________________
३२)
महापुराण
(२५-१३९
अगण्यः पुण्यधीगण्यः पुण्यकृत्पुण्यशासनः । धर्मारामो गुणग्रामः पुण्यापुण्यनिरोधकः ॥ १३७ पापापेतो विपापात्मा विपाप्मा वीतकल्मषः। निर्द्वन्द्वो निर्मदः शान्तो निर्मोही निरुपद्रवः ॥१३८ निनिमेषो निराहारो निष्कियो निरुपप्लवः । निष्कलङको निरस्तैना निर्धूतागो निरास्त्रवः ॥ १३९
............................
पुण्यकर्माचे कथन करणारे आहेत अर्थात् सवैद्यकर्म, शुभायु, शुभनाम आणि उच्चगोत्र या पुण्य कर्माचे स्वरूप सांगणारे आहेत ।। ३४ ॥ पूत- प्रभु पूत पवित्र झालेले आहेत ॥ ३५ ॥ वरेण्य- प्रभु मुक्तिलक्ष्मीला वरणारे आहेत ॥ ३६॥ पुण्यनायक- पुण्यकार्याचे स्वामी आहेत ॥ ३७ ।।
___अगण्य- आदिप्रभु ज्यांचे गुण मोजण्यास अशक्य आहेत असे आहेत ॥ ३८ ॥ पुण्यधी- पुण्याने युक्त बुद्धि असल्यामुळे प्रभु पुण्यधी आहेत ।। ३९ ।। गण्य- बारा प्रकारच्या गणाचे हित करणारे ॥ ४० ॥ पुण्यकृत्- पुण्य केले असल्यामुळे प्रभु पुण्यकृत् आहेत ॥ ४१ ॥ पुण्यशासन-प्रभूचे शासन भक्तांना पुण्यवान् बनविणारे आहे ॥ ४२ ॥ धर्माराम- जो नरकात पडणा-या प्राण्याला धारण करितो त्याला धर्म म्हणतात. प्रभु अशा धर्माचा बगीचा आहेत ।। ४३।। गुणग्राम- प्रभु मूलगुण अठ्ठावीस व उत्तरगुण चौयाऐंशी लाख यांना धारण करतात म्हणून ते गुणग्राम-गुणांचा समूह धारण करतात असे म्हटले जाते ।। ४४ ॥ पुण्यापुण्यनिरोधक- भगवान् पुण्य व अपुण्य-पाप या दोहोंचाही निरोध करतात, संवर करतात. जेव्हा ते संवर करतात तेव्हा त्याच्या ठिकाणी पुण्य येत नाही व पापही येत नाही ॥ ४५ ॥
पापापेत- पापरहित ।। ४६॥ विपापात्मा- पापरहित आत्मा ज्यांचा आहे असे प्रभ विपापात्मा होत ॥४७॥ विपाप्मा- नष्ट झाले आहे पाप ज्याचे असे प्रभ विपाप्मा- पापरहित आहेत ॥ ४८ ॥ वीतकल्मष- ज्यांचे पाप नष्ट झाले आहे असे ॥ ४९ ॥ निर्द्वन्द्व- प्रभु कलह रहित असल्यामुळे ते निर्द्वन्द्व आहेत ॥ ५० ॥ निर्मद- आठ प्रकारच्या गर्वानी रहित असे आहेत ।। ५१ ॥ शान्त- उपशम धारण केलेले ।। ५२ ॥ निर्मोह- निघून गेलेले आहे अज्ञान ज्यापासून असे प्रभु निर्मोह झाले ॥ ५३ ।। निरुपद्रव-प्रभूनी मुळापासून उपद्रवाचा अर्थात उपसर्गाचा नाश केला आहे ॥ ५४॥
निनिमेष- प्रभूच्या दोन डोळ्यांच्या पापण्या खाली वर होत नसल्यामुळे ते निनिमेष अर्थात् दिव्य नेत्रयुक्त आहेत ॥ ५५ ॥ निराहार- प्रभु कवलाहार घेत नाहीत अर्थात् ते अनन्त सुखी असल्यामळे जेवत नाहीत ।। ५६ ॥ निष्क्रिय- भगवान क्रिया-प्रतिक्रमणादिक क्रिया करीत नाहीत. कारण ते प्रमादरहित असल्यामुळे हिंसादिकदोषरहित आहेत ॥ ५७ ।। निरुपप्लव- भगवान् उपद्रव-उपसर्गादिक बाधांनी रहित असल्यामुळे दुःखरहित आहेत ॥५८॥ निष्कलङक- ते अपवादरहित आहेत ।। ५९ ॥ निरस्तैना- प्रभु पापरहित आहेत ॥ ६० ।। निर्धताग- ते अपराधरहित आहेत ।। ६१ ॥ निरास्रव- आत्म्यात नवीन कर्मे येण्याची जी मिथ्यात्व, अविरति, प्रमाद व कषाय कारणे त्यांनी रहित आहेत. म्हणून कर्माच्या आगमनाने रहित आहेत, निरास्रव आहेत ।। ६२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org