________________
७०६)
महापुराण
(४७-३९२
अथ कदाचिदसौ वदनाम्बुजे समभिवीक्ष्य समुज्ज्वलदर्पणे। पलितमैक्षत दूतमिवागतं परमसौख्यपदात्पुरुसन्निधेः ॥ ३९२ आलोक्य तं गलितमोहरसः स्वराज्यं मत्वा जरत्तृणमिवोद्गतबोधिरुद्यन् । आदातुमात्महितमात्मजमर्ककीति लक्ष्म्या स्वया स्वयमयोजयजितेच्छः ॥ ३९३ . विदितसकलतत्वः सोऽपवर्गस्य मार्ग जिगमिषुरपसत्त्वैर्दुर्गमं निष्प्रयासम् । यमसमितिसमग्रं संयम शम्बलं वादित विदितसमर्थाः किं परं प्रार्थयन्ते ॥ ३९४ मनःपर्ययज्ञानमप्यस्य सद्यः समुत्पन्नवत्केवलं चानु तस्मात् ॥ तदैवाभवद्भव्यता तादृशी सा। विचित्राङगिनां निर्वृतेः प्राप्तिरत्र ॥ ३९५ स्वदेशोद्भवैरेव सम्पूजितोऽसौ । सुरेन्द्रादिभिः साम्प्रतं वन्द्यमानः॥ त्रिलोकाधिनाथोऽभवतिक न साध्यम् । तपो दुष्करं चेत्समादातुमीशः ॥ ३९६
एके वेळी भरतेश्वराने अतिशय उज्ज्वल अशा दर्पणात आपले मुखकमल पाहिले. त्यावेळी त्यावर वृद्धावस्थेचा जणु दूत उत्तम सौख्याचे स्थान आहे अशा आदिभगवंतांच्या जवळ आपणास जणु बोलावण्यासाठी आला आहे असा जरेमुळे आलेला पांढरेपणा पाहिला ॥३९२॥
तो पांढरेपणा पाहून भरताचा मोहरस सगळा गळून गेला. त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. त्याने आपले स्वराज्य जीर्ण गवताप्रमाणे तुच्छ मानले. आत्महित ग्रहण करण्यासाठी तो उद्युक्त झाला व ज्याची इच्छा उत्कृष्ट आहे अशा त्या भरताने आपल्या राज्यलक्ष्मीबरोबर अर्ककीर्तिला जोडले ।। ३९३ ।।
ज्याला सर्व तत्त्वांचे स्वरूप समजले आहे अशा ह्या चक्रवर्तीने धैर्यरहित लोक ज्यातून जाण्यास असमर्थ आहेत अशा मोक्षमार्गात प्रथासावाचून जाण्याची इच्छा धरली. महाव्रते, ईर्यासमित्यादिक समिति यांनी युक्त अशी संयमरूपी शिदोरी त्याने आपल्या बरोबर घेतली. बरोबरच आहे की, ज्याना परमार्थाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. ते लोक इतराची प्रार्थना करीत नसतात. अर्थात् भरतेश्वराने स्वतःच दीक्षा घेतली ।। ३९४ ॥
तत्काळ भरतेशमुनीना मनःपर्ययज्ञान उत्पन्न झाले. त्याच्या पाठोपाठ केवलज्ञानही उत्पन्न झाले. त्याचवेळी त्याला अपूर्व अशी भव्यता प्राप्त झाली व हे योग्यच आहे की, प्राण्याना मोक्षाची प्राप्ति मोठ्या विचित्रतेने होते ॥ ३९५ ॥
हा भरतचक्री पूर्वी फक्त आपल्या देशातल्या राजेलोकाकडूनच पूजिला जात होता पण आता इन्द्रादिकांच्याद्वारे देखील पूजनीय झाला, वंदनीय झाला ; एवढेच नाही तर तो भरतयतीश्वर त्रैलोक्याचा नाथ देखिल झाला आहे. हे बरोबरच आहे की, जे कठिण तपश्चरण करण्यास समर्थ असतात त्याना कोणती वस्तु साध्य होत नाही बरे ? अर्थात् त्याना सर्व वस्तु साध्य होतात ।। ३९६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org