SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 406
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३८-२५२) विलसद्ब्रह्मसूत्रेण प्रविभक्ततनुन्नतिः । तटनिर्झर सम्पातरम्य मूर्तिरिवाद्रिपः ॥ २४५ सद्रत्नकटकं प्रोच्चैः शिखरं भुजयोर्युगम् । द्राधिमश्लाघि बिभ्राणः कुलक्ष्माद्वयायितम् ॥ २४६ कटिमण्डलसंसक्त लसत्काञ्चीपरिच्छदः । महाद्वीप इवोपान्त रत्नवेदी परिष्कृतः ।। २४७ मन्दारकुसुमामोदलग्नालिकुलझङकृतैः । किमप्यारब्धसङ्गीतमिव शेखर मुद्वहन् ॥ २४८ तत्कालोचितमन्यच्च दधन्मङगलभूषणम् । स तदा लक्ष्यते साक्षालक्ष्म्याः पुञ्ज इवोच्छिरवः ॥ प्रीताश्चाभिष्टुवन्त्येनं तदामी नृपसत्तमाः । विश्वञ्जयो दिशां जेता दिव्यमूर्तिर्भवानिति ।। २५० पौराः प्रकृतिमुख्याश्च कृतपादाभिषेचनाः । तत्क्रमार्चनमादाय कुर्वन्ति स्वशिरोधृतम् ॥ २५१ श्रीदेव्यश्च सरिद्देव्यो देव्यो विश्वेश्वरा अपि । समुपेत्थ नियोगैःस्वैस्तवैनं पर्युपासते ।। २५२ इति चक्राभिषेकः ॥ ४६ महापुराण सरस्वतीच्या रथाच्या दोन चाकाप्रमाणे शोभत होती. प्रभूनी वक्षस्थलावर जो हार धारण केला होता तो तारकांच्या पंक्तीप्रमाणे चमकणाऱ्या मोठ्या मोत्यांनी फार शोभत होता. जणु तो हार प्रभूंच्या वक्षःस्थलरूपी घरावर तोरण बांधल्याप्रमाणे शोभत होता. त्यानी गळयात ब्रह्मसूत्र धारण केले होते ते जणु त्यांच्या देहाची उंची विभागित होते. तटावरून झरे पडत असतांना पर्वत जसा सुंदर दिसतो तसे हे प्रभु त्या ब्रह्मसूत्राने सुंदर दिसत होते. ज्यांचे खांदे उंच आहेत व जे लांब आणि अतिशय सुंदर आहेत व रत्नांच्या कड्यांनी शोभत आहेत असे दोन हात दोन कुलपर्वताप्रमाणे शोभत होते ।। २४२ - २४६ ।। ( ३९५ या प्रभूंच्या कंबरेसभोवती कडदोरा शोभत होता. त्यामुळे ती कंबर सर्वबाजूंनी रत्नमयीवेदीने घेरलेल्या महाद्वीपाप्रमाणे भासत होती ॥ २४७ ॥ मंदारपुष्पांच्या सुगंधाला लुब्ध होऊन ज्याच्यावर भुंगे झंकार करीत असल्यामुळे जणु ज्याने काही मंगलगीत गायाला सुरुवात केली आहे असा तुरा चक्रवर्तीने धारण केला होता ॥ २४८ ॥ त्या चक्राभिषेकाच्या वेळी चक्रवर्तीने आणखी काही मंगलभूषणें धारण केली होती. त्यामुळे ज्यांचे किरण वर पसरले आहेत अशा लक्ष्मीचा तो जणु पुंज आहे असे वाटत होते ॥ २४९ त्या वेळी श्रेष्ठ राजे प्रीतीने हे प्रभो आपण विश्वविजयी, सर्व दिशाना जिंकणारे, व दिव्यमूर्ति आहात अशी स्तुति करूं लागले ।। २५० ।। नगरवासी लोक व मुख्य अधिकारी वर्गाने चक्रीच्या पायांचा अभिषेक केला व त्यांच्या पायांना पूजलेले पदार्थ घेऊन ते आपल्या मस्तकावर ठेवीत असत ।। २५१ ।। Jain Education International श्री ही आदिक देवता, गंगा, सिंधु आदिक नदीदेवता व विश्वेश्वरी आदिक देवतानीही आपल्या नियोगाला अनुसरून त्यावेळी या चक्रवर्तीची उपासना केली. याप्रमाणे चक्राभिषेकाचा ४६ वा संस्कार झाला ।। २५२ ।। For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy