________________
३१-२५)
महापुराण
(१८५
रजो वितानयन्पौष्पं पवनैः परितो वनम्। सोऽभ्युत्तिष्ठन्निवास्यासीत्कूजत्कोकिलडिण्डिमः ॥१८ फिमत्र बहुना सोऽद्रिविभुं दिग्विजयोद्यतम् । प्रत्यच्छदिव सम्प्रीत्या सत्काराङगैरतिस्फुटः॥१९ विभक्ततोरणामुच्चैरतीत्य वनवेदिकाम् । नियन्त्रितं बलाध्यक्षजगाहेऽन्तर्वणं बलम् ।। २० वनोपान्तभुवः सैन्यैरारुद्धा रुद्धदिङमुखैः । उड्डीनविहगप्राणा निरुच्छ्वासास्तदाभवन् ॥ २१ अभूतपूर्वमुद्भूतप्रतिध्वानं बलध्वनिम् । श्रुत्वा बलवदुत्त्रेसुस्तिर्यञ्चो वनगोचराः ॥ २२ बलक्षोभादिभो निर्यन्वलक्षोऽभावनान्तरात् । सुरेभः सुविभक्ताङगः सुरेभ इव वर्मणा ॥२३ प्रबोधजम्भणावास्यं व्याददौ किल केसरी। न मेऽस्त्यन्त यं किञ्चत्पश्यतेतीव दर्शयन् ॥ २४ शरभो रभसादूर्ध्वमुत्पत्योत्तानितः पतन् । सुस्थ एव पदः पृष्ठभेरभूनिर्मातकोशलात् ॥ २५
वाऱ्याने वनाच्या सर्व बाजूनी जणु पुष्पांच्या परागांचे छत निर्माण करणारा व कुहु, कुहु शब्द करणारे कोकिलरूपी नगारे ज्याचे वाजत आहेत असा तो पर्वत प्रभूचा सत्कार करण्यासाठी उठून उभा राहिल्याप्रमाणे दिसत आहे ॥ १८ ॥
याविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. तो पर्वत दिग्विजयासाठी उद्युक्त झालेल्या त्या भरतप्रभूच्या सत्कारासाठी सर्व सामग्री घेऊन अतिशय प्रेमाने सामोरे आला आहे असा जणु दिसत होता ॥ १९ ॥
जिच्यावर चारी बाजूनी तोरणे बांधली आहेत अशा उंच वनाच्या वेदीला उल्लंघणारे व सेनापतीनी ज्याचे नियंत्रण केले आहे असे ते सैन्य वनाच्या आतील प्रदेशात घुसले ॥ २० ॥
ज्यानी सर्व दिशा व्यापल्या आहेत अशा सैन्यानी दाट भरल्यामुळे ज्याचे पक्षीरूप प्राण वर उडून गेले आहेत अशा त्या वनभूमि त्यावेळी श्वास कोण्डल्याप्रमाणे झाल्या ॥ २१ ।।
ज्याचा प्रतिध्वनि होत आहे असा सैन्याचा ध्वनि जो कधी पूर्वी ऐकला नव्हता तो ऐकून त्या वनात फिरणारे पशु व पक्षी अत्यन्त भ्याले ॥ २२ ॥
सैन्याच्या मोठ्या ध्वनीमुळे त्या वनातून देवाच्या हत्तीप्रमाणे मोठा व ज्याचे सर्व अवयव व्यक्त दिसत आहेत व जो गर्जना, करीत आहे असा शुभ्र हत्ती बाहेर पडून शोभू लागला ॥ २३ ॥
माझ्या मनात काहीही भय नाही. कोणाला पाहावयाचे असेल तर त्याने पाहावे अशा विचाराने जणु कोणी सिंह जागा होऊन त्याने आपले तोंड आ करून उघडले होते ॥ २४ ॥
एक अष्टापद प्राणी वेगाने वर उडून उताणा होऊन खाली पडत असता त्याच्या उत्पत्तीस कारण असलेल्या नामकर्माच्या कौशल्यामुळे पाठीवर असलेल्या पायानी पुनः चांगल्या रीतीने उभा राहिला ॥ २५ ॥ म.२४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org