SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 24
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २५-९५) महापुराण (१३ परमं भेजुषे धाम परमज्योतिषे नमः । नमः पारेतमःप्राप्तधाम्ने परतरात्मने ॥८८ नमः क्षीणकलडकाय क्षीणबन्ध नमोऽस्तु ते । नमस्ते क्षीणमोहाय क्षीणदोषास्तु ते नमः ॥८९ नमः सुगतये तुभ्यं शोभनां गतिमीयुषे । नमस्तेऽतीन्द्रियज्ञानसुखायानिन्द्रियात्मने ॥ ९० कायबन्धननिर्मोक्षादकायाय नमोऽस्तु ते । नमस्तुभ्यमयोगाय योगिनामधियोगिने ॥ ९१ अवेदाय नमस्तुभ्यमकषायाय ते नमः । नमः परमयोगीन्द्रवन्दिताङघ्रिद्वयाय ते ॥ ९२ नमः परमविज्ञान, नमः परमसंयम । नमः परमदृग्दृष्टपरमार्थाय तायिने ॥ ९३ नमस्तुभ्यमलेश्याय शुद्धलेश्यांशकस्पृशे । नमो भव्यतरावस्थाव्यतीताय विमोक्षिणे ॥ ९४ संज्ञयसंज्ञिद्वयावस्थाव्यतिरिक्तामलात्मने । नमस्ते वीतसंज्ञाय नमः क्षायिकदृष्टये ॥ ९५ हे प्रभो, आपण उत्कृष्टधाम अर्थात् मुक्तिस्थानाला सेवन करणारे आहात व आपण परमज्योतिःस्वरूप आहात. आपले ज्ञानरूपी तेज अंधकाराच्या पलीकडे आहे व आपण उत्कृष्ट आत्मस्वरूपाचे धारक आहात. यास्तव आपणास मी नमस्कार करतो ।। ८८ ॥ हे प्रभो, आपला कर्मकलंक सर्व नाश पावला आहे. म्हणून आपणास नमस्कार. आपले कर्मबंधन क्षीण झाले आहे. म्हणून आपणास नमन असो. आपले मोहकर्म सर्व क्षीण-नष्ट झाले आहे व आपण क्षुधातृषादि अठरा दोषांचा नाश केला आहे म्हणून आपणास नमन असो ।।८९।। हे प्रभो, आपण मुक्तिरूपी उत्तम गतीला प्राप्त करून घेणार आहात. म्हणून सुगतियुक्त अशा आपणास नमस्कार असो. आपले ज्ञान व सुख अतीन्द्रिय आहे व आपला आत्मा अतीन्द्रिय आहे. म्हणून आपणास नमस्कार ॥ ९० ॥ आपले शरीररूपी बन्धन नष्ट झाल्यामुळे आपण अकाय आहात. म्हणून आपणास नमस्कार असो. हे प्रभो, आपण अयोग-योगरहित आहात व योगि-मुनिजनात श्रेष्ठ योगी आहात. म्हणून आपणास वंदन ॥ ९१ __ आपण वेदरहित-स्त्रीवेदादिरहित व अकषाय-कषायरहित आहा. म्हणून आपणास नमस्कार. महायोगीश्वराकडून आपले दोन पाय वंदिले जातात. म्हणून आपणास नमस्कार ॥ ९२॥ उत्कृष्ट ज्ञानसंपन्न अशा आपणास नमस्कार. उत्कृष्ट यथाख्यातचारित्रसंपन्न अशा आपणास नमस्कार. हे भगवन् उत्कृष्ट दर्शनाने केवलदर्शनाने परमार्थाला आपण पाहिले आहे व आपण तायी - सर्वांचे रक्षक आहात ।। ९३ ।। हे भगवंता आपण लेश्यारहित पण आपण शुद्ध लेश्येच्या अंशाना स्पर्श करणारे आहात. हे प्रभो आपण भव्य व अभव्य या दोन्ही अवस्थांनी रहित आहा व मोक्षाने युक्त आहात म्हणून आपणास नमन आहे ।। ९४ ।। हे प्रभो, आपण संज्ञी व असंज्ञी या दोन्ही अवस्थांनी रहित व निर्मल आत्मा आहात म्हणून आपणास नमस्कार. आपण संज्ञारहित आहा व क्षायिक सम्यग्दर्शनयुक्त आहात. म्हणून आपणास नमस्कार मी करतो ।। ९५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy