________________
३०)
महापुराण
सुप्रसन्नः प्रसन्नात्मा ज्ञानधर्मदमप्रभुः । प्रशमात्मा प्रशान्तात्मा पुराणपुरुषोत्तमः ॥ १३२
४ महाशोकादिशतक
महाशोकध्वजोऽशोकः कः स्रष्टा पद्मविष्टरः । पद्मशः पद्मसम्भूतिः पद्मनाभिरनुत्तरः ।। १३३
( २५-१३२
सुप्रसन्न - प्रभु अतिशय प्रसन्नमुख असतात म्हणून त्यांना सुप्रसन्न म्हटले आहे ।। ९५ ।। प्रसन्नात्मा - प्रसन्न -निर्मल आत्मा - स्वभाव ज्यांचा आहे असे प्रभु प्रसन्नात्मा होत, निर्मल आत्मा होत ।। ९६ ।। ज्ञानधर्मदमप्रभु - ज्ञान - केवलज्ञान - धर्म - दया हे स्वरूप ज्याचे तो धर्म व दमतपश्चरणाचे क्लेश सहन करणे या ज्ञानधर्मदमांचे जिनेश्वर प्रभु आहेत ।। ९७ ।। प्रशमात्माकामक्रोध आदि विकारांचा अभाव असणे त्यास प्रशम म्हणतात. तो प्रथम आत्मा - स्वभाव ज्यांचा आहे असे प्रभु प्रशमात्मा होत ॥ ९८ ॥ प्रशान्तात्मा - घाति-कर्माचा क्षय झाला म्हणजे प्रशान्ति उत्पन्न होते. अशा प्रशान्तीने युक्त भगवान् झाले म्हणून त्यांना प्रशान्तात्मा म्हणतात ॥ ९९ ॥ पुराणपुरुषोत्तम - जो प्रभु आदिजिन प्राचीन व त्रैसष्टलक्षण - पुरुषात उत्तम आहे व प्रसिद्ध आहे म्हणून त्याला पुराणपुरुषोत्तम म्हणतात. अथवा पुरे - परमोदारिक शरीरात अनिति - मोक्षाला जाईपर्यन्त जीवति निवास करतो असा जो तो पुराण होय. पुराण असा जो पुरुषोत्तम आत्मा तो पुराणपुरुषोत्तम होय. अर्थात् जीवन्मुक्त आदिजिनेशाला पुराणपुरुषोत्तम म्हणतात. याप्रमाणे स्थविष्ठादिशतक संपले ।। १०० ॥
Jain Education International
महाशोकध्वज- मोठा अशोक वृक्ष हा ज्यांचा ध्वज - चिह्न आहे असे प्रभु महाशोकध्वज या नांवाने संबोधले जातात ।। १ ।। अशोक- शोक पुत्र - मित्र व पत्नी इत्यादिकाविषयी शोक ज्यांना कधीही झाला नाही असे प्रभु अशोक या अन्वर्थक नावाने युक्त आहेत ॥ २ ॥ कः- पुण्याचे वर्णन करणारे प्रभू कः या नावाने ओळखले जातात ॥ ३ ॥ स्रष्टा- जे पापी लोक निंदा करतात त्यांना नरकगतीत व पशुगतीत प्रभु उत्पन्न करतात. मध्यस्थ लोक स्तुति व निंदा करीत नाहीत, त्यांना प्रभु मानव-गतीत उत्पन्न करतात. जे स्तुति व पूजन करतात त्याना प्रभु देव-गतीत उत्पन्न करतात आणि जे प्रभूचे ध्यान करतात त्याना प्रभु मुक्तावस्था देतात ।। ४ ।। पद्मविष्टर - प्रभु समवसरणात सहस्रदलकमलाकृति सिंहासनावर बसतात त्यामुळे त्यांना पद्मविष्टर हे नांव आहे. ते कमल एक योजन प्रमाणाचे असते व त्याला सोन्याच्या हजार पाकळ्या असतात ॥ ५ ॥ प्रमेश प्रभु पद्मनामक निधीचे स्वामी आहेत म्हणून त्यांना पद्मेश म्हणतात ।। ६ ।। पद्मसम्भूति- कमलांची उत्पत्ति ज्यांच्यापासून होते अशा प्रभूना पद्मसंभूति हे नाव आहे. अशा कमलावरून प्रभूचा विहार धर्मोपदेशासाठी होत असतो ।। ७ ।। पद्मनाभ - प्रभूची बेंबी कमलाप्रमाणे सुन्दर असते म्हणून त्यांना पद्मनाभि म्हणतात ।। ८ ।। अनुत्तर - प्रभुपेक्षा श्रेष्ठ कोणीच असत नाही म्हणून प्रभु अनुत्तर- सर्वापेक्षा उत्कृष्ट
असतात ।। ९ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org