलास व ती बाहेर फिरणारी आहे असे जाणूनही ती निर्मल आहे, निर्दोष आहे असा तुला भ्रम झाला व तू तिचा स्वीकार करण्यास गेलास पण ती तेथेच राहिली. काय पुरुष आपल्या हृदयातले सांगतात? याप्रमाणे ईयेने बोलून ती आपल्या पतीच्या मार्गाला अनुसरली अर्थात् तो परलोकी गेला असल्याने तिनेही त्याचीच वाट स्वीकारली ।। २९६-२९७ ॥ हे प्रिय, आपण तरी नको म्हटले तरी मी आपणाबरोबर येणार नाही काय? दीन खिन्न होऊनही मी आपणाबरोबर येईनच व मी जवळ असताना हे प्रिय तुला या नीच वेश्या ओढून नेत आहेत काय? असो, अद्यापि कांही बिघडले नाही. मी तेथे येऊन तुला त्यांच्यापासून तुझे हरण करून परत आणणार नाही काय? अवश्य आणीन. याप्रमाणे विलाप करून मधुर स्वरांची कोणी स्त्री आपल्या पतीच्या मागून गेली ।। २९८-२९९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy