SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 23
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महापुराण (२५-८१ ज्ञानावरणनि सान्नमस्तेऽनन्तचक्षुषे । दर्शनावरणोच्छेदान्नमस्ते विश्वदृश्वने ॥ ८१ नमो दर्शनमोहघ्ने क्षायिकामलवृष्टये । नमश्चारित्रमोहघ्ने विरागाय महौजसे ॥ ८२ नमस्तेऽनन्तवीर्याय नमोऽनन्तसुखात्मने । नमस्तेऽनन्तलोकाय लोकालोकावलोकिने ॥ ८३ नमस्तेऽनन्तदानाय नमस्तेऽनन्तलब्धये । नमस्तेऽनन्तभोगाय नमोऽनन्तोपभोगिने ॥ ८४ नमः परमयोगाय नमस्तुभ्यमयोनये । नमः परमभूताय नमस्ते परमर्द्धये ॥ ८५ नमः परमविद्याय नमः परमतच्छिदे । नमः परमतत्त्वाय नमस्ते परमात्मने ॥ ८६ नमः परमरूपाय नमः परमतेजसे । नमः परममार्गाय नमस्ते परमेष्ठिने ॥ ८७ . ज्ञानावरण कर्माचा आपण नाश केला व त्यामुळे आपण अनन्तचक्षु-अनन्तज्ञानी झाला म्हणून आपणास नमस्कार असो व दर्शनावरण कर्माचा आपण नाश केला त्यामुळे आपण विश्वदृश्वा- सर्व जगाला पाहणारे झालेले आहात म्हणून विश्वदृश्वा नामधारक अशा आपणास नमस्कार असो ॥ ८१ ॥ हे आदिभगवंता, आपण दर्शनमोहकर्माचा नाश करून निर्मल क्षायिक सम्यग्दर्शन प्राप्त करून घेतले यास्तव आपणास मी नमस्कार करतो. हे प्रभो, आपण चारित्रमोहाचा नाश करून वीतराग आणि महातेजस्वी झाला म्हणून माझे आपणास वंदन आहे ।। ८२ ॥ हे प्रभो, अनंतवीर्यधारक व अनंतसुखी अशा आपणास माझी वंदना आहे. आपण अनंतज्ञानप्रकाशाने युक्त आहात म्हणून माझे वंदन व लोक आणि अलोकाला आपण पाहता म्हणून मी आपणास वंदितो ।। ८३ ॥ आपण अनंत अभयदान देता म्हणून आपणास वंदन आहे व आपणास अनन्तलाभ प्रतिक्षणी होतो म्हणून आपणास मी नमितो. आपणास अनन्तभोगप्राप्ति झाली म्हणून मी वंदन करतो व अनंत उपभोग पदार्थ प्राप्त होतात. म्हणून मी नमस्कार करतो ॥ ८४ ॥ हे आदिजिनेशा, आपण उत्तम ध्यानी आहात म्हणून आपणास वंदितो आणि आपण अयोनि अर्थात् योनिभ्रमणाने रहित आहा यास्तव आपणास मी वंदन करतो. आपण अत्यन्त पवित्र आहात म्हणून आपणास माझी वंदना व आपण परमऋषि आहात म्हणून आपणास वंदन ।। ८५ ॥ हे प्रभो, आपणास उत्कृष्ट विद्या-केवलज्ञान प्राप्त झाले आहे म्हणून आपणास वंदना, आपण अन्य एकान्तवादी मतांचे खंडन केले आहे यास्तव आपणास नमन करतो. हे प्रभो, आपण उत्कृष्ट शुद्ध जीवतत्व आहात व आपण परमात्मा आहात म्हणून आपणास नमस्कार ॥८६॥ हे प्रभो, आपण उत्तमरूप धारक आहा, परमतेजस्वी आहा, उत्तम मोक्षाची प्राप्ति करून देणारे जे रत्नत्रय हाच उत्तममार्ग तेच रत्नत्रय आपले स्वरूप आहे व आपण परमेष्ठिस्वरूप आहात. म्हणून आपणास मी नमस्कार करतो ।। ८७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy