SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 588
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४-२२०) महापुराण महाहास्तिकविस्तारस्थूलनीलबलाहकः । समन्तात्सम्पतच्छङकु समूह सहसानकः ॥ २१३ प्रोत्खाता सिलता विद्युत्समुल्लासितभासुरः । नानानक महाध्वानगम्भीरघनगर्जितः ॥ २१४ नवलोहितपुराम्बुनिरुद्धधरणीतलः । नितान्तनिष्ठुरापात मुद्गराशनिसन्ततिः ॥ २१५ चलत्सितपताकालि बलाकाच्छादिताम्बरः । सग्रामः प्रावृषो लक्ष्मीमशेषामपुषत्तदा ॥ २१६ सुचिरं सर्वसन्दोहसंवृत्तसमराङ्गणे । सेनयोः सर्वशस्त्राणां व्यत्ययो बहुशोऽभवत् ॥ २१७ निरुद्धमूर्ध्वगृध्रौघैर्मध्यमुद्यध्वजांशुकैः । सेनाद्वयविनिर्मुक्तः शस्त्रैर्धात्री च सा तदा ।। २१८ जयलक्ष्मी नवोढायाः सपत्नीमिच्छता नवाम् । तदार्ककीर्तिमुद्दिश्य जयेनाचोद्यत द्विपः ॥ २१९ अष्टचन्द्राः पुरोभूय भूयः प्राग्दृष्टशक्तयः । क्षपकं वांहसां भेदा न्यरुन्धस्तं निनङ्क्षवः ॥ २२० (५७७ मोठ्या हत्तींच्या समूहांचा जो विस्तार हाच कोणी स्थूल व निळा मेघ ज्यात पसरला आहे, चोहीकडून होणारी जी बाणवृष्टि तीच ज्यात मोराप्रमाणे भासत आहे, म्यानातून बाहेर काढलेल्या ज्या तरवारी याच जणु विजा त्यांच्या चमकण्याने जो भयंकर दिसत आहे, अनेक नगायांचा जो आवाज हीच गंभीर मेघांची गर्जना ज्यात आहे, ताज्या रक्ताचा जो प्रवाह हेच कोणी पाणी त्याने या भूतलाला व्यापले आहे, अतिशय कठिण आघात ज्यांचा आहे असे जे मुद्गर हेच कोणी वज्रपात जेथे आहेत, चंचल अशा पांढऱ्या पताकांचा समूह जणु जो बगळ्यांचा समूह त्याने जेथे आकाश व्यापले आहे, अशा रीतीचे युद्ध हीच कोणी पावसाळ्याची मोठी शोभा ती त्यावेळी वृद्धिंगत झाली ।। २१३-२१६ ॥ पुष्कळ कालपर्यन्त संपूर्ण समुदायाने चालविलेल्या त्या युद्धात दोन्ही बाजूच्या सैन्याच्या सर्वशस्त्रांचा पुष्कळ नाश झाला ।। २१७ ।। त्यावेळी वरचा अर्थात् आकाशाचा प्रदेश गिधाडांच्या समूहानी व्यापला होता. मधला प्रदेश वर उडणाऱ्या ध्वजांच्या पताकानी व्यापला होता आणि हा जमिनीचा भाग दोन्ही सैन्यांच्या गळून पडलेल्या शस्त्रांनी व्यापलेला होता ।। २१८ ॥ जयलक्ष्मीला नुकतेच जिला वरले आहे अशा सुलोचनेची नवीन सवत करण्याची इच्छा करणाऱ्या जयकुमाराने अर्ककीर्तीला उद्देशून आपला हत्ती त्याच्या बाजूकडे चालविला ॥ २१९ ॥ Jain Education International जसे कर्मांचे भेद क्षपकश्रेणीवर आरोहण करणाऱ्या मुनिवर्याला अडवितात तसे ज्यांचे सामर्थ्य पूर्वी पाहिले आहे असे अष्टचन्द्र नामक विद्याधर पुनः जयकुमाराचा नाश करावा अशी इच्छा मनात धारण करून त्याच्यापुढे आले ॥ २२० ॥ म. ७३ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy