________________
७०२)
महापुराण
(४७-३७०
ततो गत्वाहमिन्द्रोऽभूत्तस्माच्चागत्य भूतलम् । महासेनोऽभवत्कर्ममहासेनाजयोजितः ॥ ३७० हरिवाहननामाद्यो वराहार्यस्ततोऽभवत् । मणिकुण्डल्यतस्तस्मावरसेनः सुरोत्तमः ॥ ३७१ ततोऽस्माद्विजयस्तस्मादहमिन्द्रो दिवश्च्युतः । अजनिष्ट विशिष्टेष्टः श्रीषेणः सेवितः श्रिया ॥३७२ नागदत्तस्ततो वानरार्योऽस्माच्च मनोहरः । देवश्चित्राङगदस्तस्मादभूत्सामानिकः सुरः ॥ ३७३ ततश्च्यतो जयन्तोऽभूदहमिन्द्रस्ततस्ततः । महीतले समासाद्य गुणसेनोऽभवद्गणी ॥ ३७४ लोलुपो नकुलार्योऽस्मादेतस्मात्स मनोरथः । ततोऽपि शान्तमदनस्ततः सामानिकामरः ॥ ३७५ राजा पराजितस्तस्मादहमिन्द्रस्ततोऽजनि । ततो ममानुजो जातो जयसेनोऽयमूजितः ॥ ३७६ इत्यस्मिन्भवसङ्कटे भवभूतः स्वेष्टरनिष्टैस्तथा । संयोगः सहसा वियोगचरमः सर्वस्य नन्वीदृशम् ॥ त्वं जानन्नपिकि विषण्णहृदयो विश्लिष्टकर्माष्टको । निर्वाणं भगवानवापदतुलं तोषे विषादः कुतः॥
पहिल्या भवात उग्रसेनवैश्य, दुसऱ्या भवात वाघ, तिसऱ्या भवात भोगभूमीत आर्य चौथ्या भवात चित्रांगदनामक देव नंतर पाचव्या भवात वरदत्त नामक राजपुत्र, साहव्या भवात जयनामक देव झाला. आठव्या भवात अहमिन्द्र होऊन नवव्या भवात कर्मरूपी महासैन्याला जिंकून ऊर्जितावस्थेला पोहोचलेला. महासेन आदिभगवंताचा गणधर झाला ॥ ३७०-३७१ ॥
पहिल्या भवात हरिवाहन राजपुत्र, दुसऱ्या भवात सूकर, नंतर तिसन्या भवात भोगभूमीत आर्य, चौथ्या भवात मणिकुण्डली नामक देव, पाचव्या भवात वरसेन राजपुत्र, सहाव्या भवात उत्तमदेव झाला. यानंतर विजयनामक राजपुत्र तदनन्तर अहमिन्द्र. तेथून च्युत झाल्यावर विशिष्ट व इष्ट-प्रिय श्रीषेण राजा झाला ।। ३७३ ।।
पहिल्या भवात नागदत्त वैश्य, यानन्तर वानर नंतर तिसऱ्या भवांत भोगभूमीत आर्य, चौथ्या भवात मनोहर नामकदेव, पाचव्या भवात चित्रांगद नामक राजा, साहव्या भवात सामानिक सुर-देव. सातव्या भवात जयन्त नामक राजपुत्र, आठव्या भवात अहमिन्द्र देव, नवव्या भवात गुणसेन नामक गणधर झाला ।। ३७४-३७५ ।।
जो पूर्वी लोलुपनामक दुकानदार होता यानंतर जो मुंगुस होऊन जन्मला होता. नंतर तिस-या भवात जो भोगभूमीत आर्य झाला. यानंतर चौथ्या भवात मनोरथ नामक देव झाला. पाचव्या भवात तो शान्तमदननामक राजपुत्र झाला. तदनन्तर साहव्या भवात स्वर्गात सामानिक देव झाला, तेथून चवून सातव्या भवात अपराजित नामक राजा झाला. आठव्या भवात अहमिन्द्र झाला व नवव्या भवात माझा जयसेननामक ऐश्वर्यशाली धाकटा भाऊ झाला ॥ ३७६-३७७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org