SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 235
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २२४) (३२-१८३ स्वसारं च नमेर्धन्यां सुभद्रां नाम कन्यकाम् । उदुवाह स लक्ष्मीवान्कल्याणैः खचरोचितैः ॥ १८३ तां मनोज्ञां रसस्येव स्रुति सम्प्राप्य चक्रभृत् । स्वं मेने सफलं जन्म परमानन्दनिर्भरः ॥ १८४ ताव निजित निःशेषम्लेच्छराजबलो बलैः । जयलक्ष्मी पुरस्कृत्य सेनानीः प्रभुमैक्षत ।। १८५ कृतकार्यं च सत्कृत्य तं तांश्च म्लेच्छनायकान् । विसज्यं सम्राट् सज्जोऽभूत्प्रत्यायातुमपाङमहीम् ॥ जयप्रयाणशंसिन्यस्तदा भेर्यः प्रदध्वनुः । विष्वग्बलार्णवे क्षोभमातन्वन्त्यो महीभृताम् ॥ १८७ तां काण्डकप्रपाताख्यां प्रागेवोद्घाटितां गुहाम् । प्रविवेश बलं जिष्णोश्चक्ररत्नपुरोगमम् ॥ १८८ गङ्गापगोभयप्रान्तमहावीथीद्वयेन सा । व्यतीयाय गुहां सेना कृतद्वारां चभूभृता ॥ १८९ मुच्यमाना गुहा सैन्यंश्चिरदुच्छ्वासितेव सा । चमूरपि गुहारोधान्निःसृत्योज्जीवितेव सा ॥ १९० नाट्यमालामरस्तत्र रत्नार्थैः प्रभुमर्धयन् । प्रत्यगृह्लाद्गुहाद्वारि पूर्णकुम्भादिमङ्गलैः । १९१ महापुराण नमिविद्याधर राजाची भाग्यवती बहिण जिचे नांव सुभद्रा असे होते, तिच्याशी अनेक विद्याधर योग्य मंगलकार्यपूर्वक लक्ष्मीसंपन्न भरतराजाचा विवाह झाला ।। १८३ ॥ जणु रसाची मनाला आकर्षिणारी धारा अशा त्या सुंदरीच्या प्राप्तीने भरताला अतिशय आनंद वाटला व त्याने आपला जन्म सफल मानिला ।। १८४ ।। इकडे तोपर्यन्त आपल्या सैन्याच्याद्वारे सेनापतीने संपूर्ण म्लेच्छ राजांच्या सैन्याला जिंकले व जयलक्ष्मीला पुढे करून तो प्रभूच्या दर्शनाला आला. त्याने त्याला पाहिले ।। १८५ ।। ज्याने सांगितलेले कार्य केले आहे अशा सेनापतीचा चक्रवर्तीने सत्कार केला आणि म्लेच्छराजानाही सत्कार करून त्याने त्यानाही स्वस्थानी पाठविले. यानंतर तो सम्राट् दक्षिणेकडील प्रदेशावर आक्रमण करण्यास तयार झाला ।। १८६ ।। तेव्हां राजांच्या सैन्यसमुद्रामध्ये चोहीकडे क्षोभ उत्पन्न करणारे व जयप्रयाण सुचविणारे असे नगारे वाजू लागले ।। १८७ । ती काण्डकप्रपात नावाची गुहा सहा महिन्यापूर्वीच उघडलेली होती. त्या गुहेत चक्ररत्न पुढे जाऊ लागले व त्याच्यामागून विजयशाली चक्रीचे सैन्याने प्रवेश केला ।। १८८ ।। सैन्य गंगा व सिन्धूया दोन नद्यांच्या तीरावरील मोठ्या दोन मार्गानी त्या गुहेच्या दरवाजातून बाहेर गेली ।। १८९ ।। सैन्य जिच्यातून बाहेर पडले आहे अशा त्या गुहेने बऱ्याच वेळाने उच्छ्वास सोडला अशी भासली आणि ते सैन्यही गुहेच्या प्रतिबंधातून बाहेर पडल्यामुळे आपण पुनः जगलो असे स्वतःस मानू लागले ॥ १९० ॥ त्या गुहेच्या द्वारात नाट्यमाल नांवाचा देव आला. त्याने पूर्ण कुंभादिमंगलांच्याद्वारे व रत्नाच्या अर्षांनी चक्रीचे पूजन केले ॥ १९१ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy