________________
२५-८०)
महापुराण
(११
वृषभोऽसि जगज्ज्येष्ठः पुरुः पुरुगुणोदयः । नाभेयो नाभिसम्भूतेरिक्ष्वाकुकुलनन्दनः ॥ ७५ त्वमेकः पुरुषस्कन्धस्त्वं वे लोकस्य लोचने । त्वं त्रिधा बुद्धसन्मार्गस्त्रिज्ञस्त्रिज्ञानधारकः ॥ ७६ चतुःशरणमाङ्गल्यमूर्तिस्त्वं चतुरस्रधीः । पञ्चब्रह्ममयो देव पावनस्त्वं पुनीहि माम् ॥ ७७ स्वर्गावतरणे तुभ्यं सद्योजातात्मने नमः । जन्माभिषेकवामाय वामदेव नमोऽस्तु ते ॥ ७८ सुनिष्क्रान्तावघोराय पदं परममीयुषे । केवलज्ञानसंसिद्धावीशानाय नमोऽस्तु ते ॥ ७९ पुरस्तत्पुरुषत्वेन विमुक्तिपदभागिने । नमस्तात्पुरुषावस्थां भाविनी तेऽद्य बिभ्रते ॥ ८०
हे प्रभो, आपण जगात सर्वात ज्येष्ठ-श्रेष्ठ आहात म्हणून आपणास 'वृषभ' म्हणतात. आपल्या ठिकाणी उत्तम गुणांचा उदय झाला आहे म्हणून आपणास 'पुरु' म्हणतात, आपण नाभिराजापासून उत्पन्न झालेले आहात म्हणून आपणास 'नाभेय' म्हणतात व इक्ष्वाकुकुलात उत्पन्न झाल्यामुळे आपण इक्ष्वाकुकुलनंदन आहात ॥ ७५ ।।
___आपण सर्व पुरुषात श्रेष्ठ आहात, मुख्य आहात, म्हणून आपण एक आहात. आपण लोकांना दोन डोळयाप्रमाणे आहात म्हणून आपणाला दोन नेत्र म्हणतात. आपण तीन प्रकारचा मोक्षमार्ग जाणला आहे म्हणून आपण त्रिज्ञ आहात. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान आणि सम्यक्चारित्र यांना मोक्षमार्ग म्हणून जाणता म्हणून आपण 'त्रिज्ञ' आहात. तसेच भूत-भविष्यत् व वर्तमान कालसंबंधी तीन प्रकारचे ज्ञान धारण करीत आहात म्हणूनही आपण त्रिज्ञ आहात. अरहन्त, सिद्ध, साधु आणि केवलज्ञानीनी सांगितलेला धर्म हे चार शरण व मंगल म्हटले जातात. हे प्रभो, आपण या चारांची मूर्ति आहात व आपण चतुरस्रधी अर्थात् चार बाजूच्या चोहोंकडच्या सर्व वस्तूंना जाणता म्हणून चतुरस्रधी आहात व आपण पंच परमेष्ठिस्वरूप आहात म्हणून आपण पंच ब्रह्ममय आहात. हे देवा, आपण पावन-पवित्र आहात म्हणून आपण मला पवित्र करा ॥ ७६-७७ ॥
हे प्रभो, स्वर्गातून अवतरून जेव्हां मातेच्या गर्भात आपण आला त्यावेळी आपणास सद्योजात हे नांव प्राप्त झाले म्हणून आपणास आमचा नमस्कार असो व जेव्हां आपला जन्माभिषेक झाला तेव्हां आपण फारच वाम- सुंदर दिसू लागला. म्हणून आपणास वामदेव हे नांव प्राप्त झाले. म्हणून आपणास नमस्कार असो ॥ ७८ ॥
जेव्हां आपण दीक्षेच्या वेळी घराचा त्याग केला अर्थात् आपण दीक्षा घेतली त्यावेळी आपण अघोरपदाला-शान्तस्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून आपणास आमचे वंदन असो व केवलज्ञानाची आपणास प्राप्ति झाली तेव्हां आपण ईशान- त्रिलोकाधिपति झाला म्हणून ईशान अशा आपणास नमस्कार असो ।। ७९ ।।
यानंतर आपण पुढे शुद्धआत्मस्वरूपाच्या द्वारे मोक्षाला जाल-मुक्तपद धारण कराल तेव्हां आगामी कालाच्या अपेक्षेने आपण होणा-या पुरुषावस्थेला आज धारण केले असे समजून आम्ही 'पुरुषनामधारक' अशा आपणास वंदन करतो ॥ ८० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org