________________
२५-१९७)
महापुराण
देवदेवो जगन्नाथो जगबन्धर्जगद्विभुः । जगद्धितषी लोकज्ञः सर्वगो जगदग्रजः ॥ १९५ चराचरगुरुर्गोप्यो गूढात्मा गूढगोचरः । सद्योजातः प्रकाशात्मा ज्वलज्ज्वलनसप्रभः ॥ १९६ मादित्यवर्णो भर्माभः सुप्रभः कनकप्रभः । सुवर्णवर्णो रुक्माभः सूर्यकोटिसमप्रभः ॥ १९७
आहेत, पापरहित आहेत ।। २५ ॥ विकलङ्क- विगत-नष्ट झाला आहे कलङ्क-अपवाद ज्यांच्यापासून असे प्रभु विकलङ्क-निष्कलङ्क आहेत ।। २६ ॥ कलातीत- कला-शरीर ते प्रभूचे अतीतरहित झाले आहे अर्थात् शरीरबंधाने रहित असे प्रभु कलातीत आहेत ॥ २७ ॥ कलिलन्नकलिल-पपांचा नः नाश करणारे प्रभु कलिलघ्न होत ।। २८ ॥ कलाधर- बहात्तर कला धारण करणारे प्रभु कलाधर होत ।। २९ ॥
देवदेव- देवानां इन्द्रादीनां- देवः प्रभुः इन्द्रादिक देव ज्यांची आराधना करतात असे आदिप्रभु देवदेव आहेत. अथवा देव म्हणजे राजे त्यांचेही भगवान् देव आहेत म्हणजे राजाधिराज आहेत. अथवा देव- मेघकुमार देवांना प्रभु-भगवन्त देव आहेत म्हणजे परमाराध्य आहेत ॥३०॥ जगन्नाथ- आदिभगवान त्रिलोकस्वामी आहेत म्हणून ते जगन्नाथ आहेत ।। ३१ ॥ जगद्वन्धुभगवान् त्रैलोक्याचे बन्धु, हितकर्ते आहेत ॥ ३२ ॥ जगद्विभु- जगताचे-त्रैलोक्याचे भगवान् विभु स्वामी आहेत ॥ ३३ ॥ जगद्धितैषी- जगतातील प्राण्यांच्या हिताची इच्छा करणारे ॥ ३४ ॥ लोकज्ञ- अनन्तानन्तरूप आकाशाच्या बहुमध्यभागी घनोदधिवात, घनवात आणि तनुवात या तीन वातवलयांनी वेष्टित व अनादिनिधन अकृत्रिम, निश्चल आणि असंख्यात प्रदेशांचे हे त्रैलोक्य आहे त्याचे स्वरूप भगवान् जाणतात म्हणून ते लोकज्ञ आहेत ॥ ३५ ॥ सर्वग- सर्व पदार्थाकडे भगवान् जातात म्हणजे सर्व पदार्थाना जाणतात म्हणून ते सर्वग आहेत ।। ३६ ॥ जगदग्रज- जगतांचे अग्र म्हणजे त्रैलोक्यशिखर त्यावर जे उत्पन्न झालेले, विराजमान झालेले प्रभु जगदग्रज आहेत ।। ३७ ॥ चराचरगुरु- चर त्रसादि प्राणी व अचर स्थावर अशा प्राण्यांचा-मनुष्यादि प्राण्यांचा व अमनुष्यादि प्राण्यांचा गुरु प्रभु आहेत शास्ता आहेत त्यांच्या स्वरूपाचे कथन करणारे आहेत ॥ ३८ ॥ गोप्य- अतिशय सावधानपणाने हृदयात भक्तांनी सुरक्षित राखले जातात म्हणून प्रभु गोप्य आहेत ॥ ३९ ॥ गूढात्मा- गूढ स्वरूपाचे धारक प्रभु गूढात्मा आहेत ॥ ४० ॥ गूढगोचर- ज्यांची इन्द्रिये गूढ आहेत, गुप्त आहेत असे प्रभु गूढगोचर होत ।। ४१ ॥ सद्योजात- स्वर्गातून उतरून मातेच्या गर्भात उत्पन्न झाल्यामुळे प्रभु सद्योजात आहेत ।। ४२ ।। प्रकाशात्मा- प्रभुंचा आत्मा ज्ञानप्रकाशाने युक्त आहे ॥ ४३ ।। ज्वलज्ज्वलनसप्रभ- ज्वालायुक्त अग्नीप्रमाणे कान्ति ज्यांची आहे असे प्रभु ज्वलज्ज्वलनसप्रभ या नावाने शोभतात ॥ ४४॥
___ आदित्यर्ण- सूर्याप्रमाणे वर्ण-कान्ति प्रभूची आहे म्हणून ते आदित्यवर्ण आहेत ॥४५।। भर्माभ- भर्म-सुवर्णाची कान्ति प्रभूला आहे म्हणून ते भर्माभ आहेत ॥ ४६ ॥ सुप्रभ-सुशोभायुक्त, कोटिचन्द्र व कोटि सूर्याप्रमाणे प्रभा असूनही डोळ्यांना प्रिय वाटणारी कान्ति ज्याची आहे असे प्रभु सुप्रभ होत ॥ ४७ ॥ कनकप्रभ- कनक-सोन्याप्रमाणे कान्ति प्रभूची
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org