________________
५७६)
मन्दमन्दं प्रकृत्यैव मन्दा युद्धभयान्मृगाः । जग्मुनिर्हेतुकं भद्रास्तवत्राशुभसूचनम् ॥ २०४ विजिगीषविपुण्यस्य वृथा प्रणिधयो यथा । तथार्ककीर्तियन्तॄणां ते गजेषु नियोजिताः ॥ २०५ लङ्घयत्रयोदप्त्या पारिभद्रोद्गमच्छविम् । प्रकटभ्रुकुटीबन्धसन्धानितशरासनः ॥ २०६ रिपुं कुपितभोगीन्द्रस्फटाटोपो भयङ्करः । कुर्वन्विलोकनातप्ततीव्रनाराचगोचरम् ॥ २०७ गिरीन्द्र शिखराकारमारुह्य हरिविक्रमः । गजेन्द्रं विजयार्धाख्यं गर्जन्मेघस्वरस्तवा ॥ २०८ अनुकूलानिलोत्क्षिप्तपुरःसर्पद्ध्वजांशुकैः । क्रान्त द्विपारिविक्रान्तविख्यातारुढयोधनैः ॥ २०९ प्रस्फुरच्छस्त्र सङ्घातदीप्तिदीपित दिङ्मुखैः । धूतदुन्दुभिसद्ध्वानबृहद्वंहितभीषणः ।। २१० घण्टामधुरनिर्घोषनिभिन्नभुवनत्रयेः । सद्यः समुत्सरद्द पैरपि सिंहान् जिगीषुभिः ॥ २११ प्रापद्युद्धोत्सुकः सार्धं गर्जवजयसूचिभिः । क्षयवेलानिलोद्धूतसिन्धुवेलां विलङ्घयन् ॥ २१२
महापुराण
जो जिंकण्याची इच्छा करीत आहे पण पुण्यरहित आहे अशा राजाचे दूत अथवा मनोरथ व्यर्थ होतात तसे अर्ककीर्तीच्या महातांनी हत्तीविषयी केलेले मनोरथ व्यर्थ झाले ॥ २०५ ॥
(४४ - २०४
ज्याने आपल्या दोन नेत्रांच्या डोळयांच्या कान्तीने निंबाच्या कोवळया पानाच्या लाल कान्तीला जिंकले होते आणि स्पष्ट दिसणाऱ्या ज्या भुवया त्याच्या रचनेप्रमाणे ज्याचे धनुष्य आहे ॥ २०६ ॥
रागावलेला जो सर्पराज त्याच्या शरीराचा जो विस्तार त्याप्रमाणे ज्याचा देह दिसत आहे व त्यामुळे जो भयंकर वाटत आहे, आपल्या शत्रूला दृष्टिरूपी तप्त व तीव्र बाणांचा विषय बनविणारा, मेरुपर्वताच्या शिखराच्या आकाराचा जो विजयार्ध नांवाचा गजेन्द्र त्याच्यावर ज्याने आरोहण केले आहे, सिंहाप्रमाणे ज्याचा पराक्रम आहे आणि गर्जना करणारा असा जयकुमार शत्रूच्या सैन्यावर चालून गेला ॥। २०७-२०८ ।।
Jain Education International
अनुकूल वाऱ्याने वर उडविलेले आणि पुढे पसरणाऱ्या ध्वजांच्या वस्त्रानी जे शोभत आहेत, आक्रमण करणाऱ्या सिंहाप्रमाणे शूर व विख्यात असे योद्धे त्यांच्यावर बसले आहेत, चमकणा-या शस्त्रसमूहाच्या कांतीने ज्यांनी दिशांची मुखे उज्ज्वल केली आहेत, ताडन केलेल्या नगान्यांचा जो गंभीर प्रशस्त आवाज त्याप्रमाणे मोठ्या गर्जनेने जे भयंकर दिसत आहेत, घंटांच्या मधुर आवाजानी ज्यांनी त्रैलोक्य व्याप्त केलें आहे, तत्काल वाढणारा जो ताजा दर्प त्याने सिंहांनाही जिंकणारे व विजयाला सुचविणारे अशा हत्तीसह तो जयकुमार युद्धाला उत्सुक होऊन तेथे रणभूमीवर प्राप्त झाला. त्यावेळी प्रलयकालाच्या वाऱ्याने खवळलेल्या समुद्राच्या लाटा आपल्या उसळीने जणु उल्लंघित आहे असा तो शोभला ।। २०९ - २१२ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org