SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 328
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३६-१६) महापुराण (३१७ चमूमतङ्गाजाः सज्जशस्त्राः सजयकेतनाः । कुलशैला इवायाताः प्रभोः स्वबलदर्शने ॥९ गजस्कन्धगता रेजुबूंर्गता विधृताडकुशाः । प्रदीप्तोद्धटनेपथ्या दः सम्पिण्डिता इव ॥ १० कौक्षेयकैनिशातानधाराः सादिनो बभुः । मूर्तीभूय भुजोपानलग्नेर्वा स्वः पराक्रमः ॥११ धन्विनः शरनाराचसम्भृतेषुधयो बभुः । वनक्ष्माजा महाशाखाः कोटरस्थैरिवाहिभिः ॥ १२ रथिनो रथकटयासु सम्भृतोचितहेतयः । सङग्रामवाधितरणे प्रस्थिता नाविका इव ॥ १३ भटा हस्त्युरसं भेजः सशिरस्त्रतनुत्रकाः । समुत्खातनिशातासिपाणयः पादरक्षणे ॥ १४ । पुस्फुरुः स्फुरवस्त्रौघा भटाः संदंशिताः परे । औत्पातिका इवानीलाः सोल्का मेघाः समुत्थिताः॥१५ करवालं करालाग्रं करे कृत्वा भटोऽपरः । पश्यन्मुखरसं तस्मिन्स्वं शौर्य परिजज्ञिवान् ॥ १६ भरतराजा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता जयध्वजानी सहित व शस्त्रास्त्रानी सज्ज असे त्याचे सैन्यातील हत्ती जणु कुलपर्वत भरतराजाला स्वतःचे बल दाखविण्यासाठी आले आहेत असे शोभले ॥ ९ ॥ उज्ज्वल आणि वीराना शोभणारा ज्यांचा वेष आहे, ज्यांनी हातात अंकुश घेतले आहे व जे हत्तीच्या स्कन्धावर-खांद्यावर बसले आहेत असे महात जणु एकत्र झालेले हे गर्वाचे पिण्ड आहेत असे दिसले ॥ १० ॥ ज्यांच्या पुढील धारेचे अग्रभाग फार तीक्ष्ण आहेत व जे मूर्तरूप धारण केलेले जणु स्वतःचे पराक्रम आहेत व जे बाहूंच्या वरच्या अग्रावर अवलम्बलेले आहेत अशा खड्गानी युक्त असलेले घोडेस्वार फार शोभले ॥ ११ ॥ ज्यांनी आपल्या भात्यात अनेक प्रकारचे बाण भरले आहेत असे धनुर्धारी वीर ज्यांच्या ढोलीत सर्प आहेत अशा व ज्यांना मोठ्या फांद्या आहेत अशा अरण्यातील वृक्षाप्रमाणे शोभत होते ॥ १२॥ ___ ज्यांनी आपल्या रथात युद्धोपयोगी शस्त्रे भरली आहेत, असे रथांत बसलेले वीर जणु असे चालले होते की, ते युद्धरूपी समुद्राला तरून जाणाऱ्या नावाड्याप्रमाणे दिसू लागले होते ॥ १३ ॥ ज्यांनी आपल्या मस्तकावर टोप व अंगावर चिलखत धारण केले आहे व म्यानातून बाहेर काढलेल्या तीक्ष्ण तरवारी ज्यांनी हातात घेतल्या आहेत, असे काही योद्धे मुख्य हत्तीच्या पुढे त्याच्या पायांचे रक्षण करण्यासाठी उभे राहिले ॥ १४ ॥ ज्याचा शस्त्रसमूह चमकत आहे व ज्यांनी चिलखते. आपल्या अंगात घातली आहेत असे अन्य योद्धे ज्यांच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असे उत्पातकाली प्रकट झालेले जणु नीलवर्णाचे मेघ आहेत अशा रीतीने चमकू लागले ॥ १५ ॥ ज्याची धार तीक्ष्ण आहे असा खड्ग हातात घेऊन त्यात आपल्या मुखाचा रंग पाहणाऱ्या कोणी योद्धयाने आपला शूरपणा जाणून घेतला ।। १६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy