SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 128
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८-६१) महापुराण (११७ ततः कतिपयैरेव नायकैः परिवारितः । जगतीतलमारुक्षद्गङ्गाद्वारस्य चक्रभृत् ॥ ६३ न केवलं समुद्रान्तःप्रवेशद्वारमेव तत् । कार्यसिद्धरपि द्वारं तदमस्त रथाङगधृत् ॥ ६४ धृतमडगलवेषस्य तद्वद्यारोहणं विभोः । विजयश्रीसमुद्वाहवेद्यारोहणवद्बभौ ॥ ६५ मद्गृहाङगणवेदीयं जगतीति विकल्पय न् । वृशं व्यापारयामास कुल्याबुद्धचा महोदधौ ॥ ६६ स प्रतिज्ञामिवारूढो जगतीं तां महायतीम् । निस्तीर्णमिव तत्पारं पारावारमजीगणत् ॥ ६७ मुहुः प्रचलदुद्वेलकल्लोलमनिलाहतम् । विलङ्घनभयादुच्चैः फूत्कुर्वन्तमिवारवैः ॥ ६८ वीचीबाहुभिरुन्मुक्तः सरत्नः सीकरोत्करैः । पाद्यं स्वस्येव तन्वानं मौक्तिकाक्षतमिश्रितैः ॥ ६९ असङख्यशङ्खमाक्रान्तविश्वद्वीपमपारकम् । परैरलाध्यमक्षोभ्यं स्वबलौघानुकारिणम् ॥ ७० ....................................... यानन्तर कित्येक वीरनायकपुरुषांना बरोबर घेऊन, चक्रवर्ती गंगाद्वाराजवळच्या भूमीवर आला ।। ६३ ॥ ते गंगाद्वार फक्त समुद्रात प्रवेश करण्याचेच द्वार आहे असे नाही तर ते माझ्या कार्यसिद्धीचेही द्वार आहे असे चक्रवर्तीने मानले. चक्रवर्तीने मंगलवेष धारण केला व त्या गंगाद्वाराच्या वेदीवर आरोहण केले तेव्हां विजयलक्ष्मीबरोबर विवाह करण्याकरिता जणु बोहल्यावर तो चढला आहे असा शोभू लागला ॥ ६४-६५ ॥ ही वेदी माझ्या घरातील अंगणाचा कट्टा आहे असे मानून समुद्राकडे त्याने आपली दृष्टि टाकली व हा माझ्या अंगणातील लहानसा जलप्रवाह आहे असे मानले ॥ ६६ ।। त्या अन्तवेदीच्या विस्तृत भूमीवर चढलेल्या भरतेशाने जणु समुद्र जिंकण्याच्या प्रतिज्ञेवर आरोहण केले आहे असे भासले व मी हा समुद्र तरून त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर मी पोहोचलो आहे असे मानले ॥ ६७ ।। भरतेशाने गंगाद्वाराच्या वेदीवरून समुद्र पाहिला. वान्याच्या आघाताने या समुद्राच्या चंचल लाटा किना-यावर आदळत होत्या व भरतेश मला उल्लंघील म्हणून भयाने आपल्या गर्जनांनी जणु तो फुत्कार टाकीत होता ।। ६८ ।। तरंगरूपी बाहूंनी जलबिंदुसमूहासह तो समुद्र मोतीरूपी अक्षतांनी युक्त अशा रत्नांनी भरतेशाचे पाय धूत आहे असे वाटत होते ॥ ६९ ॥ तो समुद्र असंख्य शंखांनी युक्त होता. त्याने सर्व द्वीपांना घेरले होते. तो पाररहित होता, इतराकडून तो अलंध्य होता व क्षोभरहित असल्यामुळे भरताच्या सैन्यसमूहाचे अनुकरण करीत होता. भरतसैन्यही असंख्य महाशंखांना वाजवीत असे व त्याने सगळया द्वीपांना वेढले आहे, व तें अपार आहे, शत्रुसैन्याने तें उल्लंधिले जात नव्हते व क्षुब्ध-घाबरे होत नव्हते ॥ ७० ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy