SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 217
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २०६) महापुराण (३२-२७ उपनाहादते कोऽन्यः प्रतीकारोऽनयोरिति । भिषग्वर इवारेभे सङक्रमोपक्रम कृती ॥ २७ अमानुषेष्वरण्येषु ये केचन महाद्रुमाः । स तानानाययामास दिव्यशक्त्यनुभावतः ॥ २८ सारदारुभिरुत्तम्भ्य स्तम्भानन्तर्जले स्थिरान् । स्थपतिः स्थापयामास तेषामुपरि सङक्रमम् ॥२९ बलव्यसनमाशंक्य चिरवृत्तौ स धीरधीः । क्षणाग्निष्पादयामास सङक्रम प्रभुशासनात् ॥ ३० कृतः कलकलः सैन्यनिष्ठिते सेतुकर्मणि । तदेव च बलं कृत्स्नमुत्ततार परं तटम् ॥३१ नायकैः सममन्येयुः प्रभुर्गजघंटावृतः । महापथेन तेनैव जलदुर्ग व्यलद्धयत् ॥ ३२ ततः कतिपयैरेव प्रयाणरतिवाहितः । गिरिदुर्ग विलाघ्योदग्गुहाद्वारमवासवत ।। ३३ । निरर्गलोकृतं द्वारं पौरस्त्यैरिभसाधनः । व्यतीत्य प्रभुरस्याद्रेरध्यवास वनावनिम् ॥ ३४ अधिशय्यं गुहागर्भ चिरं मातुरिवोदरम् । लब्धं जन्मान्तरं मेने निःसृतःसनिकैबहिः ॥ ३५ गुहेयमतिगृढघेव गिलित्वा जनतामिमाम् । जरणाशक्तितो नूनमुज्जगाल बहिः पुनः ॥ ३६ ____ या दोन नद्याना पुलावाचून दुसरा कोणता उपाय आहे असे बोलून त्या कुशल स्थपतिसुताराने उत्कृष्ट वैद्याप्रमाणे त्या नद्यातून पार पाडण्याच्या उद्योगाला सुरुवात केली ॥ २७ ॥ यानंतर त्याने आपल्या दिव्य शक्तीच्या सामर्थ्याने मनुष्यरहित अरण्यात जे काही मोठे वृक्ष होते ते आणविले ॥ २८॥ त्या स्थपतिरत्नाने अतिशय मजबूत अशा लाकडांचे खांब बनवून ते पाण्यात हलणार नाहीत अशा रीतीने उभे केले आणि त्यावर त्याने चालण्याचे साधन अशा फळया ठेविल्या ॥२९॥ आपण पूल बनविण्यास फार उशीर केला तर सैन्यावर संकट कोसळेल म्हणन स्थिर बुद्धीच्या त्या स्थपतिरत्नाने भरतेश्वराच्या आज्ञेने फार लौकर सेतूची रचना केली॥३०॥ पूल तयार झाला असता सैन्याने आनंदाने फार कलकलाट केला व नंतर ते सर्व सैन्य त्या नद्यांच्या दुसऱ्या किनाऱ्यावर उतरले ॥ ३१ ॥ ___ मग दुसरे दिवशी हत्तींच्या समुदायाने वेढलेल्या भरतप्रभूने त्याच महामार्गाने जलरूपी संकट उल्लंधिले ॥ ३२ ॥ यानंतर काही दिवस प्रयाण करून पर्वताच्या संकटास उल्लंघून तो भरतप्रभु उत्तरेकडील गुहेच्या द्वाराजवळ आला ।। ३३ ।। तेथे पुढे असलेल्या हत्तीच्या सैन्याने त्या गुहेचे द्वार उघडे केले व ती गुहा ओलांडून या विजयार्धपर्वताच्या वनभूमीवर प्रभु भरताने निवास केला ।। ३४ ॥ मातेच्या उदराप्रमाणे त्या गुहेच्या आतील भागात पुष्कळ दिवस राहून बाहेर आलेल्या सैनिकानी आपला पुनर्जन्म झाला असे जणु मानले ॥ ३५ ।।। ___ या गुहेने अतिशय अधाशीपणाने या सैन्याला जणु गिळले होते पण पचविण्यास असमर्थ झाल्यामुळे जणु तिने त्या सैन्याला पुनः बाहेर टाकिले की काय असे ते सैन्य भासू लागले ॥ ३६॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy