SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 407
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३९६) महापुराण (३८-२५३ ....................... चक्राभिषेक इत्येकः समाख्यातः क्रियाविधिः । तदनन्तरमस्य स्यात्साम्राज्याख्यं क्रियान्तरम् ॥ अपरेधुदिनारम्भे धृतपुण्यप्रसाधनः । मध्येमहानपसभं नपासनमधिष्ठितः ॥ २५४ दीप्रैः प्रकीर्णकवातः स्वर्धनीसोकरोज्ज्वलैः । वारनारीकराधूतैर्वीज्यमानः समन्ततः॥२५५ सेवागतः पृथिव्यादिदेवतांशैः परिष्कृतः। धृतिप्रशान्तिदीप्त्योजोनिर्मलत्वोपपादिभिः ॥ २५६ तान् प्रजानुग्रहे नित्यं समाधानेन योजयन् । संमानदानविधम्भैः प्रकृतीरनुरञ्जयन् ॥ २५७ पार्थिवान्प्रणतान्यूयं न्यायैः पालयत प्रजाः । अन्यायेषु प्रवृत्तिश्चेद्वत्तिलोपो ध्रुवं हि वः ॥ २५८ न्यायश्च द्वितयो दुष्टनिग्रहः शिष्टपालनम् । सोऽयं सनातनः क्षात्रो धर्मो रक्ष्यः प्रजेश्वरैः ॥२५९ दिव्यास्त्रदेवताश्चामूराराध्या:स्युविधानतः । ताभिस्तु सुप्रसन्नाभिरवश्यं भावुको जयः ॥ २६० राजवृत्तिमिमां सम्यक्पालयद्भिरतन्द्रितैः । प्रजासु वर्तितव्यं भो भवद्भिर्यायवर्त्मना ॥ २६१ पालयेद्य इमं धर्म स धर्मविजयी भवेत् । मां जयेद्विजितात्मा हि क्षत्रियो न्यायजीविकः ॥ २६२ चक्राभिषेक हा एक क्रियाविधि सांगितला. यानंतर साम्राज्य नामक आता दुसरी क्रिया सांगतात ।। २५३ ॥ दुसरे दिवशी ज्याने मंगल वस्त्रालंकार धारण केले आहेत असा तो सम्राट् मोठ्या राजसभेत राजसिंहासनावर आरूढ होतो ।। २५४ ॥ चमकणारे व गंगानदीच्या जलकणाप्रमाणे निर्मल शुभ्र असे चामरसमूह हातात घेऊन वारांगना सर्व बाजूंनी या चक्रवर्तीवर ती ज्या धृति सन्तोष, अतिशय शान्ति, कान्ति, ओज-बल व निर्मलपणा उत्पन्न करणाऱ्या देवतांचा अंश धारण करणाऱ्या पृथिव्यादि देवतांनी अर्थात् वैक्रियिक शरीराने आलेल्या देवतानी जो सेविला जात आहे असा तो चक्रवर्ती सिंहासनावर बसून प्रधानादिकांना सम्मान करणे, त्यांना पारितोषिक देणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे इत्यादिकानी त्यांचे अनुरंजन करतो व प्रजेवर अनुग्रह करण्याकरिता त्यांची योजना करतो ।। २५६-२५७ ॥ नम्र झालेल्या राजाना तो चक्रवर्ती असा उपदेश करतो- हे राजानो, तुम्ही न्यायाने प्रजांचे पालन करा. अन्यायांत जर तुमची प्रवृत्ति होईल तर तुमची वृत्ति नष्ट होईल तुम्हाला राज्यपदावरून काढून टाकले जाईल हे निश्चित समजा ॥ २५८ ॥ न्याय दोन प्रकारचा आहे-दुष्टाना शिक्षा करणे व शिष्टांचे पालन-रक्षण करणे. हा क्षत्रियांचा सनातन धर्म प्रजेचे स्वामी असलेल्या राजांनी अवश्य पाळला पाहिजे ॥ २५९ ॥ दिव्य अशा अस्त्रदेवतांची आराधना विधिपूर्वक राजानी केली पाहिजे व त्या सुप्रसन्न झाल्या असता अवश्य जय मिळतो ॥ २६० ।। या क्षत्रियांच्या अर्थात् राजांच्या कर्तव्याचे पालन आळसरहित होऊन त्यांनी केले पाहिजे. हे नृपानो तुम्ही प्रजेविषयी न्यायमार्गाने आपली वागणूक ठेवा. जो क्षत्रिय हा न्यायराजधर्म पाळील, तो धर्मविजयी राजा पृथ्वीला जिंकील. न्यायाने जीविका करणारा राजा अन्यायाचा पराजय करून आपल्या आत्म्याला स्वाधीन करणारा होऊन पृथ्वीला जिकील. ॥ २६१-२६२ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy