________________
३३८)
महापुराण
(३६-१७०
पुष्करः पुष्करोदस्तन्यस्तैरषिपदद्वयम् । स्तम्बेरमा मुनि भेजुरहो शमकरं तपः ॥ १७० उपानि भोगिनां भोगविनीलय॑रुचन्मुनिः । विन्यस्तैरर्चनायेव नीलरुत्पलदामकः ॥ १७१ फणमात्रोद्गता रन्ध्रात्फणिनः सितयोऽद्युतन् । कृताः कुवलयरर्घा मुनेरिव पदान्तिके ॥ १७२ रेजुर्वनलता नम्रः शाखाद्यैः कुसुमोज्ज्वलः । मुनि भजन्त्यो भक्त्येव पुष्पार्धेनंतिपूर्वकम् ॥ १७३ शश्वविकासिकुसुमैः शाखाग्नेरनिलाहतः । बभुवनगुमास्तोषानिनृत्सव इवासकृत् ॥ १७४ कलरलिरुतोद्गीतः फणिनो नन्तुः किल । उत्फणाः फणरत्नांशुदीप्रैर्भोगविवर्तितः ॥ १७५ पुंस्कोकिलकलालापडिण्डिमानुगतल्यैः । चक्षुःश्रवस्सु पश्यत्सु तद्विषो नटिषुर्मुहुः ॥ १७६ महिम्ना शमिनः शान्तमित्यभूत्तच्च काननम् । धत्ते हि महतां योगः शममप्यशमात्मसु ॥ १७७
..........................................
हत्तीनी आपल्या सोंडाच्या अग्रभागानी कमले आणली व ती या मुनिराजाच्या दोन चरणाजवळ ठेविली व अशारीतीने त्यानी त्या मुनिवर्याची भक्ति केली. अहो हे तप शान्ति उत्पन्न करणारे आहे असे कोण म्हणाणर नाही बरे ? ।। १७० ॥
मुनिराजाच्या पायाजवळ नीलसांची वेटाळयानी शोभत असलेली शरीरे जणु त्यांचे पूजनासाठी नीलकमलांच्या माला ठेवल्या आहेत अशारीतीने ते मुनिराज शोभले ॥ १७१ ॥
ज्यानी वारुळाच्या छिद्रातून फणामात्र वर काढला आहे असे काळे सर्प त्या मुनीश्वराच्या चरणाजवळ जणु त्याना अर्घ अर्पण केल्याप्रमाणे शोभू लागले ॥ १७२ ॥
पुष्पानी उज्ज्वल दिसणाऱ्या व शाखांच्या शेंड्यानी नम्र झालेल्या वनलता जणु भक्तीने नम्र होऊन व फुलानी अर्घ अर्पण करून त्या मुनींची पूजा करीत आहेत असे वाटले ॥ १७३॥
ज्यांची फुले नेहमी प्रफुल्ल आहेत, वारंवार वान्याने हालत आहेत, डुलत आहेत अशा शाखांच्या अग्रभागानी युक्त असे वृक्ष आनंदाने अनेकवेळा जणु नाचण्याची इच्छा करीत आहेत असे शोभले ।। १७४ ।।
मधुर अशा भुंग्यांच्या उच्च झंकारानी ज्यानी आपल्या फणा वर केल्या आहेत व फणावरील रत्नकिरणानी प्रकाशित ज्याची शरीरे झाली आहेत असे सर्प आपली ती शरीरे वळवून नृत्य करीत आहेत असे शोभत होते ॥ १७५ ॥
नरकोकिलांच्या मधुर गायन-कुहुकुहू असे जे मधुर शब्द हेच डिडिम-वाद्ये त्याना अनुसरून असणाऱ्या लयानी सर्प पाहत असता त्यांचे शत्रु-अर्थात् मोर वारंवार नृत्य करू लागतात ॥ १७६ ॥
त्या शमदमशील बाहुबलि मुनीशाच्या प्रभावाने वर वर्णिल्याप्रमाणे त्या वनात चोहोकडे शान्ति पसरली. बरोबरच आहे की, महापुरुषांचा संबंध झाला असता जे अशान्त वृत्तीचे आहेत त्यांच्याही ठिकाणी शान्ति उत्पन्न होते ॥ १७७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org