________________
४४-३०७)
महापुराण
(५८९
शरनिभिन्नसर्वाङ्गः कीलितासुरिवापरः । कान्तागमं प्रतीक्ष्यास्त लोचनस्थितजीवितः ॥ ३०० कोपदष्टविमुक्तोष्ठं कान्ते वालोक्य कामिनी । वीरलक्षम्या कृतासूया क्षणकोपासुमत्यजत् ॥३०१ हृदि निभिन्ननाराचो मत्वा कान्तां हृदि स्थिताम् । हा मृतेयं वराकोति सद्यः प्राणान्व्यसर्जयत् ॥ शस्त्रसंभिन्न सर्वाङ्गमन्तको नेतुमागतः । कान्ताचिन्तापरं कंतुस्तद्धस्तावहृतापरम् ॥ ३०३ कण्ठेनालिङ्गितः प्रेमशोकाभ्यां प्रियया परः। ध्यात्वा तां त्यक्तदेहोऽगानिर्वाणं सवणस्तया ॥३०४ श्वः स्वर्गे कि किमत्रव सन्मो नौ न संशयः । तत्र त्वं बहकान्तोद्य रमेऽन्येत्याह सवणम् ॥३०५ अत्र वामन बासोस्तु किं तया चिन्तयावयोः। वियोगः क्वापि नास्तीति कान्तां कान्तमतर्पयत् ।। सवतो वोरलक्ष्मी च कीति चैहि चिरायुषा । हन्तु मामेव कामोऽयमिति कान्तावदQषा ॥ ३०७
___ बाणानी ज्याचे सर्व शरीर विदीर्ण झाले आहे व त्या बाणानी जणु त्याचे प्राण जखडल्यासारखे झाले आहेत असा कोणी वीर आपल्या डोळ्यात प्राण धारण करून आपल्या पत्नीच्या येण्याची वाट पाहात राहिला होता ।। ३०० ॥
ज्याने आपला ओठ कोपाने चावून सोडला आहे अशा आपल्या पतीला पाहून जिला थोडा वेळ राग आला आहे अशा कोण्या स्त्रीने वीरलक्ष्मीबरोबर द्वेष करून प्राण त्यागले ॥ ३०१ ॥
ज्याच्या छातीत बाण घुसला आहे असा कोणी वीर आपल्या हृदयात आहे असे समजून ती बिचारी मरण पावली असे समजून त्या वीराने तत्काल प्राण सोडले ।। ३०२ ।।
शस्त्रानी ज्याचे सर्व अंग भिन्न-विदीर्ण झाले आहे अशा कोणी वीराला यम नेण्यासाठी आला पण आपल्या पत्नीचे मनात चिन्तन करीत होता म्हणून त्यावेळी मदन तिथे आला व त्याने त्याच्या हातातून त्या वीराला सोडविले ॥ ३०३ ॥
प्रेम आणि शोक यासह एका प्रियेने आपल्या पतीला कंठालिंगन केले होते. त्या जखमी वीराने तिचे चिन्तन करीत देह त्यागला व तिच्यासह स्वर्गाला गेला ।। ३०४ ॥
हे प्रिय जीवितेश्वरा, उद्या स्वर्गात काय आपला संगम होईल ? हे संशययुक्त आहे. म्हणून आपणा दोघांचा येथेच संगम होवो व यात काही संशय नाही. स्वर्गात पुष्कळ स्त्रियानी तू युक्त होशील म्हणून व्रणयुक्त अशा तुझ्याबरोबर मी रमेन असे एक स्त्री आपल्या पतीला बोलली ॥ ३०५ ॥
या लोकी राहणे असो किंवा परलोकी राहणे असो त्या चिन्तेशी आमचे काय प्रयोजन आहे ? तुझा आणि माझा कोठेही वियोग होणार नाही असे बोलून कोण्या स्त्रीने आपल्या पतीला संतुष्ट केले ॥ ३०६ ॥
हे प्रिय, आपण व्रतधारी आहात. आपण वीरलक्ष्मीला आणि कीर्तीला मिळवा पण मी दीर्घायुषी असल्याने मला मदन मारो असे कोणी स्त्री रागाने आपल्या पतीला म्हणाली ॥३०७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org