SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 108
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २७-६७) महापुराण दृष्टीनामप्यगम्येऽस्मिन् वने मृगकदम्बकम् । नानाजातीयमुभ्रान्तं सैन्यक्षोभात्प्रधावति ॥ ५९ इदमस्माबलक्षोभादुत्रस्तमृगसङकुलम् । वनमाकुलितप्राणमिवाभात्यन्धकारितम् ॥ ६० गजयूथमितःकच्छादन्धकारमिवाभितः । विश्लिष्टं बलसङक्षोभादपसर्पत्यतिद्रुतम् ॥ ६१ शनैःप्रयाति सजिघ्रन्दिशः प्रोत्क्षिप्तपुष्करः । समहाहिरिवादीन्द्रो भद्रोऽयं गजयूथपः ॥ ६२ महाहिरयमायाम मिमान इव भूरुहाम् । श्वसन्नागच्छते कच्छादूर्वीकृतशरीरकः ॥ ६३ शयुपोता निकुञ्जस्मिन्युजीभूताःश्वसन्त्यमी । वनस्येवान्त्रसन्तानाश्चमूक्षोभाद्विनिःसृताः ॥ ६४ अयमेकचरःप्रोथसमुत्खातान्तिकस्थलः । रुणद्धि वर्त्म सैन्यस्य वराहस्तीवरोषणः ॥ ६५ सैनिकरयमारुतः पाषाणलकुटादिभिः । आकुलीकुरुते सैन्यं गण्डो गण्ड इव स्फुटम् ॥ ६६ प्राणा इव वनावस्माद्विनिष्कामन्ति सन्तताः । सिंहा बद्धदवज्वाला धुन्वानाः केशरच्छटाः ॥ ६७ ज्यात दृष्टींचाही प्रवेश होत नाही अशा या दाट वनामध्ये अनेक जातींच्या पशंचा समूह आहे व तो सैन्याच्या शब्दानी क्षुब्ध होऊन इकडे तिकडे पळत आहे ॥ ५९॥ ___आमच्या सैन्याने केलेल्या उपद्रवामुळे हा हरिणांचा समूह अगदी भयाने त्रासलेला आहे. त्यामुळे चोहीकडे अंधकाराने भरलेले हे वन ज्याचे प्राण व्याकुळ झाले आहेत असे दिसत आहे ॥६०॥ या इकडच्या पाणथळ प्रदेशातून आमच्या सैन्याच्या उपद्रवाने वेगळा वेगळा झालेला हा हत्तींचा अंधाराप्रमाणे असलेला कळप अतिशय वेगाने चोहीकडे पळू लागला आहे ॥ ६१ ॥ मोठ्या सर्पाने युक्त असलेला जणु हा मोठा मेरुपर्वत आहे असा भासणारा हत्तीच्या कळपाला नायक असलेला ज्याने आपल्या सोंडेचा अग्रभाग वारंवार उंच केलेला आहे, असा हा भद्रजातीचा हत्ती हळूहळू दिशांचा वास घेत घेत जात आहे ।। ६२ ॥ जणु वृक्षांची लांबी मोजतो आहे असा हा मोठा सर्प आपले शरीर उंच करून व फूत्कार करीत पाणथळ प्रदेशाहून इकडे येत आहे ॥ ६३ ॥ ___ या लतागृहात एके ठिकाणी गोळा झालेली ही अजगरांची पिले सैन्याच्या क्षोभाने बाहेर पडलेली जणु या वनाची आतडी आहेत अशी भासत आहेत व फूत्कार करीत आहेत ॥६४॥ जो खूप रागावला आहे आणि आपल्या नाकाने ज्याने जवळची जमीन खोदलेली आहे व एकटाच फिरणारा असा हा रानटी डुकर सैन्याचा मार्ग आडवून उभा राहिला आहे. हे प्रभो, आपण त्याला बघा ।। ६५ ॥ जणु पर्वताचा मोठा पाषाण भासणारा हा गेंडा पाषाण व लाकडे यानी सैनिकानी आडविला आहे तथापि सैन्याला स्पष्टपणे व्याकुळ करीत आहे ॥ ६६ ॥ अग्नीच्या ज्वालेप्रमाणे दिसणाऱ्या मानेवरच्या दाट केसराना हालविणारे असे सिंह या वनातून अशा रीतीने बाहेर निघत आहेत की जणु ते या वनाचे प्राण बाहेर पडत आहेत असे वाटत आहे ॥ ६७ ।। म. १३ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy