________________
३२-१९७)
महापुराण
(२२५
कृतोपच्छन्दनं चामुं नाटयमालं सुरर्षभम् । व्यसर्जयद्यथोद्देशं सत्कृत्य भरतर्षभः ॥ १९२ कृतोदयमिनं ध्वान्तात्परितो गगनेचराः। परिचेरुर्नभोमार्गमारुद्धय धृतसायकाः ॥ १९३ नमिविनमिपुरोगैरन्वितः खेचरन्द्रः । खचरगिरिगुहान्तन्तिमुत्सार्य दूरम् ॥ रविरिव किरणोपर्योतयन्दिग्विभागान् । निधिपतिरुदियाय प्रीणयजीवलोकम् ॥ १९४ सरसकिसलयान्तःस्यन्दमन्दे सुरस्त्रीस्तनतटपरिलग्नक्षौमसङक्रान्तवासे । सरति मरुति मन्दं कन्दरेष्वद्रिभर्तुनिधिपतिशिविराणां प्रादुरासन्निवेशाः ॥ १९५ किसलयपुटभेदी देवदारुमाणामसकृदमरसिन्धोः सीकरान्व्याधुनानः । श्रमसलिलममुष्मादुष्णसम्भूष्णुजिष्णोः खचरगिरितटान्तान्निष्पतन्मातरिश्वा ॥ १९६ सपदि विजयसैन्यनिजितम्लेच्छखण्डः । समुपहृतजयश्रीश्चक्रिणादिष्टमात्रात् ॥ जिनमिव जयलक्ष्मीसन्निधानं निधीनाम् । परिवृढमुपतस्थौ नम्रमौलिश्चमूभृत् ॥ १९७
ज्याने स्तुति केली आहे अशा देवश्रेष्ठ नाट्यमालाचा श्रेष्ठ भरतचक्रवर्तीनेही सत्कार केला व त्याला त्याच्या देशास पाठविले ।। १९२ ॥
__ ज्यानी आपल्या हातात बाण व तरवारी धारण केल्या आहेत व जे सर्व बाजूनी उभे राहिले आहेत असे विद्याधर अंधाराचा नाश करून उदय पावलेल्या सूर्याप्रमाणे उत्कर्षास प्राप्त झालेल्या चक्रवतीची सेवा करू लागले ।। १९३ ।।
नमि व विनमि हे ज्यात मुख्य आहेत अशा विद्याधरराजानी सहित असलेला आणि विजयार्धपर्वताच्या गुहेतील अंधार दूर सारून सूर्याप्रमाणे किरणाच्याद्वारे सर्व दिशाना प्रकाशित करणारा व सर्व जीवसमूहाला आनंदित करणारा निधिपति भरतेश मोठ्या उत्कर्षास पावला ॥ १९४ ॥
टवटवीत कोवळ्या पानांच्या आत शिरल्यामुळे ज्याच्या ठिकाणी मंदपणा आला आहे व देवांगनाच्या स्तनतटावर असलेल्या रेशमीवस्त्रात ज्याचा गंध शिरला आहे, असा वारा विजयाध पर्वताच्या गुहामध्ये मंदपणाने शिरत असता निधींचा स्वामी अशा चक्रवर्तीच्या सेनांचे डेरे इतस्ततः रचले गेले ।। १९५ ।। .
देवदारुवृक्षाच्या कोवळ्या पानांच्या जोडी विसकटणारा व वारंवार गंगानदीच्या बारीक जलबिन्दूंना इकडे तिकडे हलविणारा व उष्णतेमुळे उत्पन्न झालेल्या भरताच्या श्रमजलाला घालविणारा, अशा प्रकारचा वारा या विजयार्धपर्वताच्या कड्यावरून खाली पडला. अर्थात् वाहू लागला ।। १९६ ।।
ज्याने विजयशाली सैन्याच्याद्वारे म्लेच्छखंड जिंकले आहेत, चक्रवर्तीने आज्ञा केल्याबरोबर ज्याने शीघ्र जयश्रीला ओढून आणले आहे, असा नम्र मस्तक केलेला सेनापति जयलक्ष्मी नेहमी ज्याच्याजवळ राहते अशा जिनेश्वराप्रमाणे निधींचा स्वामी असलेला भरतप्रभूच्याजवळ आला ॥ १९७ ।।
म. २९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org