________________
५५४)
महापुराण
(४४-२५
विपर्यासे विपर्येति भवतामनुवर्तनात् । वर्तते सृष्टिरेषा हि व्यक्तं युष्मासु तिष्ठते ॥ २५ गुणाः क्षमादयः सर्वे ध्यस्तास्तेषु क्षमादिषु । समस्तास्ते जगवृद्धौ चक्रिणि त्वयि च स्थिताः ॥२६ च्यवन्ते स्वस्थितेः काले क्वचित्तेऽपि क्षमादयः। न स कालोऽस्ति यः कर्ता प्रच्युतेर्युवयोः स्थितेः॥२७ सृष्टिः पितामहेनेयं सृष्टतां तत्समपिताम् । पाति सम्राट् पिता तेद्य तस्यास्त्वमनुपालकः ॥ २८ देवमानुषबाधाभ्यः क्षतिः कस्यापि या क्षितौ । ममैवेयमिति स्मृत्वा समाधेया त्वयैव सा ॥ २९ क्षतात्रायत इत्यासीत्क्षत्रोऽयं भरतेश्वरः । सुतस्तस्यौरसो ज्येष्ठः क्षत्रियस्त्वं तदादिमः ॥ ३० त्वत्तो न्यायाः प्रवर्तन्ते नूतना ये पुरातनाः । तेऽपि त्वत्पालिता एव भवन्त्यत्र पुरातनाः ॥ ३१ सनातनोऽस्ति मार्गोऽयं श्रुतिस्मृतिषु भाषितः । विवाहविषिभेदेषु वरिष्ठो हि स्वयंवरः ॥ ३२ यदि स्यात्सर्वसम्प्रार्थ्या कन्यका पुण्यभाजनम् । अविरोधो व्यधाय्यत्र देवायत्तो विषिर्बुधः ॥ ३३
हे युवराज, तुमच्यात विपर्यास-बिघाड झाला म्हणजे या सृष्टीतही बिघाड होतो. सुम्ही अनुकूल वागू लागलात म्हणजे ही सृष्टि सुस्थितीत राहते. कारण ही तुमच्यावर अवलम्बून आहे ॥ २५ ॥
पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य इत्यादिकामध्ये क्षमादिकगुण निरनिराळे रूपाने राहिले आहेत. म्हणजे एकेक ठिकाणी एकेक गुण राहिला आहे. पण या जगाचे कल्याणाकरिता ते क्षमादिक सगळे गुण तुझा पिता आणि तुझ्या ठिकाणी राहिले आहेत ॥ २६ ।।
एखादेवेळी ते क्षमादिक गुणही आपल्या स्थितीपासून भ्रष्ट होतात परंतु तो काल यावेळी नाही जो की तुम्हा दोघांच्या स्थितीचा नाश करणारा होईल. यास्तव आपण क्षमादिक गुण सोडू नयेत ॥ २७ ॥
हे युवराज, तुझ्या आजोबानी या सृष्टीची रचना केली आहे व ती त्यानी तुझ्या पित्याला दिली आहे. आज तुझा पिता सम्राट् आहे व तो तिचे पालन करीत आहे. यानन्तर तू तिचा रक्षणकर्ता होशील ।। २८ ।।
या पृथ्वीवर जर देवापासून किंवा मनुष्यापासून बाधा होऊन कोणाचे नुकसान झाले तर ते माझेच झाले असे समजून त्याचा प्रतीकार केला पाहिजे ॥२९॥
हा भरतराजा प्रजेचे क्षतात्-संकटापासून त्रायते रक्षण करतो म्हणून तो क्षत्र आहे व तू त्याचा औरस व ज्येष्ठ पुत्र आहेस. म्हणून तू पहिला क्षत्रिय आहेस ।। ३० ।।
हे युवराज, तुझ्यापासूनच हे नवीन न्याय चालू होणार आहेत आणि जे प्राचीन न्यायनीतिमार्ग आहेत ते सर्व तू राखलेस तर ते पुरातन म्हणून- प्राचीन म्हणून राहतील ॥ ३१ ॥
विवाहविधीचे जे भेद आहेत त्यात स्वयंवर हा विवाहभेद सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आगमात व स्मृतीमथ्ये सांगितला आहे म्हणून हा सनातन आहे ॥ ३२ ।।
. जर एखाद्या पुण्यपात्र कन्येला सर्व इच्छू लागले तर विद्वान् लोकानी त्यावेळी विरोध दूर करण्याकरिता केवळ भाग्याधीन हा स्वयंवरविधि मानला आहे ॥ ३३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org