________________
३८-२३३)
कुलाद्विनिलया देव्यः श्रीह्रीधीधृतिकीर्तयः । समं लक्ष्म्या षडेताश्च सम्मता जिनमातृकाः ।। २२६जन्मानन्तरमायातैः सुरेन्द्ररुर्मूर्धनि । योऽभिषेकविधिः क्षीरपयोधेः शुचिभिर्जलैः ॥ २२७ मन्दरेन्द्राभिषेकोऽसौ क्रियास्य परमेष्ठिनः । सा पुनः सुप्रतीतत्वाद्भूयो नेह प्रतन्यते ॥ २२८ इति मन्दरेन्द्राभिषेकः ॥ ४० ततो विद्योपदेशोऽस्य स्वतन्त्रस्य स्वयम्भुवः । शिष्यभावव्यतिक्रान्तिर्गुरुपूजोपलम्भनम् ।। २२९ तदेन्द्राः पूजयन्त्येतं त्रातारं त्रिजगद्गुरुम् । अशिक्षितोऽपि देव त्वं सम्मतोऽसीति विस्मिताः ॥ २३० इति गुरुपूजनम् ॥ ४१ ततः कुमारकालेऽस्य यौवराज्योपलम्भनम् । पट्टबन्धोऽभिषेकश्च तदास्य स्यान्महौजसः ।। २३१ इति यौवराज्यम् ॥ ४२ स्वराज्यमाधिराज्येऽभिषिक्तस्यास्य क्षितीश्वरः । शासतः सार्णवामेनां क्षितिमप्रतिशासनाम् ॥ २३२ इति स्वराज्यम् ॥ ४३
महापुराण
चक्रलाभो भवेदस्य निधिरत्नसमुद्भवे । निजप्रकृतिभिः पूजा साभिषेकाधिराडिति ॥ २३३ इति चक्रलाभः ॥ ४४
( ३९३
हिमवदादि कुलपर्वतावर राहणाऱ्या श्री, नही, घी-बुद्धि, धृति, कीर्ति व लक्ष्मी या सहा देवता जिनमाता मानल्या जातात ।। २२६ ॥
जेव्हां प्रभूंचा जन्म होतो तेव्हा देवेन्द्र स्वर्गावरून येतात आणि क्षीरसमुद्राच्या पवित्र पाण्यांनी मेरु पर्वतावर परमेष्ठी जिनबालकाचा अभिषेक करतात त्या क्रियेला मन्दरेन्द्राभिषेक म्हणतात. ती क्रिया प्रसिद्ध असल्यामुळे येथे तिचा विस्तार सांगत नाही. याप्रमाणे मन्दरेन्द्राभिषेक क्रिया ही ४० वी क्रिया आहे ।। २२७-२२८ ।।
यानंतर जे स्वतन्त्र व स्वयम्भू आहेत अशा भगवंताचा विद्योपदेश होतो. अर्थात् शिष्यपणावाचूनच ते गुरुपूजेला प्राप्त होतात. तेव्हा सर्वांचे रक्षण करणारे त्रैलोक्यगुरु अशा जिनेश्वरांचे इन्द्र पूजन करतात व हे प्रभो, आपण अशिक्षित असूनही आम्हास गुरु म्हणून मान्य आहात असे आश्चर्याने म्हणतात. याप्रमाणे गुरुपूजन ही क्रिया ४१ वी आहे ।। २२९-२३० ॥
यानंतर कुमारावस्था प्राप्त झाल्यावर या जिनदेवाला यौवराज्याची प्राप्ति होते व त्यावेळी महातेजस्वी अशा या जिनेश्वरास पट्टबंधन अभिषेक होतो. ही योवराज्यक्रिया ४२ वी आहे ।। २३१ ॥
मग अनेक राजानी मुख्यराजाच्या पदावर या जिनेश्वराचा अभिषेक केल्यावर जिच्यावर दुसऱ्याची आज्ञा चालत नाही अशा समुद्रासह या पृथ्वीवर आपली आज्ञा प्रभु चालवितात. अशा या प्रभूंची ही स्वराज्यक्रिया होय ।। २३२ ।।
Jain Education International
यानंतर या प्रभूला निधि व रत्नांची प्राप्ति होते व चक्ररत्नही प्राप्त होते. त्यावेळी सर्व प्रजा परिवार त्याना राजाधिराज मानून त्यांचा अभिषेकपूर्वक आदर करतात. ही चक्रलाभ नांवाची चव्वेचाळीसावी क्रिया होय ।। २३३ ॥
म. ५०
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org