________________
३८-१९४)
महापुराण
(३८९
ततो निःशेषमाहारं शरीरं च समुत्सृजन् । योगीन्द्रो योगनिर्वाणसाधनायोद्यतो भवेत् ॥ १८६ उत्तमार्थे कृतास्थानः संन्यस्ततनुरुद्धधीः । ध्यायन्मनोवचःकायान्बहिर्भूतान्स्वकान्स्वतः ॥ १८७ प्रणिधाय मनोवृत्ति पदेषु परमेष्ठिनाम् । जीवितान्ते स्वसात्कुर्याद्योगनिर्वाणसाधनम् ॥ १८८ योगः समाधिनिर्वाणं तत्कृता चित्तनिर्वृतिः । तेनेष्टसाधनं यत्तद्योगनिर्वाणसाधनम् ।। १८९
इति योगनिर्वाणसाधनम् ॥ ३२ तथा योगं समाधाय कृतप्राणविसर्जनः । इन्द्रोपपादमाप्नोति गते पुण्ये पुरोगताम् ॥ १९० इन्द्राःस्युस्त्रिदशाधीशास्तेषत्पादस्तपोबलात् । यः स इन्द्रोपपादः स्यात् क्रियाहन्मार्गसेविनाम्॥१९१ ततोऽसौ दिव्यशय्यायां क्षणादापूर्णयौवनः । परमानन्दसाद्भुतो दीप्तो दिव्येन तेजसा ॥ १९२ अणिमादिभिरष्टाभिर्युतोऽसाधारणैर्गुणैः । सहजाम्बरदिव्यस्रङमणिभूषणभूषितः ॥ १९३ दिव्यानुभावसम्भूतप्रभावं परमुद्वहन् । बोबुध्यते तदात्मीयमैन्द्रं दिव्यावधित्विषा ॥ १९४
इति इन्द्रोपपादक्रिया ॥ ३३
यानंतर संपूर्ण आहार व शरीराचा त्याग करणारा तो योगीन्द्र योगनिर्वाणसाधनासाठी उद्युक्त होतो. तो योगी उत्तमार्थ म्हणजे संन्यास त्यात आदरबुद्धि धारण करून अतिशय निर्मल बुद्धीने शरीरावरची ममत्वबुद्धि सोडून देतो. माझ्या आत्म्यापासून मन, वचन आणि शरीर ही भिन्न आहेत असे चिन्तन करतो व आपली मनोवृत्ति - मनाची एकाग्रता अहंदादि पंचपरमेष्ठींच्या चरणात स्थिर करतो. अशा रीतीने जीविताच्या अन्ती-मरणसमयी योगनिर्वाण साधनाची तो प्राप्ति करून घेतो. योग म्हणजे समाधि, त्या समाधीच्या द्वारे निर्वाण म्हणजे चित्ताला जो आनंद प्राप्त होतो त्याने इष्टपदाची सिद्धि-प्राप्ति करून घेता येते म्हणून त्यास योगनिर्वाणसाधन म्हणतात. ही योगनिर्वाणसाधन क्रिया ३२ वी आहे ॥ १८६-१८९ ।।।
यानंतर मन, वचन व शरीराच्या प्रवृत्तीना स्थिर करून तो मुनिराज प्राणविसर्जन करतो आणि त्याचे पुण्य पुढे जाते व त्याला इन्द्रपदाची प्राप्ति होते. इन्द्र हे देवांचे स्वामी आहेत. तपांच्या सामर्थ्याने त्या इन्द्रपदामध्ये त्या योगिराजाची उत्पत्ति होते. अरिहन्ताच्या मोक्षमार्गाचे सेवन करणान्याची ही क्रिया आहे. यानंतर तो योगिराज थोड्याच वेळात दिव्य शय्येवर पूर्ण तारुण्याने उत्पन्न होतो, अत्यन्त आनन्दमय होतो व दिव्यतेजाने तो तळपतो. तो अणिमा, महिमादिक आठ असाधारण गुणानी युक्त होतो. जन्माबरोबरच उत्पन्न झालेले दिव्यवस्त्र, पुष्पमाला आणि रत्नभूषणानी भूषित होतो. दिव्य अशा सामर्थ्याने उत्पन्न झालेला जो प्रभाव त्याला धारण करून तो जागृत होतो व दिव्य अशा अवधिज्ञानाने आपणास इन्द्र पद प्राप्त झाले आहे असे तो जाणतो. याप्रमाणे इन्द्रोपपादक्रिया ३३ वी आहे ।। १९०-१९४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org