________________
६८२)
महापुराण
(४७-१८५
प्रान्ते ततोऽहमागत्य जातोऽत्रवमिति स्फुटम् । समुद्रदत्तेनादित्यगतिर्वायुरथाह्वयः ॥ १८५ श्रेष्ठी कुबेरकान्तश्च लौकान्तिकपदं गताः । बोधितस्तैः समागत्य गुणपालः प्रबुद्धवान् ॥ १८६ मोहपाशं समुच्छिद्य तप्तवांश्च तपस्ततः । घातिकर्माणि निर्मूल्य सयोगिपदमागभूत् ॥ १८७ यशःपालः सुखावत्यास्तनूजस्तेन संयमम् । गृहीत्वा सह तस्यैव गणभृत्प्रयमोऽभवत् ॥ १८८ राजराजस्तदा भूरिविभूत्याभ्येत्य तं मुदा । श्रीपालः पूजयित्वा तु श्रुत्वा धर्म वयात्मकम् ॥ १८९ ततः स्वभवसम्बन्धमप्राक्षीत्प्रश्रयाश्रयः । भगवांश्चेत्युवाचेतिकुरुराजं सुलोचना ॥ १९० निवेदितवती पृष्टा सृष्टवाक्सौष्ठवान्विता । विदेहे पुण्डरीकिण्यां यशःपालो महीपतिः ॥ १९१ तत्र सर्वसमृद्धाख्यो वणिक तस्य मन:प्रिया । धनञ्जयानुजातासौ धनश्रीनिवद्धिनी ॥ १९२ तयोस्तुक्सर्वदयितः श्रेष्ठी तद्भगिनी सती । सज्ञया सर्वदयिता श्रेष्ठिनश्चित्तवल्लभे ॥ १९३ सुता सागरसेनस्य जयसेनासमाह्वया । धनञ्जयवशीशस्य जयदत्ताभिषा परा ॥ १९४
तेथील आयुष्य समाप्त झाल्यावर मी येथे जन्मलो आहे. आपल्या दोघांचा पुत्र झालो आहे. त्यावेळी समुद्रदत्ताबरोबर आदित्यगति, वायुरथ व कुबेरकान्त यानी लौकान्तिकदेवाचे पद धारण केले होते. त्यानी येऊन गुणपालाला उपदेश केला. त्यामुळे तो गुणपाल जागा झाला अर्थात् संसारापासून विरक्त झाला. त्याने मोहपाशाचा नाश केला व तपश्चरण केले. घातिकर्माचा नाश करून सयोगिगुणस्थानाचे पद प्राप्त करून घेतले ॥ १८५-१८७ ॥
सुखावतीच्या यशःपाल नामक मुलाने गुणपालाबरोबर संयम धारण केला व त्याचाच तो पहिला गणधर झाला ॥ १८८ ॥
__सर्व राजांचा राजा श्रीपाल त्यावेळी मोठ्या वैभवाने आणि आनंदाने गुणपाल केवलीकडे आला. त्याने त्यांची पूजा केली व सर्वजीवावर दया करणाऱ्या धर्माचे स्वरूप ऐकिले ।। १८९ ॥
यानन्तर विनययुक्त होऊन त्याने आपल्या जन्माचा संबंध केवलीना विचारला तेव्हां भगवंतानी याप्रमाणे सांगितले असे कुरुराज जयकुमाराला सुलोचना बोलली ॥ १९० ॥
नंतर जयकुमाराने तिला प्रश्न केल्यावर जिची वाणी फार सुंदर व मधुर आहे अशी सुलोचना असे सांगू लागली. विदेहक्षेत्रातील पुंडरीकिणी नगरीत यशःपाल नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याच नगरात सर्वसमृद्ध नांवाचा व्यापारी राहत होता. त्याच्या मनाला आवडणारी व धनवृद्धि करणारी धनश्री त्याची पत्नी होती. ती धनंजयाची धाकटी बहिण होती. या दोघाना- सर्वसमृद्ध आणि धनश्री यांना सर्वदयित नांवाचा मुलगा झाला व त्याच्या बहिणीचे नांव सर्वदयिता हे होते. या सर्वदयिताच्या मनाला आवडणाऱ्या दोन पत्नी होत्या एकीचे नांव जयसेना होते व ती सागरसेनश्रेष्ठीची कन्या होती व धनंजयश्रेष्ठीची कन्या जयदत्ता अशा दोन स्त्रिया या सर्वदयिताला होत्या ॥ १९१-१९४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org