SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 127
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महापुराण (२८-५५ सायंप्रातिकनिःशेषकरणीये समाहितः । पुरोधोऽधिष्ठितः पूजां स व्यधात्परमेष्ठिनाम् ॥ ५५ सोनन्यं बलरक्षायै नियोज्य विधिवद्विभुः । प्रतस्थे धृतदिव्यास्त्रो जिगीषुलवणाम्बुधिम् ॥ ५६ प्रतिग्रहापसारादिचिन्ताभून्नास्य चेतसि । विलिलङ्घयिषोरब्धिमहो स्थैर्य महात्मनाम् ॥ ५७ अजितञ्जयमारुक्षद्रथं दिव्यास्त्रसंभृतम् । योजितं वाजिभिदिव्यर्जलस्थलविलअधिभिः ॥ ५८ पत्रश्यामरथं प्रोच्चश्चलच्चकाङ्ककेतनम् । तमूहर्जवना वाहा दिव्यसव्येष्टचोदितम् ॥ ५९ ततोऽस्मै दत्तपुण्याशीः पुरोधा घृतमङ्गलम् । त्वं देव विजयस्वेति स इमामृचमापठत् ॥ ६० जयन्ति विधुताशेषबन्धना धर्मनायकाः। त्वं धर्मविजयी भूत्वा तत्प्रसादाज्जयाखिलम् ॥ ६१ सन्स्यब्धिनिलया देवास्त्वद्भुक्त्यन्तनिवासिनः । तान्विजेतुमयं कालस्तवेत्युच्चर्जुघोष च ॥ ६२ ___ संध्याकाळची व सकाळची सर्व कार्ये करण्यात तत्पर अशा भरतेशाने पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे पंच परमेष्ठींची पूजा केली ।। ५५ ॥ यानंतर सेनापतीला सैन्याच्या रक्षणासाठी विधीपूर्वक नेमून व दिव्य अस्त्र धारण करून लवणसमुद्राला जिंकण्याच्या इच्छेने प्रभु भरताने प्रयाण केले ॥ ५६ ।। समुद्राला उल्लंघून जाण्याची इच्छा करणाऱ्या या भरतराजाच्या मनात कोणत्या वस्तु स्वीकाराव्यात व कोणत्या त्यागाव्यात याचा विचार मुळीच उत्पन्न झाला नाही. हे थोर मनाच्या महात्म्यांचे विलक्षण धैर्य आहे ।। ५७ ।। जलप्रदेश व स्थलप्रदेश उल्लंघण्याचे सामर्थ्य असलेले दिव्य घोडे ज्याला जुंपले आहेत, जो दिव्यास्त्रांनी भरलेला आहे अशा अजितंजय नामक रथावर भरतेश बसले ॥ ५८ ॥ दिव्य सारथ्याने ज्याला चालविले आहे, जो चक्राच्या ध्वजाने युक्त आहे अर्थात् ज्याचा चक्रचिह्नाने युक्त असा ध्वज फडफडत आहे, ज्याचे घोडे पानाप्रमाणे हिरवे आहेत भशा त्या रथाला वेगवान् घोडे वाहून नेऊ लागले ॥ ५९ ॥ यानन्तर प्रस्थानसमयी ज्याने मंगलकृत्य केले आहे, अशा भरतेशाला ज्याने पुण्याशीर्वाद दिला आहे, असा तो पुरोहित हे राजन् तुझा विजय होवो असे म्हणून पुढील ऋचा स्याने याप्रमाणे म्हटली ।। ६० ।। __ ज्यांनी सर्व कर्मबन्धनें तोडून टाकली आहेत, जे धर्माचे नायक आहेत असे तीर्थंकर सर्वात महान् उत्कर्षाला प्राप्त झालेले आहेत अशा त्यांच्या प्रसादाने हे राजन् तू धर्मविजयी हो व सर्व जगाला जिंक ॥ ६१ ॥ हे राजन्, समुद्रात राहणारे देव हे तू ज्याचा उपभोग घेत आहेस त्याच देशात राहतात. यास्तव त्यांना जकण्याचा हाच काल योग्य आहे. असे म्हणून त्याने मोठी घोषणा केली ।। ६२ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy