________________
३८-९५)
महापुराण
(३७९
द्वादशाहात्परं नामकर्म जन्मदिनान्मतम् । अनुकूले सुतस्यास्य पित्रोरपि सुखावहे ॥ ८७ यथाविभवमष्टं देवर्षिद्विजपूजनम् । शस्तं च नाम ध्येयं तत्स्थाप्यमन्वयवृद्धिकृत् ॥ ८८ अष्टोत्तरसहस्राद्वा जिननामकदम्बकात् । घटपत्रविधानेन ग्राह्यमन्यतमं शुभम् ॥ ८९
इतिनामकर्म। बहिर्यानं ततो द्विमसिस्त्रिचतुरैरुत । ययानुकूल मिष्टेऽह्नि कार्य तूर्यादिमङ्गलैः ॥ ९० ततः प्रभृत्यभीष्ठं हि शिशोः प्रसववेश्मन । बहिः प्रणयनं मात्रा धान्युत्सङ्गगतस्य वा ॥ ९१ तत्रबन्धुजनादर्थलाभो यः पारितोषिकः । स तस्योत्तरकालेऽर्यो धनं पित्र्यं यदाप्स्यति ॥ ९२
इति बहिर्यानम् । ततः परं निषद्यास्य क्रिया बालस्य कल्प्यते । तद्योग्ये तस्य आस्तीणं कृतमङ्गलसन्निधौ ॥ ९३ सिद्धार्चनादिकः सर्वो विधिः पूर्ववदत्र च । यतो दिव्यासनाहत्वमस्य स्यादुत्तरोत्तरम् ॥ ९४
इति निषद्या। गते मासपृथक्त्वे च जन्माद्यस्य यथाक्रमम् । अन्नप्राशनमाम्नातं पूजाविधिपुरःसरम् ॥ ९५
इति अन्नप्राशनम् । १०
जन्म दिवसापासून बारा दिवस झाल्यानन्तर अनुकूल दिवशी माता-पिता व पुत्राला त्या सुखदायक अशा दिवशी बालकाचा नामकर्म विधि करावा, अर्थात् बालकाचे नाव ठेवावे. त्यावेळी आपल्या वैभवाला अनुसरून अरिहन्त, मुनि आणि द्विजांचे पूजन करावे व बालकाचे वंशवृद्धीला कारण असे प्रशंसनीय नांव ठेवावे. अथवा जिनेश्वराचा एक हजार आठ नावे कागदाच्या एक हजार आठ तुकड्यावर एक एक नांव लिहावे व त्या कागदांच्या गोळ्या एक घटात भराव्यात व एखादा अजाण बालक किंवा बालिका यांच्या हाताने त्यातून एक गोळी काढावी व ती उकलून जे नांव त्यात लिहिलेले असेल ते त्या बालकाचे नांव ठेवावे. हा नामकर्म विधि सातवा झाला ।। ८७-८९ ॥
यानंतर दोन तीन महिन्यानी किंवा तीन चार महिन्यानी अनुकूल अशा दिवशी त्या बालकाला वाजत गाजत प्रसूति घरातून बाहेर मातेसह न्यावे किंवा धात्रीच्या-दायीच्या ओटीमध्ये असलेल्या त्या बालकास दायीसह बाहेर ग्यावे. त्यावेळी त्या बालकाला जो पारितोषिक म्हणून धनलाभ होईल ते धन त्या बालकाला जेव्हा तो आपल्या पित्याच्या धनाचा अधिकारी होईल तेव्हा ते त्याला द्यावे. अशीही बहिर्यान क्रिया आठवी होय ॥९०-९२॥
यानंतर त्या बालकाची निषद्या क्रिया-बालकाला बसविण्याची क्रिया करतात. ती अशी- त्याच्याजवळ मंगलद्रव्ये- आरसा, झारी, कुंभ वगैरे स्थापन करावीत. अशा बालकास योग्य आसनावर बसवावे. या क्रियेत सिद्ध पूजादिक सर्वविधि पूर्वीप्रमाणेच करावा.ज्यामुळे त्याला उत्तरोत्तर दिव्य आसनावर बसण्याची योग्यता प्राप्त होईल. ही निषद्या-नामक क्रिया ९ वी होय ।। ९३-९४ ।।
जन्मापासून सात आठ महिने संपल्यानंतर या बालकाचा क्रमाने अन्नप्राशन नांवाचा संस्कार पूजा विधीने युक्त असा करावा. हा दहावा संस्कार होय ।। ९५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org