SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 660
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४६-२१०) महापुराण (६४९ अथं कायमः कान्तावततीततिवेष्टितः । जरित्वा जन्मकान्तारे कालाग्निग्रासमाप्स्यति ॥ २११ यदि धर्मकणादित्थं निदानविषदूषितात् । सुखं धर्मामृताम्भोधिमज्जनेन किमुच्यते ॥ २१२ अबोधद्वेषरागात्मा संसारस्तद्विपर्ययः । मोक्षश्चेद्वीक्षितो विद्भिः कः क्षेपो मोक्षसाधने ॥ २१३ यदि देशादिसाकल्ये न तपस्तत्पुनः कुतः । मध्यर्णवं यतो वेगात्कराग्रच्युतरत्नवत् ॥ २१४ आत्मन् स्वं परमात्मानमात्मन्यात्मानमात्मना । हित्वा दुरात्मतामात्मनीनेऽध्वनि चरन्कुरु ॥२१५ इति सञ्चिन्तयन्गत्वा पुरं परमतत्त्ववित् । सुवर्णवर्मणे राज्यं साभिषेकं वितीर्य सः ॥ २१६ अवतीर्य महीं प्राप्य श्रीपुरं श्रीनिकेतनम् । दीक्षां जैनेश्वरी प्राप श्रीपालगुरुसन्निधौ ॥ २१७ परिग्रहग्रहान्मुक्तो दीक्षित्वा स तपोंशुभिः । हिरण्यवर्मधर्माशुनिर्मलो व्यधुतत्तराम् ॥ २१८ स्त्रीरूपी वेलीने वेष्टित झालेला हा शरीररूपी वृक्ष संसाररूपी अरण्यात जीर्ण होऊन यमरूपी अग्नीचा घास होणार आहे ।। २११ ॥ निदानरूपी विषाने दूषित अशा धर्मकणाने जर याप्रमाणे सुख मिळते तर धर्मामृतसमुद्रात स्नान करण्याने सुख होईलच या विषयी सांगणे नकोच. ( कुबेरमित्रवैश्याने मुनीना जेव्हा दान दिले त्यावेळी या कबूतरांच्या जोडीने त्या दानाला अनुमोदन दिले व या कबूतराच्या जोडीने आकाशातून जात असलेल्या विद्याधराचे विमान पाहिले व आम्हाला विद्याधर कुळात जन्म मिळावा असे निदान केले असा कथासंबंध येथे समजावा.) ॥ २१२॥ ___ अज्ञान, द्वेष, राग इत्यादि दुर्भावांनी हा संसार भरला आहे आणि मोक्ष, केवलज्ञान, निर्मोहना व वीतरागता यानी युक्त आहे. असे विद्वानांनी पाहिले आहे तर त्या मोक्षाची प्राप्ति करून घेण्यामध्ये विद्वानांनी का विलंब करावा ? ॥ २१३ ।। जर द्रव्य, क्षेत्र, काल व भाव ही सामग्री पूर्ण प्राप्त झाली असता तप करावयाचे नाही तर मग ते पुनः केव्हां करणार? जसे समुद्रातून वेगाने जात असता हातातून रत्न गळून पडले असता ते पुनः प्राप्त होणे शक्य नसते. तसे ही देशादिसामग्री मिळाली असताना जर तप केले नाही तर पुनः ही सामग्री मिळणार नाही असा विचार करून तप करावे ॥ २१४ ॥ यासाठी हे आत्म्या, तूं आपली दुष्ट आत्मरूपता सोडून दे आणि आपल्या आत्म्याच्याद्वारे आपल्याच आत्म्यात परमात्मस्वरूपी आपल्या आत्म्याचा स्वीकार कर ॥ २१५ ।। या प्रकारे विचार करणारा तत्त्व जाणणारा तो हिरण्यवर्म आपल्या नगरात आला व त्याने आपल्या सुवर्णवर्म पुत्राला राज्याभिषेक करून राज्य दिले ॥ २१६ ।। यानंतर तो विजयाध पर्वतावरून खाली पृथ्वीवर लक्ष्मीचे जणु घर अशा श्रीपुरनगरात आला. तेथे त्याने श्रीपालगुरूंच्या जवळ जिनेश्वराची दीक्षा घेतली. परिग्रहरूप पिशाचापासून मुक्त होऊन ज्याने दीक्षा धारण केली आहे असा तो हिरण्यवर्मारूपी निर्मलसूर्य तपरूपी किरणानी अतिशय चमकू लागला ॥ २१७-२१८ ।। म. ८५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy