SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 255
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २४४) महापुराण (३३-१३७ विरुद्धाबद्धवाग्जालरुद्धव्यामुग्धबुद्धिषु । अश्रद्धेयमनाप्तेषु सार्वश्यं त्वयि तिष्ठते ॥ १४७ रविः पयोधरोत्सङ्गसुप्तरश्मिविकासिभिः । सूच्यतेऽब्जर्यथानद्वदुद्धर्वाग्विभवैर्भवान् १४८ यथान्धतमसे दूरात्तय॑ते विरुतैः शिखी । तथा त्वमपि सुव्यक्तः सूक्तैराप्तोक्तिमर्हसि ॥ १४९ आस्तामाध्यात्मिकीयं ते ज्ञानसम्पन्महोदया। बहिविभूतिरेवैषा शास्ति नः शास्तृतां त्वयि ॥१४० पराय॑मासनं संहं कल्पितं सुरशिल्पिभिः । रत्नरुकछुरितं भाति तावकं मेरुशङ्गवत् ॥ १४१ पदार्थात प्रत्येक धर्म सात सात भंगरूपाने उत्पन्न होतो म्हणून त्याचे वर्णन करण्याकरितां जिनेंद्रभगवंतानी सप्तभङगीरूपवाणीने जीवादिकतत्त्वांचा उपदेश केला आहे. ज्यावेळी जीवाच्या अस्तित्व धर्माचे वर्णन केले जाते त्यावेळी त्याच्या अवशिष्ट नास्तित्वादिक धर्माचा अभाव मानण्यात येऊ नये म्हणून त्याच्या बरोबर स्यात् शब्दाचा प्रयोग केला जातो व संशय दूर करण्यासाठी नियमवाचक 'एव' शब्दाचा प्रयोग केलेला आहे. यामुळे सर्व मिळून ' स्यादस्त्येव जीवः' या वाक्याचा अर्थ जीव स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेने आहेच. याचप्रमाणे अन्यवाक्यांचा अर्थ देखील जाणून घेतला पाहिजे. पदार्थात असलेल्या सर्व धर्मांचे वर्णन विवक्षेला अनुसरून जैनधर्म करीत असतो. अशी जैनधर्माची व्यापक दृष्टि आहे. या दृष्टीच्या अभावी वस्तूचे पूर्ण स्वरूप वणिले जात नाही ॥ १३६ ॥ प्रत्यक्षादि प्रमाणाशी विरुद्ध व असंबद्ध अशा भाषणाच्या जाळ्यात ज्यांनी मूढबुद्धि लोकांना अडकविले आहे अशा लोकामध्ये सर्वज्ञता आहे असे समजणे हे श्रद्धेय नाही. पण हे जिनेश्वरा यथार्थ वस्तुस्वरूप सांगणे व ते प्रत्यक्षादि प्रमाणाशी विरुद्ध नसणे हे सर्वज्ञतेशीच संगत आहे व अशी सर्वज्ञता हे प्रभो आपल्या ठिकाणी आहे ॥ १३७ ॥ मेघांच्या मध्यभागांत ज्याचे किरण सुप्त झाले आहेत प्रतिबंध पावले आहेत असा सूर्य प्रफुल्ल झालेल्या कमलानी जसा सूचित केला जातो तसा हे प्रभो आपला सर्वज्ञपणा उत्कृष्ट निर्दोष वाणीच्या वैभवाने व्यक्त केला जात आहे ॥ १३८ ॥ जसे दाट अंधकारात केकारवाने दूर ठिकाणी मोर असावा असा तर्क केला जातो तसा अतिशय स्पष्ट व उत्तम निर्दोष भाषणांनी हे प्रभो आपण सर्वज्ञ आहात या वचनाला योग्य आहात ।। १३९ ॥ हे प्रभो ही अतिशय उत्कर्षाला पावलेली आपली आध्यात्मिक ज्ञानसंपत्ति असू द्या. कारण या संपत्तीवरून आपण सर्वज्ञ आहात हे निश्चित ठरतेच पण जी आपली ही बाह्य विभूति- ऐश्वर्य आहे तीच आपल्या ठिकाणी सर्वज्ञता आहे, हितोपदेशकता आहे हे आम्हाला सांगत आहे ।। १४० ।। हे प्रभो देवांच्या कारागिरानी आपले अत्युत्कृष्ट सिंहासन बनविले ते मेरूच्या शिखराप्रमाणे उंच व ज्याला जडविलेल्या रत्नांची कान्ति चोहोकडे पसरली आहे असे शोभते ।। १४१ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy