________________
४१-६४)
महापुराण
(४६७
तथेदमपि मन्तव्यमद्यत्वे गुणवत्तया । पुंसामाशयवैषम्यात्पश्चाद्यद्यपि दोषकृत् ॥ ५७ इदमेवं गतं हन्त यच्च ते स्वप्नदर्शनम् । तदप्येष्यधुगे धर्मस्थितिहासस्य सूचनम् ॥५८ ते च स्वप्ना द्विधाम्नाता स्वस्थास्वस्थात्मगोचराः। समैस्तु धातुभिः स्वस्था विषमैरितरे मताः ॥५९ तथ्याः स्युः स्वस्थसन्दृष्टा मिथ्या स्वप्ना विपर्ययात् । जगत्प्रतीतमेतद्धि विद्धि स्वप्नविमर्शनम् ॥६० स्वप्नानां द्वैतमस्त्यन्यद्दोषदेवसमुद्भवम् । दोषप्रकोपजा मिथ्या तथ्याः स्युर्देवसम्भवाः ॥ ६१ कल्याणाङ्गस्त्वमेकान्ताद्देवताधिष्ठितश्च यत् । न मिथ्या तदिने स्वप्ना फल मेषां निबोध मे ॥ ६२ दृष्टाः स्वप्ने मृगाधीशा ये त्रयोविंशतिप्रमाः । निःसपत्नां विहत्येमां मां क्ष्माभत्कूटमाश्रिताः॥६३ तत्फलं सन्मति मुक्त्वा शेषतीर्थकरोदये । दुर्नयानामनुभूतिख्यापनं लक्ष्यतां स्फुटम् ॥ ६४
__ तसेच ही ब्राह्मणसृष्टि काही पुरुषांची अन्तःकरणे दुष्ट बनल्यामुळे कालान्तरी दोष उत्पन्न करणारी होईल तरीही आज या ब्राह्मणसृष्टीत गुण असल्यामुळे ती चांगली आहे असेच मानले पाहिजे ॥ ५७ ।।
हे वत्सा, हे तुझ्या ब्राह्मणसृष्टिसंबंधी कार्याचे विवेचन झाले. आता जे तुला स्वप्नदर्शन झाले ते देखिल येणाऱ्या कलिकाली धर्माच्या स्थितीचा हास होईल याचे सूचक आहे असे समज ।। ५८॥
ती स्वप्ने दोन प्रकारची सांगितली आहेत. स्वस्थ आत्म्याला दिसणारी स्वप्ने व अस्वस्थ आत्म्याला दिसणारी स्वप्ने. वात, पित्त व कफ हे समान सारख्या-प्रमाणाचे असताना दिसणारी स्वप्ने स्वस्थ आत्म्याची जाणावीत व हे धातु समान नसताना कमी जास्त प्रमाणाचे असताना दिसणारी स्वप्ने ती अस्वस्थ आत्म्याची होत ।। ५९ ।।
ज्याचे स्वास्थ्य चांगले आहे अशा मनुष्याने पाहिलेली स्वप्ने खरी असतात व अस्वस्थ प्रकृतीच्या मनुष्याने पाहिलेली स्वप्ने खोटी. अशा रीतीचा स्वप्नाचा विचार जगत्प्रसिद्ध आहे असे हे वत्सा तू समज ।। ६० ॥
पुनः स्वप्नाचे आणखी दोन प्रकार आहेत. दोषापासून पडलेली स्वप्ने व देवापासून पडलेली स्वप्ने. जी दोषप्रकोपाने स्वप्ने पडतात ती स्वप्ने खोटी असतात व दैवामुळे उत्पन्न होणारी स्वप्ने खरी असतात ।। ६१ ।।
हे वत्सा तुझा देह शुभलक्षणानी युक्त असल्यामुळे तू सर्वथा कल्याणयुक्त देहाचा आहेस व तुझ्या ठिकाणी देवतांचा वास आहे म्हणून. तुला जी स्वप्ने पडली आहेत ती खोटी नाहीत व त्यांचे फल तू मजपासून जाणून घे. अर्थात् त्यांचे फल मी सांगतो ते ऐक ॥ ६२ ।।
पहिल्या स्वप्नात तू तेवीस सिंह पाहिले आहेस. ते या विरोधरहित पृथ्वीवर निष्प्रतिबंध विहार करून पर्वताच्या शिखरावर चढलेले तू पाहिलेस त्यांचे फल असे आहेशेवटचे श्रीसन्मति - महावीर तीर्थकराशिवाय बाकीच्या तेवीस तीर्थकरांच्या उत्कर्षकाली दुर्मतांची उत्पत्ति होणार नाही असे तू स्पष्ट समज ॥ ६३-६४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org