SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 425
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४१४) महापुराण (३९-८५ पितुरन्वयशुद्धिर्या तत्कुलं परिभाष्यते । मातुरंन्वयशुद्धिस्तु जातिरित्यभिलप्यते ॥ ८५ विशुद्धिरुभयस्यास्य सज्जातिरनवणिता। यत्प्राप्तौ सुलभा बोधिरयत्नोपनत्तैर्गुणैः ॥ ८६ सज्जन्मप्रतिलम्भोऽयमार्यावर्ते विशेषतः । सत्यां देहादिसामग्रयां श्रेयः सूते हि देहिनाम् ॥ ८७ शरीरजन्मना सैषा सज्जातिरुपणिता । एतन्मूला यतः सर्वाः पुंसामिष्टार्थसिद्धयः ॥८८ संस्कारजन्मना चान्या सज्जातिरनुकीय॑ते । यामासाद्य द्विजन्मत्वं भव्यात्मा समुपाश्नुते ॥ ८९ विशुद्धाकरसम्भूतो मणिः संस्कारयोगतः । यात्युत्कर्ष यथात्मैवं क्रियामन्त्रैः सुसंस्कृतः ॥ ९० सुवर्णधातुरथवा शुद्धोदासाद्य संस्क्रियाम् । यथा तथैव भव्यात्मा शुद्धयत्यासादितक्रियः ॥ ९१ ज्ञानजः स तु संस्कारः सम्यग्ज्ञानमनुत्तरम् । यदाथ लभते साक्षात्सर्वविन्मुखतः कृती ॥ ९२ तदेष परमज्ञानगर्भात्संस्कारजन्मना । जातो भवेद्विजन्मेति व्रतैः शीलैश्च भूषितः ॥ ९३ .....................-. पित्याच्या वंशाची जी शुद्धि तिला कुल म्हणतात आणि मातेच्या वंशाची जी शुद्धि तिला जाति म्हणतात. या पिता व मातेच्या वंशशद्धीला सज्जाति म्हणतात व या दोन कूल शुद्धि व जातिशुद्धीची प्राप्ति झाली असता प्रयत्नावाचून प्राप्त झालेल्या गुणानी रत्नत्रयाची प्राप्ति सुलभ होते ।। ८५-८६ ।। अशारीतीचा विशुद्ध आणि उत्तम जन्म प्राप्त होणे ही गोष्ट या आर्यावर्तातच विशेषरीतीने आढळून येते. विशुद्ध कुल व विशुद्ध जातिमुळे देहादिसामग्री निर्दोष प्राप्त होते व त्यामुळे प्राण्यांचे अनेक प्रकारानी कल्याण होते. या दोन शुद्धीनी शरीरजन्म झाला म्हणजे त्याला सज्जाति म्हणतात. अशारीतीने शरीरजन्म झाला असता त्यापासून पुरुषाना सर्व प्रकारच्या इष्टपदार्थाच्या सिद्धि होतात ॥ ८७-८८ ।। संस्काररूप जन्माने दुसरी सज्जाति शास्त्रकार वर्णितात. संस्कारानी प्राप्त झालेल्या सज्जातीने भव्यात्म्याला द्विजन्मपणा प्राप्त होतो ।। ८९ ।। शुद्ध अशा खाणीत उत्पन्न झालेले रत्न जसे घासणे वगैरे संस्कारानी उत्कर्षाला पावते, अतितेजस्वी होते तसे हा आत्मा देखिल क्रियामंत्रांनी सुसंस्कृत झाला असता उत्कर्षाला प्राप्त होतो ॥ ९० ॥ ___ अथवा सोने ही धातु तापविणे, इतर धातूपासून वेगळे करणे इत्यादिकानी संस्कारयुक्त झाली असता जशी शुद्ध होते तसे हा भव्यात्मा संस्कारानी शुद्ध होतो ॥ ९१ ॥ तो संस्कार ज्ञानज-ज्ञानापासून उत्पन्न होतो व ते सम्यग्ज्ञान अनुत्तर-सर्वोत्कृष्ट आहे. जेव्हा तो पुण्यवान् भव्य साक्षात्सर्वज्ञदेवाच्या मुखापासून त्या उत्तम ज्ञानाला मिळवितो तेव्हा तो उत्कृष्ट ज्ञानरूपी गर्भापासून संस्कारजन्म ग्रहण करून व्रतानी भूषित होऊन द्विज होतो ॥ ९२-९३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org |
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy