SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 200
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३१-६१) महापुराण (१८९ गन्धैः पुष्पैश्च धूपैश्च दीपश्च सजलाक्षतैः । फलश्च चरुभिदिव्यश्चक्रेज्यां निरवर्तयत् ॥ ५३ विजयाद्धजयेऽप्यासीदमन्दोऽस्य जयोद्यमः । उत्तरार्द्धजयाशंसां प्रत्यागर्णस्य चक्रिणः ॥ ५४ ततः प्रतीपमागत्य रौप्याद्रः पश्चिमां गहाम् । निकषा वनमारुध्य बलैरीशो न्यविक्षत ॥ ५५ दक्षिणेन तमद्रीन्द्रं मध्ये वेदिकयोर्द्वयोः । बलं निविविशे भर्तुः सिन्धोस्तटवनावहिः॥ ५६ भूयो द्रष्टव्यमत्रास्ति बह्वाश्चर्ये धराधरे । इति तत्र चिरावासं बहु मेने किलाधिराट् ॥ ५७ चिरासनेऽपि तत्रास्य नासीत्स्वल्पोऽप्युपक्षयः । प्रत्युतापूर्वलाभेन प्रभुरापूर्यताब्धिवत् ॥ ५८ कृतासनं च तत्रनं श्रुत्वा द्रष्टुमुपागमन् । पार्थिवाः पृथिवीमध्यान्मध्ये नद्योर्द्वयोः स्थिताः ॥५९ दूरानतचलन्मौलिसन्दष्टकरकुडमलाः । प्रणमन्तः स्फुचटीक्रुः प्रभौ भक्ति महीभुजः ॥ ६० कुङकुमागरुकर्पूरसुवर्णमणिमौक्तिकः । रत्नैरन्यैश्च रत्नेशं भक्त्यानचुनूपाः परम् ॥ ६१ चन्दनादिक गन्ध, फुले, धूप, दीप, जलासहित अक्षता, फले व नैवेद्य हे सर्व पदार्थ दिव्य होते. यानी भरतेशाने चक्राची पूजा केली ।। ५३ ॥ विजयाई पर्वताला भरतपतीने जरी जिंकले होते तथापि उत्तरार्द्धाला जिंकण्याची आशा भरतेशाच्या मनात होती म्हणून त्याला जिंकण्याचा त्याचा प्रयत्न शिथिल मंद झाला नव्हता. तो त्याने खूप जोराने चालू केला ॥ ५४ ॥ यानंतर त्या भरतेशाने त्या पर्वताच्या कांही पाठीमागे वळून त्या पर्वताच्या पश्चिम गुहेच्या जवळ वनाला वेढून आपल्या सैन्यासह मुक्काम केला ॥ ५५ ॥ त्या पर्वताच्या दक्षिणेकडे पर्वत आणि वन यांच्या दोन वेदिकांच्यामध्ये सिन्धु नदीच्या तटावरील वनाच्या बाहेर या भरतेशाचे सैन्य राहिले ॥ ५६ ॥ हा पर्वत अनेक आश्चर्याचे स्थान आहे. येथे पाहण्यास योग्य वस्तु पुष्कळ आहेत. म्हणून येथे आपण पुष्कळ दिवस मुक्काम करावा असे भरतेशाने ठरविले ॥ ५७ ॥ येथे जरी पुष्कळ दिवस भरतप्रभूने मुक्काम केला होता तथापि त्याला थोडाही खर्च सहन करावा लागला नाही. परन्तु समुद्राप्रमाणे अपूर्वलाभाने प्रभु भरत उत्तरोत्तर पुष्टच झाला ।। ५८॥ या पर्वतावरच भरतमहाराज पुष्कळ दिवसापासून राहिले आहेत असे कळल्यामुळे राजे पृथ्वीच्या मध्यप्रदेशामधून काही आले व काही दोन नद्यांच्यामध्ये प्रदेशात जे राहत होते ते सर्व राजे भरतेशाला पाहण्यासाठी आले ॥ ५९ ॥ दूरून नम्र झालेल्या व हलणाऱ्या किरीटावर ज्यानी आपल्या करकमलाच्या कळया स्थापन केल्या होत्या अशा राजानी प्रभु भरतेशाला नमस्कार करीत आपली त्याच्या विषयाची भक्ति स्पष्ट केली ॥ ६ ॥ केशर, अगरू-चन्दन, कापूर, सोने, रत्ने, मोती व आणखी अनेक प्रकारची रत्ने यानी त्या राजानी अतिशय भक्तीने चौदा रत्नाचा अधिपति अशा भरतराजाचा सत्कार केला ॥६१॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy