________________
१४)
महापुराण
(२५-९६
अनाहाराय तप्ताय नमः परमभाजुषे । व्यतीताशेषदोषाय भवाग्धेः पारमीयुषे ॥ ९६ अजराय नमस्तुभ्यं नमस्ते स्तादजन्मने । अमृत्यवे नमस्तुभ्यमचलायाक्षरात्मने ॥९७ अलमास्तां गुणस्तोत्रमनन्तास्तावका गुणाः । त्वां नामस्मृतिमात्रेण पर्युपासिसिषाम्यहम् ॥९८ प्रसिद्धाष्टसहस्रद्धलक्षणं त्वां गिरां पतिम् । नाम्नामष्टसहस्रेण तोष्टुमोऽभीष्टसिद्धये ॥ ९९ श्रीमान् स्वयम्भूर्वृषभः शम्भवः शम्भुरास्मभूः । स्वयम्प्रभः प्रभुर्भोक्ता विश्वभूरपुनर्भवः॥१०० विश्वात्मा विश्वलोकेशो विश्वतश्चक्षुरक्षरः । विश्वविद्विश्वविद्यशो विश्वयोनिरनश्वरः॥१०१
आपण आहाररहित असूनही तृप्त आहात व उत्तम कान्तीने सेविलेले आहात. म्हणून आपणास नमस्कार मी करतो. आपण संपूर्ण दोषांनी रहित आहात व संसारसमुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचलेले आहात. म्हणून आपणास नमस्कार असो ।। ९६ ।।
हे प्रभो, आपण अजर वृद्धावस्थेनें रहित आहा म्हणून आपणास नमस्कार. आपण जन्मरहित आहात म्हणून नमस्कार व मृत्युरहित असल्यामुळे नमस्कार. आपण कालत्रयीही निश्चल व अविनाशी आहात म्हणून आपणास नमस्कार आहे ॥ ९७ ॥
हे भगवंता, तुझ्या गुणांची स्तुति करणे पुरे. कारण तुझे गुण अनन्त आहेत. आता फक्त आम्ही तुझ्या नांवाचे स्मरण करूनच तुझी उपासना करण्याची इच्छा करीत आहेत ॥९८।।
हे प्रभो, आपली तेजस्वी एक हजार आठ लक्षणे अतिशय प्रसिद्ध आहेत व आपण सर्व वचनांचे स्वामी आहात. आमच्या इष्टसिद्धिसाठी आम्ही आपली एक हजार आठ नांवानी स्तुति करतो ॥ ९९ ।।
श्रीमान्-पुण्यवान् पुरुषांचा जी आश्रय करिते ती श्री होय. अर्थात् संपत्तीला श्री म्हणतात. ती श्री अंतरंग श्री व बहिरंग श्री अशी दोन प्रकारची आहे. अंतरंगश्री-केवलज्ञान, केवलदर्शन, अनन्तसुख व अनन्तशक्ति जिला अनन्त चतुष्टय म्हणतात. बहिरंग श्री समवसरण व अशोकवृक्षादि आठ प्रातिहार्ये. या दोन श्रीनी आपला आश्रय घेतला आहे. म्हणून आपण श्रीमान् आहात ॥१॥ स्वयम्भू- आपण स्वतःच उत्पन्न झालेले आहात. अर्थात् गुरूच्या उपदेशावाचून आपण देह, भोग व संसार यापासून स्वतःच विरक्त झालेले आहात ।। २ ।। वृषभ- वृष-धर्म त्याने आपण शोभता म्हणून आपण वृषभ आहात. अहिंसास्वरूप धर्माने आपण शोभता म्हणून वृषभ ।। ३ ।। शम्भव- आपणास अनन्त सुखाची प्राप्ति झाली आहे म्हणून आपण शम्भव आहात. आपणापासून असंख्य जीवांना सुखाची प्राप्ति होते म्हणून आपण शंभव आहात किंवा सं-उत्तम लोककल्याणासाठी भव आपला जन्म आहे ॥ ४ ।। शम्भु- परमानन्दरूप सुखाची प्राप्ति आपण भव्य जीवांना करून देता म्हणून आपण शम्भु आहात ॥ ५॥ आत्मभू- आपण आपल्याद्वारेच उत्कृष्ट अवस्था प्राप्त करून घेतली आहे. अथवा योगिराज आपल्यामध्ये आपला साक्षात्कार आपल्याद्वारे करून घेतात म्हणून आपण आत्मभू आहात ॥६॥ स्वयम्प्रभ- आपण आपल्याद्वारेच स्वतःला प्रकाशमान करता म्हणून आपण स्वयम्प्रभ आहात ॥ ७॥ प्रभु- आपण समर्थ अथवा सर्वांचे प्रभु आहात ।। ८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org