SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 112
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २७-१००) महापुराण शाखाभङ्ग कृतच्छायां प्रयान्तो गजयूथपाः । शाखोद्धारमिवातन्वन्खरांशोःकरपीडिताः ॥ ९३ यूथं वनवराहाणामुपर्युपरि पुञ्जितम् । तदा प्रविश्य वेशन्तमधिशिश्ये सकर्दमम् ॥ ९४ । मृणालरङ्गमावेष्टय स्थिता हंसा विरेजिरे । प्रविष्टाः शरणायेव शशाङ्ककरपञ्जरम् ॥ ९५ चक्रवाकयुवा भेजे घनं शैवलमाततम् । सर्वाङ्गलग्नमुष्णालुविनीलमिव कञ्चकम् ॥ ९६ पुण्डरीकातपत्रेण कृतच्छायोऽब्जिनीवने । राजहंसस्तदा भेजे हंसीभिः सह मज्जनम् ॥ ९७ बिसभङ्गः कृताहारा मृणालैरवगुण्ठिताः । बिसिनीपत्रतल्पेषु शिश्यिरे हंसशावकाः ॥ ९८ इति शारदिके तीवं तन्वाने तापमातपे । पुलिनेष प्रतप्तेषु न हंसा धृतिमादधुः ॥ ९९ मध्यस्थोऽपि तदा तीवं तताप तरणिर्भुवम् । नूनं तीवप्रतापानां माध्यस्थ्यमपि तापकम् ॥ १०० ...--.----.............. सूर्याच्या किरणानी पीडित झालेल्या हत्तीच्या कळपांच्या नायकानी झाडांच्या फांद्या तोडून तोडून आपल्या अंगावर पसरून त्यानी सावली केली व ते जेव्हा चालू लागले तेव्हा ते राजाच्या करांनी पीडित झालेल्या जनतेप्रमाणे त्यानी शाखोद्धार केला आहे की काय असे दिसले. असह्यकर पीडित प्रजा हातात शाखा घेऊन राजाकडे जाऊन आपले दुःख निवेदन करते तेव्हा तो कमी करून त्याना सुखी करतो. तसे हत्तीनी झाडाच्या फांद्या तोडून त्या आपल्या अंगवर पसरून उन्हाचा संताप नाहीसा केला ॥ ९३ ।। त्यावेळी रानटी डुकरांच्या समूहाने लहान तळ्यातील चिखलात प्रवेश केला व तेथे पुंजरूपाने एकमेकावर पडून तो झोपला ॥ ९४ ।। त्यावेळी कमलतन्तूनी आपल्या अंगांना हंस पक्ष्यांनी वेष्टिले असता ते आपले रक्षण करण्याकरिता चंद्रकिरणांच्या पिंजऱ्यात जणु शिरले आहेत असे शोभत होते ।। ९५ ॥ उन्हाचा ताप ज्याला सहन होत नाही अशा ह्या तरुण चक्रवाक पक्ष्याने पुष्कळ व पसरलेल्या अशा दाट शेवाळाचा आश्रय घेतला. ते त्याच्या सर्वांगाना चिकटल्यामुळे हिरवा अंगरखा त्याने अंगात घातला आहे असे वाटते ।। ९६ ॥ कमलिनींच्या वनात पांढ-या कमलाच्या छत्राने त्याच्यावर सावली केली आहे, असा हा राजहंस त्यावेळी हंसीबरोबर पाण्यात स्नान करू लागला ।। ९७ ॥ कमलांच्या तंतूच्या तुकड्यांचा आहार ज्यानी घेतला आहे व कमलतन्तूनी ज्यांची शरीरे वेष्टिली आहेत अशी ही राजहंसाची पिली कमलांच्या पानावर झोपली आहेत ॥ ९८ ॥ याप्रमाणे शरद्ऋतूमध्ये सूर्याचे किरण अतिशय तीव्र ताप देत असता व त्यामुळे वाळवंटे ही तप्त झाली म्हणून हंसाना स्वस्थता वाटेनाशी झाली ते बेचैन झाले ॥ ९९ ॥ ___ त्यावेळी सूर्य मध्यस्थ होता, आकाशाच्या मध्यभागी होता. पक्षपातरहित होता तरीही पृथ्वीला त्याने फार सन्तप्त केले. बरोबरच आहे की, दुःसह प्रताप असलेल्या व्यक्तींची मध्यस्थता देखिल तापदायकच असते. या श्लोकात मध्यस्थ शब्दाचे मध्यभागी असलेला व जे वादी प्रतिवादी यांचे ऐक्य करण्याकरिता मध्ये असलेला विद्वान् असे दोन अर्थ आहेत. वादी Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy