________________
२५-१३६)
महापुराण
पद्मयोनिर्जगद्योनिरित्यः स्तुत्यः स्तुतीश्वरः । स्तवना) हृषीकेशो जितजेयः कृतक्रियः ॥ १३४ गणाधिपो गणज्येष्ठो गुण्यः पुण्यो गणाग्रणीः । गुणाकरो गुणाम्भोधिर्गुणशो गुणनायकः ॥१३५ गुणादरी गुणोच्छेदी निर्गुणः पुण्यगीर्गुणः । शरण्यः पुण्यवाक्पूतो वरेण्यः पुण्यनायकः ॥ १३६
पद्मयोनि: पद्मा-लक्ष्मीची उत्पत्ति प्रभुपासून झाली म्हणून प्रभु पद्मयोनि आहेत ॥१०॥ जगत्योनि- धर्मरूप प्रभु जगताच्या उत्पत्तीचे कारण आहेत म्हणून त्यांना जगयोनि म्हणता येते ।। ११ ।। इत्य- प्रभूचे स्वरूप ज्ञानाने जाणले जाते म्हणून ते इत्य आहेत. ( इ धातूचा अर्थ जाणे असा आहे व जे गत्यर्थ धातु ते ज्ञानार्थकही मानले जातात ) ॥ १२ ॥ स्तुत्य- प्रभु स्तुतीस पात्र आहेत म्हणून ते स्तुत्य आहेत ।। १३ ॥ स्तुतीश्वर- प्रभु स्तुतीचे ईश्वर आहेत अथवा ज्यांची स्तुति करण्यास इन्द्रादिक समर्थ होतात असे प्रभु आहेत ॥ १४ ॥ स्तवनाहप्रभु स्तुतीला योग्य आहेत कारण ते गुणवान् व दोषरहित आहेत ॥ १५॥ हृषीकेश- हृषीकइन्द्रियाना ईश वश करणारे अर्थात् जितेन्द्रिय प्रभु आहेत ॥१६॥ जितजेय- प्रभूनी जिंकण्यास योग्य अशा कामक्रोधादिकांना जिकले आहे म्हणन ते जितजेय होत ।। १७ ॥ कृतक्रियप्रभूनी घातिकर्माचा नाश करण्याची क्रिया पूर्ण समाप्त केली म्हणून ते कृतकृत्य झाले ।। १८॥
गणाधिप- बारा प्रकारचा जो संघ त्याचे प्रभु अधिप स्वामी आहेत ॥ १९ ॥ ज्येष्ठ-बारागणामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभु आहेत ।। २० ॥ गुण्य- गुण प्राप्त करून घेणाराचे हित करणारे अथवा चौयाऐंशी लक्ष गुणात जे तत्पर आहेत असे ॥ २१ ॥ पुण्य- प्रभु गुणादिकांनी शोभतात म्हणून ते पुण्य आहेत ॥ २२॥ गणाग्रणी- बारागणामध्ये प्रभु प्रधान मुख्य आहेत ॥ २३ ॥ गुणाकर- प्रभु केवलज्ञानादि गुणांचे उत्पत्तिस्थान आहेत व चौ-याऐंशी लक्ष गुणांचे उत्पत्तिस्थान आहेत. अथवा प्रभु अरिहंत अवस्थाधारक असल्यामुळे अरिहन्ताच्या शेहेचाळीस गुणांचे धारक आहेत ।। २४ ।। गुणाम्भोधि- प्रभु चौयाऐंशी लक्ष गुणांचे सागर आहेत ॥ २५ ॥ गुणज्ञ- गुणांना जाणणारे आहेत ।। २६ ॥ गणनायक- प्रभु बारागणांचे नायक स्वामी आहेत ॥ २७ ॥
गुणादरी- सत्वादि गुणांचे ठिकाणी प्रभु प्रेम करतात म्हणून ते गुणादरी होत ॥२८॥ गुणोच्छेदी- गुणांचा-इन्द्रियांचा उच्छेद नाश करणारे अथवा गुणांचा क्रोध, राग द्वेषादिकांचा नाश करणारे असे प्रभु ॥ २९॥ निर्गुण- निश्चित केवलज्ञानादि गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत असे अथवा ज्यांच्यापासून राग, द्वेष, मोह, क्रोधादिक अशुद्ध गुण निघून गेले आहेत असे अथवा निर्गुण म्हणजे तन्तु ज्याच्यापासून निघून गेले आहेत अर्थात् वस्त्ररहित असे प्रभु आहेत अथवा निर् म्हणजे खालच्या अवस्थेत असलेले जे भव्य जीव त्याना गुणयुक्त करणारे प्रभु आहेत. अर्थात् आपली भक्ति करणा-या भव्य जीवाना आपल्यासारखे गुणयुक्त प्रभु करतात ॥ ३० ॥ पुण्यगी-प्रभूची वाणी पवित्र करणारी आहे म्हणून प्रभु पुण्यगी आहेत ।। ३१॥ गुण- सर्व भव्य समूहात प्रभु गुणश्रेष्ठ आहेत ।। ३२ ॥ शरण्य- भगवान् संसारदुःख नष्ट करणारे आहेत म्हणून ते शरण्य-रक्षण करणारे- भय नाहीसे करणारे आहेत ॥ ३३ ॥ पुण्यवाक्- भगवान्
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org