SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 337
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३२६) महापुराण (३६-८२ सरितो विषमावर्तभीषणा ग्राहसङकुलाः । तितीर्षन्ति बताविष्टा विषविषयग्रहैः ॥ ८२ आरोहन्ति दुरारोहान गिरीनप्यभियोगिनः । रसायनरसज्ञानबलवादविमोहिताः ॥ ८३ अनिष्टवनितेवेयमालिङ्गति बलाज्जरा । कुर्वती पलितव्याजाद्रभसेन कचग्रहम् ॥ ८४ भोगेष्वत्युत्सुकः प्रायो न च वेद हिताहितम् । भक्तस्य जरसा जन्तोम॑तस्य च किमन्तरम् ॥ ८५ प्रसह्य पातयन्भूमौ गात्रेषु कृतवेपथुः । जरापातो नृणां कष्टो ज्वरः शीत इवोद्भवन् ॥ ८६ अङ्गसादं मतिभ्रषं वाचामस्फुटतामपि । जरा सुरा च निविष्टा घटयत्याशु देहिनाम् ॥ ८७ कालव्यालगजेनेदमायुरालानकं बलात् । चाल्यते यदबलाधानं जीवितालम्बनं नणाम् ॥ ८८ शरीरबलमेतच्च गजकर्णवदस्थिरम् । रोगाखूपहतं चेदं जरदेहकुटीरकम् ॥ ८९ अतिशय भयंकर विषयपिशाचानी पीडित झालेले लोक बिकट भोवऱ्यानी ज्या भयंकर झालेल्या आहेत व ज्या मगर सुसरीनी भरलेल्या आहेत अशा नद्या तरून जाण्याची इच्छा करतात ।। ८२ ।। रसायन आणि रस आदि ज्ञानाच्या उपदेशाने मोहित केलेले उद्योग करणारे कित्येक लोक ज्याच्यावर चढणे फार कठिण आहे अशा पर्वतावर देखिल चढतात ॥ ८३ ॥ वृद्धपणामुळे केसाना येणाऱ्या शुभ्रतेच्या मिषाने जणु केश पकडते की काय अशी ही जरा-वृद्धदशा अप्रिय असलेल्या स्त्रीप्रमाणे जबरदस्तीने मनुष्यास आलिंगन करिते ॥ ८४ ।। भोगाविषयी अतिशय उत्कण्ठित झालेला मनुष्य बहुत करून हिताहिताला जाणत नसतो. याचप्रमाणे वृद्धावस्थेने घेरलेला मनुष्य आणि मेलेला मनुष्य यात काही अन्तर आहे काय ? मुळीच नाही ॥ ८५ ।। शरीरात भरलेला शीतज्वर, जसा मनुष्याला जमिनीवर पाडतो आणि सर्व अवयवांत कम्प उत्पन्न करतो तशी ही वृद्धदशा देखिल मनुष्याला जमीनीवर पाडते आणि सर्व अवयवात कम्प उत्पन्न करिते ॥ ८६ ।। दारूप्रमाणे ही वृद्धावस्था आहे. दारू मनुष्याच्या शरीराला कृश करिते, बुद्धिभ्रंश करिते आणि बोलण्यामध्ये अस्पष्टपणा-अडखळत बोलणे हा दोष उत्पन्न करते. वृद्धावस्थेनेही देह कृश होतो, स्मृतिभ्रंश होतो आणि भाषणात अस्पष्टपणा अडखळत बोलणे असे दोष उत्पन्न होतात ।। ८७ ॥ मनुष्याचे जगणे ज्याच्या सामर्थ्याने, ज्याच्या अवलंबनाने असते तो आयुष्यरूपी खांब हा कालरूपी-यमरूपी दुष्ट हत्ती उपडून टाकतो ॥ ८८ ॥ हे शरीराचे सामर्थ्य हत्तीच्या कानाप्रमाणे अस्थिर आहे, चंचल आहे. तसेच हा वृद्धावस्थेचा देह जुन्या झोपडीप्रमाणे आहे व ती रोगरूपी उन्दरानी पोखरलेली आहे ॥ ८९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy