________________
२५-१६३)
महापुराण
(४१
महाध्यानपतितिमहाधर्मो महाव्रतः । महाकारिहात्मज्ञो महादेवो महेशिता ॥ १६२ सर्वक्लेशापहः साधुः सर्वदोषहरो हरः । असडाख्येयोऽप्रमेयात्मा शमात्मा प्रशमाकरः ॥ १६३
अद्रि-पर्वत त्याला सूदनः प्रभुंनी नष्ट केले म्हणून महामोहाद्रिसूदन या नावाला यथार्थ धारण करीत आहेत ॥ ४२ ।। महागुणाकर- सम्यक्त्व, ज्ञान, दर्शन, वीर्य, सूक्ष्म, अवगाहन, अगुरुलघु व अव्याबाधता वगैरे गुणांचे भगवान् उत्पत्तिस्थान आहेत म्हणून ते महागुणाकर आहेत ।। ४३।। क्षान्त- जिनप्रभूनी सर्वपरीषहादिकांना सहन केले म्हणून ते क्षान्त आहेत ।। ४४ ।। महायोगीश्वर- महायोगी जे गणधरादिक त्यांचे हे आदिजिनेश प्रभु- स्वामी आहेत ।। ४५ । शमी- शमः सर्व कर्मांचा क्षय ज्यांना आहे ते प्रभु शमी होत. अथवा समी-शान्तिपरिणामांना धारण करणारे प्रभु शमी व समी आहेत ।। ४६ ।।
___महाध्यानपति- आदिजिनेश्वर परमशुक्लध्यानाचे स्वामी- प्रभु आहेत ॥ ४७ ।। ध्यातमहाधर्म- ज्यांनी पूर्वभवापासून चालत आलेल्या श्रावककुलांतील महाधर्माचे अहिंसादिधर्माचे चिन्तन केले आहे ।। ४८ ।। महाव्रत- अहिंसादिक पाच महावतांनी युक्त असे प्रभु महाव्रतवान् आहेत ॥ ४९ ॥ महाकर्मारिहा- महाकर्मे मोहनीयादिक हीच शत्रु त्यांना प्रभूनी ठार मारले म्हणून प्रभु महाकर्मारिहा आहेत ॥ ५० ॥ आत्मज्ञ- ज्यांना आत्म-जीवतत्त्वाचे ज्ञान झाले आहे असे प्रभु आत्मज्ञ होत ।। ५१॥ महादेव- महान् अशा इन्द्रादिकांनी प्रभु आराध्य आहेत. म्हणून ते महादेव आहेत ।। ५२ ॥ महेशिता- अनन्तज्ञानादिक अन्तरङगवैभव व बहिरंगसमवसरणादिवैभव यांचे प्रभु-स्वामी आहेत ।। ५३ ॥ सर्वक्लेशापह- संपूर्ण शारीरिक, मानसिक व आगन्तुक अशा क्लेशांचा-दुःखांचा प्रभुंनी नाश केला आहे. अथवा सर्वभक्तजनांच्या नारकादिकदुःखांचाही प्रभु नाश करतात म्हणून ते सर्व क्लेशापह आहेत ॥ ५४ ।। साधु- प्रभुंनी रत्नत्रयरूपी साध्य सिद्ध करून घेतले म्हणून ते साधु होत ॥ ५५ ॥ सर्वदोषहर- सर्व-भूक, तहान, वृद्धावस्था, रोग जन्म मरणादिक संपूर्ण दोषांचा प्रभूनी नाश केला म्हणून ते सर्वदोषहर आहेत ॥ ५६ ॥ हर- जीवांच्या अनन्तजन्मांच्या पापांचा नाश प्रभु करतात म्हणून ते हर आहेत. अथवा 'ह' म्हणजे हर्ष- अनन्तसुख तें राति-देतात अथवा प्राप्त करून घेतात म्हणून प्रभु हर आहेत. अथवा राज्यावस्थेत 'हं' सहस्र पदरांचा हार प्रभु गळ्यात घालीत असत किंवा देत असत. अथवा 'ह' म्हणजे हिंसा तिला प्रभु 'र' अग्निसारखे दाहक म्हणूनही हर हे नाव प्रभूचे यथार्थ आहे ।। ५७ ॥ असङख्येय- प्रभूच्या गुणांची गणना करता येत नाही म्हणून ते असंख्येय आहेत ।। ५८ ।। अप्रमेयात्मा- ज्यांची गणना करता येत नाही असे प्रभु आहेत. एका सिद्धात्म्याच्या प्रदेशात अनन्त सिद्ध राहतात ॥ ५९ ॥ शमात्मा- कर्मक्षयाने युक्त आहे आत्मा ज्यांचा अशा प्रभूना शमात्मा म्हणतात ।। ६०॥ प्रशमाकर- प्रकृष्ट शम म्हणजे प्रशम अर्थात् उत्तम क्षमा. त्या क्षमेची आकर-खाण प्रभु उत्तम क्षमेची खाण असल्यामुळे ते प्रशमाकर आहेत ॥ ६१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org