SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 208
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३१-१२७) महापुराण (१९७ इति चक्रधरादेशं मूर्ना माल्यमिवोद्वहन् । कृतमालामरोद्दिष्टकृत्स्नोपायप्रयोगवित् ॥ ११८ कृती कतिपयरेष तुरङ्गः सपरिच्छदैः । प्रतस्थे वाजिरत्नेन दण्डपाणिश्चमपतिः ॥ ११९ किञ्चिच्चान्तरमुल्लङघ्य स सिन्धोर्वनवेदिकाम् । विगाह्य विजयार्द्धस्य सम्प्रापत्तटवेविकाम्॥१२० तत्सोपानेन रूप्यारारुह्य जगतीतलम् । प्रत्यङमुखो गुहोत्सङ्गमाससाद चमूपतिः। १२१ जयताच्चक्रवर्तीति सोऽश्वरत्नमधिष्ठितः। दण्डेन ताडयामास गुहाद्वारं स्फुरद्ध्वनि ॥ १२२ दण्डरत्नाभिघातेन गुहाद्वारे निरर्गले । तद्गर्भालवानुष्मा निर्ययोकिल सन्ततः ॥ १२३ वधद्दण्डाभिघातोत्थं क्रेङ्कारमररीपुटम् । सवेदनमिवास्वेदि निर्गतासु गुहोष्मणा ॥ १२४ उद्घाटितकवाटेन द्वारेणोष्माणमुद्वमन् । रराज राजतः शैलो लब्धोच्छ्वासश्चिरादिव ॥ १२५ कपाटपुटविश्लेषावुच्चचार महानध्वनिः । दण्डेनाभिहतस्याद्वेराक्रोश इव विस्फुरन् ॥ १२६ गहोष्मणा स नाश्लेषि विदूरमपवाहितः। तरस्विनाश्वरत्नेन देवताभिश्च रक्षितः ॥ १२७ ___ त्याप्रमाणे भरतचक्रीची आज्ञा सेनापतीने माळेप्रमाणे मस्तकाने धारण केली. हा सेनापति कृतमालदेवाने सांगितलेल्या सर्व उपायांचे प्रयोग कसे करावे हे जाणत होता ।। ११८॥ तो कुशल सेनापति सर्वसाधनसामग्रीनी कित्येक घोडेस्वारासह आपल्या उत्कृष्ट अश्वरत्नावर बसून व हातात दंडरत्न घेऊन निघाला ॥ ११९ ॥ कांही अन्तर उल्लंघून त्याने सिंधुनदीच्या वनवेदिकेमध्ये प्रवेश केला व नंतर विजायध 'पर्वताच्या तटवेदिकेकडे आला ॥ १२० ॥ त्या वेदिकेच्या पायऱ्यानी विजया पर्वताच्या वरील भागावर त्याने आरोहण केले. नंतर पश्चिमेकडे मुख करून सेनापति गुहेच्या वरच्या बाजूवर आला ॥ १२१ ॥ __ "भरतचक्रवर्ती जयवन्त असो" असे म्हणून अश्वरत्नावर बसलेल्या सेनापतीने दण्डरत्नाने गुहेचे द्वार ठोकले तेव्हा मोठा ध्वनि झाला ॥ १२२ ॥ दण्डरत्नाच्या आघाताने ते गुहाद्वार मोकळे झाले व त्या गुहेच्या आतल्या भागातून अतिशय प्रखर अशी उष्णता सारखी बाहेर पडू लागली ॥ १२३ ॥ दण्डाच्या प्रहाराने करकर आवाज करणारी ती दोन कवाडे गुहेच्या उष्णतेने ज्याना घाम आला आहे व जे वेदनानी पीडित होऊन जणु प्राण सोडीत आहे अशी दिसली ॥१२४॥ ___ ज्याची कवाडे उघडली आहेत अशा त्या गुहाद्वाराने उष्णता बाहेर सोडणारा तो 'विजयार्धपर्वत फार दीर्घकालाने वर ज्याला श्वास घेता आला आहे असा जणु शोभू लागला ॥ १२५ ॥ कवाडांची जोडी उघडल्यामुळे फार मोठा ध्वनि झाला. दण्डरत्नाच्या आघाताने तो पर्वत जणु चोहीकडे पसरणारा आक्रोश करीत आहे असे लोकाना वाटले ॥ १२६ ॥ त्या गुहेच्या उष्णतेने तो सेनापति बिलकुल होरपळला नाही कारण अत्यंत वेगवान् अशा अश्वरत्नाने त्याला फार दूर नेले व देवतानीही त्याचे रक्षण केले ।। १२७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy