________________
२५-१४२ )
विशाल विपुलज्योतिरतुलोऽचिन्त्य वैभवः । सुसंवृतः सुगुप्तात्मा सुभुत्सुनयतत्त्ववित् ॥ १४० एकविद्यो महाविद्यो मुनिः परिवृढः पतिः । धीशो विद्यानिधिः साक्षी विनेता विहतान्तकः ॥ १४१ पिता पितामहः पाता पवित्रः पावनो गतिः । त्राता भिषग्वरो वर्यो वरदः परमः पुमान् ॥ १४२
महापुराण
( ३३
विशाल - वि - विशिष्टशा- शांतीला लाति प्रभु धारण करतात म्हणून ते विशाल आहेत ।। ६३ ।। विपुलज्योति- विपुल- लोकालोकव्यापक असे ज्योति - केवलज्ञान ज्यांचे आहे ते प्रभु विपुलज्योति होत ॥ ६४ ॥ अतुल- ज्यांच्या गुणांची तुलना करणे शक्य नाही, ज्यांच्या गुणांना माप नाही असे प्रभु अतुल आहेत ।। ६५ ।। अचिन्त्यवैभव - प्रभूंच्या ऐश्वर्याचा थांग आमच्या मनाला लागत नाही असे प्रभु आहेत ॥ ६६ ॥ सुसंवृत- अतिशय संवराने युक्त प्रभु आहेत. कर्मांचे आस्रव - आगमन त्यांच्या ठायी होत नाही असे प्रभु आहेत ॥ ६७ ॥ सुगुप्तात्मा - अतिशय गुप्त व कर्मास्रवांचा प्रवेश ज्यात होत नाही व जो टाकीने खोदल्याप्रमाणे शुद्ध ज्ञापक स्वभावाला धारण करीत आहे असा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु सुगुप्तात्मा होत. मनोगुप्ति, वचनगुप्ति व कायगुप्तींनी युक्त प्रभूंचा आत्मा आहे. म्हणून त्यांना सुगुप्तात्मा म्हणतात ।। ६८ ।। सुभुत् - उत्तमरीतीने आत्महितकर उपदेश देणारे प्रभूंना सुभुत् म्हणतात ॥ ६९ ॥ सुनयतत्त्ववित्- नैगम, संग्रह, व्यवहार आदिक नयांनी जीवादिक तत्त्वांचे स्वरूप प्रभु जिनेश्वरांनी जाणले म्हणून ते सुनयतत्त्ववित् आहेत ।। ७० ।।
एक विद्य- मुख्य केवलज्ञानरूपी विद्या प्रभूंनी धारण केली आहे ॥ ७१ ॥ महाविद्यप्रभूंची ही केवलज्ञानरूपी विद्या फार मोठी आहे. म्हणून ते महाविद्य आहेत ।। ७२ ।। मुनिमन्यते - प्रत्यक्ष प्रमाणाने सर्व चराचर जगताला प्रभु जाणतात म्हणून ते मुनि आहेत ॥ ७३ ॥ परिवृढ - चोहोबाजूंनी वाढलेले ज्ञानादि गुणांनी पूर्ण झालेले ॥ ७४ ॥ पति- पातीति पतिःसंसारदुःखापासून प्राणिसमूहाचे रक्षण प्रभु करतात. म्हणून ते पति आहेत. अथवा विषयकषायापासून त्यांनी आपल्या आत्म्याचे रक्षण केले म्हणून ते पति आहेत ।। ७५ ।। धीश - प्रभु बुद्धींचे स्वामी आहेत ॥ ७६ ॥ विद्यानिधि - ते स्वसमय- जैनमत व परसमय - अन्यमताच्या विद्यांचे निधि आहेत ७७ ।। साक्षी - त्रैलोक्याला प्रभु करतलरेखेप्रमाणे प्रत्यक्ष जाणतात म्हणून ते साक्षी आहेत ॥ ७८ ॥ विनेता - स्वधर्माचे आत्मधर्माचे शिक्षण जिनेश देतात. म्हणून ते विनेता ।। ७९ ।। विहतान्तक- त्यांनी अन्तकाचा मृत्यूचा नाश केला म्हणून वितान्तक आहेत ॥ ८० ॥
Jain Education International
पिता - हे आदिजिना आपण दुर्गतीमध्ये भक्तांना पडू देत नाही व त्यांचे आपण रक्षण करता म्हणून पिता आहात ॥ ८१ ॥ पितामह - आपण सर्वांचे उत्पादक आहात म्हणून पितामह आहा ॥ ८२ ॥ पाता - आपण दुःखापासून रक्षण करता यास्तव आपण पाता आहा ॥ ८३ ॥ पवित्र - आपण भक्तांना पवित्र करता ।। ८४ ॥ पावन - आपण जगताला पवित्र करता म्हणून पावन आहात ॥ ८५ ॥ गति - आपण ज्ञानस्वरूप आहा अथवा सर्वांचे दुःख नाहीसे करण्यास समर्थ आहात. सर्वाना आपण शरण- रक्षक आहा ॥ ८६ ॥ त्राता - आपण
म. ५
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org