________________
२२६)
महापुराण
(३२-१९९
जित्वा म्लेच्छनृपो विजित्य सुचिरं प्रालेयशैलेशिनम् । देव्यौ च प्रणमय्य दिव्यमुभयं स्वीकृत्य भद्रासनम् ॥ हेलानिजितखेचराद्विरधिराट् प्रत्यन्तपालाञ्जयन् । सेनान्या विजयी व्यजेष्ट निखिलां षट्खण्डभूषां भुवम् ॥ १९८ पुण्यादित्ययमा हिमाह्वयगिरेरा तोयधेः प्राक्तनादावापाच्यपयोनिर्जलनिधेरा च प्रतीच्यादितः। चक्रे क्षमामरिचक्रभीकरकरश्चक्रेण चक्री वशे ।
तस्मात्पुण्यमुपार्जयन्तु सुधियो जने मते सुस्थिताः ॥ १९९ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङ्ग्रहे भरतोत्तरार्ध
विजयवर्णनं नाम द्वात्रिंशत्तम पर्व ॥ ३२ ॥
या भरतचक्रीने चिलात व आवर्त या दोन म्लेच्छ राजाना जिंकले. यानंतर हिमवान् पर्वताचा अधिपति अशा हिमवान् देवालाही जिंकले. तद्नन्तर गंगा व सिन्धु या दोन देवतानी भरतचक्रवर्तीला नमस्कार केला व त्या दोन देवताकडून दोन भद्र-उत्तम दोन आसने त्याने घेतली व त्याने लीलेने विजया पर्वताला जिंकले व आपल्या सेनापतीच्या द्वारे जवळच्या प्रदेशाचे रक्षण करणाऱ्या म्लेच्छराजांना जिंकले. याप्रमाणे विजयी या भरतराजाने सहा खण्ड जिचे अलंकार आहेत अशा सर्व भरतभूमीला जिंकले ।। १९८ ।।
शत्रुसमुदायाला भय दाखविणारा ज्याचा हात आहे अशा या भरतचक्रीने चक्राच्याद्वारे आपल्या पुण्यामुळे हिमालयापर्यन्त व पूर्वसमुद्र, पश्चिमसमुद्र आणि दक्षिणसमुद्र या तीन समुद्रापर्यन्त संपूर्ण पृथ्वी आपल्या वश केली म्हणून हे सुबुद्धियुक्त-जनानो आपण जिनेश्वराच्या मतांत दृढतेने स्थिर राहा व पुण्यसंपादन करा ॥ १९९ ।।
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत विशष्टिलक्षणमहापुराणाच्या मराठी अनुवादात उत्तरार्ध भरताच्या विजयाचे वर्णन करणारे बत्तीसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org