________________
४०)
महापुराण
(२५-१५९
मवाध्वरधरो पर्यो महौदार्यो महिष्ठवाक् । महात्मा महसां धाम महषिर्महितोदयः ॥ १५९ महाफ्लेशाङकुशः शूरो महाभूतपतिर्गुरुः । महापराक्रमोऽनन्तो महाक्रोधरिपुर्वशी ॥ १६० महाभवाब्धिसन्तारी महामोहाद्रिसूदनः । महागुणाकरः क्षान्तो महायोगीश्वरः शमी ॥ १६१
महाकारुणिक- सर्वजीवाविषयी महादयाळ ।। १७ । मन्ता- मनुते जानातीति सर्व चराचरांना जाणणारे प्रभु मन्ता होत ॥ १८॥ महामन्त्र- ज्यांचा गुप्तवाद फार मोठा आहे. अशा प्रभुंना महामन्त्र असे म्हणतात ॥ १९ ॥ महायति- जे रत्नत्रय निरतिचारपणे धारण करण्याचा यत्न करतात अशा साधूंना यति म्हणतात. प्रभु ते रत्नत्रय महायत्नाने पावले म्हणून प्रभु महायति आहेत ।। २० ॥ महानाद- महान् नादो ध्वनिर्यस्य-महागंभीर दिव्यध्वनीने प्रभु युक्त आहेत ॥ २१ ॥ महाघोष- प्रभुंचा दिव्यध्वनि एक योजनप्रमित असतो म्हणून प्रभु महाघोषवान् आहेत ॥ २२ ॥ महेज्य- इन्द्रादिकाकडून प्रभूची फार मोठी पूजा केली जाते म्हणन प्रभंना महेज्य म्हणतात ।। २३ ।। महसां पति-प्रभ अतिशय मोठया तेजांचे पति-स्वामी आहेत ।। २४ ॥ महाध्वरधर- प्रभु फार मोठ्या तपोयज्ञाला धारण करणारे आहेत ॥ २५ ॥ धुर्य-धर्माचे जू मानेवर धारण करणारे.-धुर्य हे नाव प्रभंचे आहे ।। २६ ।। महौदार्य- मोठी दानशक्ति धारण करणारे भगवान् निर्ग्रन्थ असूनही इच्छेपेक्षाही अधिक फल देतात ।। २७ ।। महिष्ठवाक्- अत्यन्त पूज्य आदरणीय अशा वाणीला प्रभुंनी धारण केले आहे ।। २८ ॥ महात्मा- केवलज्ञानरूपी नेत्रांनी लोकालोकाला ज्यांचा आत्मा पाहतो असे प्रभु महात्मा नावाला यथार्थ धारण करतात ॥ २९ ॥ महसां धाम-प्रभु फार मोठ्या तेजाचे आश्रयस्थान आहेत ॥ ३० ॥ महर्षि- महान् अनेक केवलज्ञानादिक ऋद्धिसमूहाला प्रभु धारण करतात म्हणून त्यांचे महर्षि हे नांव आहे. औषद्धि, बुद्धिऋद्धि, विक्रिद्धि, अक्षीणमहानसद्धि, आकाशगमनद्धि, केवलज्ञानद्धि या ऋद्धीचे प्रभु धारक आहेत ॥ ३१॥ महितोदय- ज्यांच्या ठिकाणी असलेला तीर्थकरनामकर्माचा उदय जनतेकडून पूजिला जातो म्हणून प्रभु महितोदय आहेत ।। ३२ ॥
महाक्लेशाङकुश- महान् तप, संयम, परीषह सहनादिक जे क्लेश हेच जणु मनरूपी मत्तगजेन्द्राला उन्मार्गापासून परावृत्त करण्यास अङकुशासारखे आहेत. अशा प्रभूना महाक्लेशाङकुश म्हणतात ।। ३३ ॥ शूर- प्रभु कर्मक्षय करण्यास समर्थ आहेत म्हणून ते शूर आहेत ।। ३४ ।। महाभूतपति- गणधर, चक्रवर्ती वगैरेना महाभूत म्हणतात. त्यांचे जिनेश्वर पति-स्वामी आहेत ॥ ३५ ॥ गुरु- प्रभु धर्माचा उपदेश करतात म्हणून ते गुरु आहेत ॥३६॥ महापराक्रम- फार मोठा पराक्रम प्रभूच्या ठिकाणी आहे अर्थात् केवलज्ञानाने सर्व वस्तूंचे पृथक्करण करणेरूप पराक्रम प्रभु करतात ।। ३७ ॥ अनन्त- प्रभुंना कधीही नाश नसल्यामुळे ते अनन्त आहेत ॥ ३८ ॥ महाक्रोधरिपु- अतिशय मोठया क्रोधाचे भगवान् रिपु-शत्रु आहेत ॥ ३९ ॥ वशी वश- प्रभुत्व ज्यांचे ठिकाणी आहे ते प्रभु वशी होत ॥ ४० ।। महाभवाब्धिसंतारि- भव-संसार हाच अब्धि समुद्र आहे, या संसारसमुद्रात जिनप्रभु आम्हाला तारतात म्हणून ते महासमुद्रसन्तारि आहेत ।। ४१ ॥ महामोहाद्रिसूदन- फार मोठा असा जो मोहरूपी
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org