SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 126
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८-५४) महापुराण (११५ वर्षारम्भो युगारभ्भे योऽभूत्कालानुभावतः । ततः प्रभृति संवृद्धं जलं द्वीपान्तमावृणोत् ॥ ४७ मलङध्यत्वान्महीयस्त्वाद्वीपपर्यन्तवेष्टनात् । द्वैप्यमम्बु समुद्रिक्तमभादुपसमुद्रताम् ॥ ४८ पश्यन्नुपसमुद्रं तं गत्वा सुखपथेन सः । गङगोपवनवेद्यन्तभागे सैन्यमवीविशत् ॥ ४९ वेदिकातोरणद्वारमस्ति तत्रोत्तरं महत् । शनस्तेन प्रविश्यान्तर्वणं सैन्यं न्यविक्षत ॥ ५० तत्र वास्तुवशादस्य किञ्चित्सङकुचितायतः । स्कन्धावारनिवेशोऽभूदलाध्यव्यूहविस्तृतिः ॥५१ नन्दनप्रतिमे तस्मिन् वने रुद्धातपाङघ्रिपे । गङगाशीतानिलस्पर्शस्तबलं सुखमावसत् ॥ ५२ तस्मिन्पौरुषसाध्येऽपि कृत्ये दैवं प्रमाणयन् । लवणाब्धिजयोद्युक्तः सोऽभ्यच्छविकी क्रियाम् ॥ ५३ भधिवासितजैत्रास्त्रः स त्रिरात्रमुपोषिवान् । मन्त्रानुस्मृतिपूतात्मा शुचितल्पोपगः शुचिः ॥ ५४ कर्मभूमीच्या युगाच्या आरंभसमयी कालाच्या सामर्थ्याने जी जलवृष्टि झाली तेव्हांपासून समुद्राचे पाणी वाढत गेले व ते द्वीपाच्या अन्तभागापर्यन्त व्याप्त झाले ॥ ४७ ।। ते समुद्रापासून बाहेर आलेले पाणी तरून जाण्याला अशक्य व महाविस्ताराचे झाले व द्वीपाच्या शेवटच्या प्रदेशाला त्याने वेढून टाकिले आहे. ते द्वीपाला वेढणारे पाणी अधिक झाल्यामुळे उपसमुद्राच्या अवस्थेला पोहोचले आहे ।। ४८ ॥ त्या उपसमुद्राला भरतेशाने पाहिले व सुखकर मार्गाने जाऊन गंगेच्या उपवनवेदिकेच्या अन्तभागात सैन्याला त्याने नेले ॥ ४९ ॥ तेथे उत्तरेला मोठे वेदिकेचे तोरणद्वार आहे व त्या तोरणद्वाराने प्रवेशून त्याच्या उपवनात आपले सर्व सैन्य भरतेशाने स्थापिले ।। ५० ॥ तेथे जागेच्या संकोचामुळे भरतेशाच्या सैन्याचा तळ काहीसा संकुचितपण लांबीने विस्तृत असा झाला व त्या सेनेच्या विस्ताराला कोणी उल्लंघू शकत नसे ।। ५१ ॥ ते वन इन्द्राच्या नन्दनवनाप्रमाणे होते व तेथील वृक्षांच्या दाट सावलीनी सूर्याचा आताप बिलकुल प्रवेश करीत नसे. अशा वनात गंगानदीच्या थंड वान्याच्या स्पर्शाने भरतेशाचे सैन्य सुखाने राहिले ।। ५२ ॥ ते दिग्विजयाचे कार्य पौरुषसाध्य असताही देव हेच शुभ प्राप्तीला कारण आहे असे मानणाऱ्या भरतेश्वराने लवणसमुद्रावर विजय मिळविण्यास उद्युक्त होऊन कांहीं दैविकक्रिया करण्याचा विचार मनात आणला ॥ ५३ ॥ भरतेशाने जय प्राप्त करून देणारी अस्त्रे मंत्रानी सुसंस्कृत केली. तीन दिवसपर्यन्त उपोषणे केली. मंत्राच्या वारंवार स्मरणाने स्वतःचा आत्मा त्याने पवित्र केला व पवित्र शय्येवर तो पवित्र राजा झोपला ।। ५४ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy