SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 109
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ९८) महापुराण (२७-६८ गुग्गुलूनां वनादेष महिषो घनकर्बुरः । निर्याति मृत्युदंष्ट्राभविषाणाग्रोऽतिभीषणः ॥ ६८ लस द्वालधयो लोलजिह्वा व्यालोहितेक्षणाः । व्याला बलस्य संक्षोभममी तन्वन्त्यनाकुलाः ॥ ६९ शरभ: खं समुत्पत्य पतनुत्तानितोऽपि सन् । नैष दुःखासिकां वेद चरणः पृष्ठतिभिः ॥ ७० चमूरोऽयं चमूरोधात् विद्रुतो द्रुतमुत्पतन् । क्षोभं तनोति सैन्यस्य दो रूपी च दुर्धरः ॥ ७१ शशःश्वसन्नयं देव सैनिकरननुद्रुतः। शरणायेव भीतात्मा मध्ये सैन्यं निलीयते ॥ ७२ सारङ्गोऽयं तनुच्छायाकल्माषितवनः शनैः । प्रयाति शृङ्गभारेण शाखिनेव प्रशुष्यता ॥ ७३ दक्षिणेर्मतया विष्वगभिधावप्रवीक्ष्यताम् । प्रजानुपालनं न्याय्यं तवाचष्टे मृगवजः ॥ ७४ । कलापी बहभारेण मन्दं मन्दं वज्ञत्यसौ । केशपाशश्रियं तन्वन् वनलक्षम्यास्तनूरुहैः ॥ ७५ नेत्रावलीमिवातन्वन वनभम्याः सचन्द्रकैः । कलापिनामयं संघो विभात्यस्मिन्वनस्थले ॥७॥ _ज्याच्या शिंगांचे अग्रभाग यमाच्या दाढेप्रमाणे भासत आहेत व जो अतिशय भयंकर दिसत आहे, असा हा मेघाप्रमाणे काळसर असलेला रेडा या गुग्गुळवृक्षांच्या वनातून बाहेर पडत आहे ॥ ६८॥ __ ज्यांची शेपटे चमकत आहेत, ज्यांच्या जिभा चंचल आहेत व ज्यांचे डोळे लालभडक आहेत, असे वाघ सिंह आदि दुष्ट प्राणी सैन्यात क्षोभ उत्पन्न करीत असून स्वतः बिलकुल घाबरत नाहीत असे दिसतात ।। ६९ ।। हा शरभ आकाशात उडी मारून खाली जमिनीवर पडताना उताणा झाला तरीही पाठीवर असलेल्या पायानी तो उभा राहिल्यामुळे पडण्याचे दुःख त्याला समजत नाही ।। ७० ॥ असह्य व मूर्तिमान् जणु गर्वच असो हा वाघ सैन्याने अडविल्यामुळे शीघ्र उड्या मारून सैन्यात मोठी गडबड करीत आहे ॥ ७१ ॥ हे प्रभो, उड्या मारीत पळणा-या या सशाच्या मागे कोणी सैनिक धावले नाहीत तथापि भित्र्या स्वभावाचा हा ससा श्वास घेत जणु सैनिकाना शरण जाऊन त्यांच्यातच कोठे तरी लपत आहे ।। ७२ ।। __ आपल्या शरीराच्या कान्तीने वनाला काळसर करणारा हा काळवीट सुकलेल्या झाडाप्रमाणे फांद्या फुटलेल्या शिंगाच्या ओझ्याने हळूहळू चालत आहे ।। ७३ ।। हे प्रभो, शरीराच्या उजव्या बाजूला व्रण झाल्यामुळे चोहीकडे पळणारा हा हरणांचा समूह प्रजेचे पालन करणे हेच तुझे योग्य कर्तव्य आहे असे आपणास सांगत आहे तिकडे आपण लक्ष्य द्यावे ॥ ७४॥ हा मोर आपल्या पिसान्याच्या ओझ्याने हळुहळु गमन करीत आहे व आपल्या पंखानी वनलक्ष्मीच्या केशपाशाच्या शोभेला वृद्धिंगत करीत आहे ॥ ७५ ।। आपल्या चन्द्रकयुक्त पिसान्यानी या वनभूमीला अनेक नेत्रांच्या पंक्तीनी जणु युक्त केले आहे. असा हा मोरांचा समुदाय या वनस्थलांत शोभत आहे ।। ७६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy