SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 325
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३१४) महापुराण (३५-२४३ स जयति जिनराजो दुविभावप्रभावः । प्रभुरभिभवितुं पं नाशकन्मारवीरः॥ दिविजविजयदूरारूढगर्वोऽपि गवं न हृदि हृदिशयोऽधाद्यत्र कुण्ठास्त्रवीर्यः ॥ २४३ जयति तरुरशोको दुन्दुभिः पुष्पवर्षम् । चमररुहसमेतं विष्टरं सैंहमुद्धम् ॥ वचनमसममुच्चरातपत्रं च तेजस्त्रिभुवनजयचिह्नं यस्य सार्वो जिनोऽसौ ॥ २४४ जयति जननतापच्छेदि यस्य क्रमाब्ज, विपुलफलदमारान्नम्रनाकीन्द्रभङगम् ॥ समुपनतजनानां प्रीणनं कल्पवृक्षस्थितिमकृतमहिम्ना सोऽवतात्तीर्थकृतः ॥ २४५ नवर भरतराजोप्यूजितस्यास्य युष्मद्भुजपरिघयुगस्य प्राप्नुयानैव कक्षाम् ॥ भुजबलमिदमास्तां दृष्टिमात्रेऽपि कस्ते रणनिकषगतस्य स्थातुमीशः क्षितीशः ॥ २४६ तदलमधिप, कालक्षेपयोगेन निद्राम् । जहिहि महति कृत्ये जागरूकस्त्वमेधि ॥ सपदि च जयलक्ष्मी प्राप्य भूयोऽपि देवं । जिनमवनम भक्त्या शासितारं जयाय ॥ २४७ ___ ज्याना जिंकण्यास मदनवीर समर्थ झाला नाही व ज्याचा प्रभाव जाणण्यास योग्य नाही, देवावर विजय मिळविल्यामुळे ज्याला गर्व फारच वाढला आहे असा मदन देखिल ज्या प्रभूवर आपल्या अस्त्राचे सामर्थ्य चालवू शकला नाही. त्याचे अस्त्रसामर्थ्य कुण्ठित झाले, त्यामुळे तो गर्वरहित झाला. असा हा जिननाथ उत्कर्ष पावत आहे ।। २४३ ॥ अशोक वृक्ष, देवांचे नगारे, पुष्पवृष्टि, चामरानी सहित असे उत्कृष्ट सिंहासन, इतरापेक्षा वेगळी उपमारहित अशी दिव्य वाणी, उंच असे छत्र आणि भामण्डल ही त्रिभुवनावर विजय मिळविल्याची चिह्ने ज्यांच्याजवळ आहेत व जे सर्वांचे हित करतात असे श्रीजिन उत्कर्ष पावत आहेत ॥ २४४ ।। ज्यांचे चरणकमल पुनः पुनः जन्मण्याने होणाऱ्या संतापाचा नाश करणारे आहे व विपुल सुखफल देणारे आहे व ज्यांच्या चरणकमलाजवळ इन्द्रादिक भुंग्यांचा समूह नम्र झाला आहे आणि ज्यांचे चरणकमल नम्र झालेल्या भक्ताना आनंदित करणारे व कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित पूर्ण करणारे आहे असे ते आदिजिनेश्वर आपल्या माहात्म्याने तुमचे रक्षण करोत ॥ २४५ ॥ हे पुरुषश्रेष्ठा, भरतराजा देखिल अतिशय बलिष्ठ अशा तुमच्या दोन बाहुरूपी अगळीची बरोबरी करू शकत नाही. हे आपले बाहुबल बाजूला राहू द्या. पण युद्धाच्या कसोटीला प्राप्त झालेल्या आपल्या दृष्टीपुढे देखिल कोणता राजा उभा राहण्यास समर्थ आहे बरे? ॥ २४६ ॥ म्हणून हे राजन्, आता व्यर्थ काल घालविणे पुरे, झोपेचा त्याग करा आणि महत्त्वाच्या कार्यात सावधपणा ठेवा, लौकरच जयलक्ष्मीला प्राप्त होऊन म्हणजे जय मिळवून पुनः भक्तीने जय मिळविण्यासाठी सर्व जगाचे धर्मोपदेशाने रक्षण करणान्या प्रकाशमान जिनदेवास नमस्कार करा ।। २४७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy