SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 401
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३९०) महापुराण (३८-१९५ ......... पर्याप्तमात्र एवायं प्राप्तजन्मावबोधनः । पुनरिन्द्राभिषेकेण योज्यतेऽमरसत्तमः ॥ १९५ दिव्यसङ्गीतवादित्रमङ्गलोद्गीतिनिःस्वनः । विचित्रैश्चाप्सरोनृत्तनिवृत्तेन्द्राभिषेचनः ॥ १९६ तिरीटमुद्वहन्दीघ्रं स्वःसाम्राज्यकलाञ्छनम् । सुरकोटिभिरारूढप्रमदर्जयकारितः ॥ १९७ स्रग्वी सदंशुको दोप्रैर्भूषितो दिव्यभूषणः । ऐन्द्रविष्टरमारूढो महानेष महीयते ॥ १९८ इति इन्द्राभिषेकः ॥ २४ ततोऽयमानतानेतान्सत्कृत्य सुरसत्तमान् । पदेषु स्थापयन्स्वेषु विधिदाने प्रवर्तते ॥ १९९ स्वविमानद्धिदानेन प्रीणितैविबुधैर्वृतः । सोऽनुभुङक्ते चिरं कालं सुकृती सुखमामरम् ॥ २०० तदेतद्विषिदानेन्द्रसुखोदयविकल्पितम् । क्रियाद्वयं समाम्नातं स्वर्लोकप्रभवोचितम् ॥ २०१ इति विधिदानसुखोदयौ ॥ ३५॥३६ प्रोक्तास्त्विन्द्रोपपादाभिषेकदानसुखोदयाः । इन्द्रत्यागाख्यमघुना सम्प्रवक्ष्ये क्रियान्तरम् ॥ २०२ जेव्हा त्या इन्द्राच्या आहारादिक सहा पर्याप्ति पूर्ण होतात तेव्हा त्याला आपला जन्म यथे कसा झाला याचे ज्ञान होते. यानंतर त्याचा श्रेष्ठ असे देव इन्द्राभिषेक करतात. त्यावेळी दिव्य संगीत नृत्य होते, वाद्ये वाजविली जातात व मंगलगायने गायिली जातात. इन्द्राच्या जयजयकाराचे शब्द वारंवार उच्चारले जातात. अप्सरांचे नृत्यांचे अनेक प्रकार होतात. अशा रीतीने इन्द्राचा अभिषेकविधि केल्यानंतर स्वर्गीय साम्राज्याचे मुख्य चिह्न असा तेजस्वी मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवतात. तो धारण जेव्हा इन्द्र करतो त्यावेळी कोटयवधि देव आनंदित होऊन त्याचा वारंवार जयजयकार करतात. त्यावेळी आपल्या गळ्यात तो हार धारण करतो. उत्तम वस्त्र धारण करतो आणि दिव्य अशा अलंकारानी तो भूषित होतो आणि इन्द्राच्या आसनावर आरूढ होतो. याप्रमाणे हा महात्मा पूजिला जातो. याप्रमाणे इंद्राभिषेक क्रिया ३४ वी झाली ।। १९५-१९८ ॥ यानंतर तो इन्द्र नम्र झालेल्या त्या श्रेष्ठ देवाना आपआपल्या पदावर नियक्त करतो. अशा रीतीने तो इन्द्र विधिदान क्रियेत प्रवृत्त होतो. आपआपल्या विमानांची संपदा देऊन इन्द्र त्या देवाना संतुष्ट करतो. संतुष्ट अशा देवानी घेरलेला तो पुण्यवान् इन्द्र दीर्घ कालपर्यंत देवसुखाचा अनुभव घेत राहतो. याप्रमाणे स्वर्गात उत्पन्न झालेल्या देवाना योग्य असलेल्या विधिदान व सुखोदय नांवाच्या दोन क्रिया सांगितल्या. विधिदान ही ३५ वी क्रिया व सुखोदय ही छत्तीसावी क्रिया अशा दोन क्रियांचे वर्णन केले आहे ॥ १९९-२०१॥ इन्द्रोपपाद, अभिषेक, दान, सुखोदय या क्रियांचे वर्णन केले. आता 'इन्द्रत्याग' या क्रियेचे वर्णन मी करतो- जेव्हा स्वर्गाचा राजा अशा इन्द्राचे आयुष्य काही थोडेसे उरते तेव्हा आता आपणास या स्वर्गाहून खाली अवतरावे लागेल हे जाणतो व तो देवाना याप्रमाणे उपदेश करतो. हे देवानो, तुमचे आमच्याकडून दीर्घकालपर्यन्त पालन केले गेले आहे. काही देवांना मी पित्याप्रमाणे मानले व काहींचे पुत्राप्रमाणे आम्ही लालनपालन केले आहे. काही देवाना आम्ही पुरोहित, मन्त्री, अमात्य या पदावर योजले आहे. कित्येक देवाना आम्ही मित्र व कित्येक देवाना पीठमर्द-खुषमस्कऱ्यांच्या स्थानी योजले होते व कित्येक देवाना आमच्या प्राणासारखे Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy