________________
४०२)
महापुराण
(३८-३०४
विहारस्तु प्रतीतार्थो धर्मचक्रपुरःसरः । प्रपञ्चितश्च प्रागेव ततो न पुनरुच्यते ॥ ३०४
इति विहारक्रिया ॥५१ ततःपरार्थसंपत्त्यै धर्ममार्गोपदर्शने । कृततीर्थविहारस्य योगत्यागः परा क्रिया ॥ ३०५ विहारस्योपसंहारःसंवृतिश्च सभावनेः । वृत्तिश्च योगरोधार्था योगत्यागः स उच्यते ॥ ३०६ यच्च दण्डकपाटादिप्रतीतार्थ क्रियान्तरम् । तदन्तर्भूतमेवादस्ततो न पृथगुच्यते ॥ ३०७
इति योगत्यागक्रिया ॥ ५२ ततो निरुद्धनिःशेषयोगस्यास्य जिनेशिनः । प्राप्तशैलेश्यवस्थस्य प्रक्षीणाघातिकर्मणः ॥ ३०८ क्रियाग्रनितिमि परनिर्वाणमायषः । स्वभावनितामूवं व्रज्यामास्कन्दतो मता ॥ ३०९ इति निर्वाणपर्यन्ताः क्रिया गर्भादिकाः सदा । भव्यात्मभिरनुष्ठेयास्त्रिपञ्चाशत्समुच्चयात् ॥ यथोक्तविधिनताः स्युरनष्ठेया द्विजन्मभिः । योऽप्यत्रान्तर्गतो भेदस्तं वच्म्युत्तरपर्वणि ॥ ३११
...................
यानंतर प्रभूचा अनेक देशात उपदेश देण्यासाठी विहार होतो याचा अर्थ प्रसिद्ध आहे. अर्थात् पुढे सर्वाण्हयक्ष आपल्या मस्तकावर धर्मचक्र घेऊन जात असतो व प्रभु त्याला अनुसरून विहार करीत असतात. याचे वर्णन मागे केले आहे म्हणून पुनः याचे वर्णन येथे करीत नाहीत. ही विहारक्रिया ५१ वी आहे ॥ ३०४ ।।
यानंतर परोपकार करण्यासाठी धर्ममार्गाचा उपदेश प्रभु करतात अर्थात् अनेक देशांत धर्मोपदेशार्थ विहार करतात व नंतर योगत्याग नांवाची उत्कृष्ट क्रिया होते ।। ३०५ ॥
___ या क्रियेत विहार बंद होतो व समवसरणही नाहीसे होते. मनोयोग, वचनयोग आणि काययोग या योगांचा निरोध करण्याची उत्तम प्रवृत्ति होते. तिला योगत्याग क्रिया म्हणतात. दण्ड, व कपाट आदिकरूपाने आत्मप्रदेश प्रसरण पावतात व पुनः त्यांचा संकोच होतो. याला केवलि समुद्घात म्हणतात. हा समुद्घात या योग-त्याग क्रियेत अन्तर्भूत आहे, वेगळा सांगत नाहीत. ही योग-त्याग क्रिया ५२ वी आहे ।। ३०६-३०७ ।।
यानंतर या जिनेश्वराच्या मनोयोगादि तीन योगांचा पूर्ण निरोध होतो व त्यांना संपूर्ण शीलांचे स्वामित्व लाभते. वेदनीय, नाम, गोत्र आणि आयु या चार अघाति कर्मांचा पूर्ण नाश होतो. सर्व गुणांनी पुष्ट झालेल्या या जिनेश्वराची स्वाभाविक उर्ध्वगति होते. या गतीला अग्रनिर्वृति म्हणतात. ही त्रेपन्नावी क्रिया आहे. याप्रमाणे गर्भापासून आरंभ करून निर्वाणापर्यंत त्रेपन्न क्रिया ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या भव्यानी कराव्यात. जसा यांचा विधि सांगितला आहे तशा या क्रिया कराव्यात. यामध्ये जे पोटभेद आहेत त्यांचे आचार्य पुढील पर्वात वर्णन करतात ॥ ३०८-३११ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org |